agriculture news in marathi, Bring petrol to 60 to 65 rupees: Chavan | Agrowon

...तर पेट्रोल ६० ते ६५ रुपयांच्या आत आणू ः चव्हाण
टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

जालना : भाजपने फेकूगिरी करत सामान्यांना चकवा दिला आहे. सध्या पेट्रोल ८७ रुपयांच्या घरात आहे. येत्या निवडणुकीत कॉँग्रेसचे सरकार आले, तर पेट्रोल ६० ते ६५ रुपयांच्या आत आणू, असे आश्वासन कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिले.

जालना येथे मंगळवारी (ता. ३०) कॉँग्रेसने जनसंघर्ष यात्रा व दुष्काळ पाहणी दौऱ्यानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा अध्यक्ष सुरेशकुमार जैथलिया, माजी आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीत गोरंट्याल आदींची उपस्थिती होती.

जालना : भाजपने फेकूगिरी करत सामान्यांना चकवा दिला आहे. सध्या पेट्रोल ८७ रुपयांच्या घरात आहे. येत्या निवडणुकीत कॉँग्रेसचे सरकार आले, तर पेट्रोल ६० ते ६५ रुपयांच्या आत आणू, असे आश्वासन कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिले.

जालना येथे मंगळवारी (ता. ३०) कॉँग्रेसने जनसंघर्ष यात्रा व दुष्काळ पाहणी दौऱ्यानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा अध्यक्ष सुरेशकुमार जैथलिया, माजी आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीत गोरंट्याल आदींची उपस्थिती होती.

श्री. चव्हाण म्हणाले, राज्यात ८० हजार कुपोषित बालके आणि मातांचा मृत्यू झाल्याची बातमी ‘सकाळ’मध्ये वाचली. मात्र मुख्यमंत्री राज्यात सर्व ‘सुजलाम सुफलाम’ असल्याचे सांगत आहे. त्यांच्या दृष्टीने हा आकडा महत्त्वाचा नाही, असे वाटते. आम्ही दिवसा दुष्काळाची पाहणी करीत आहोत. मात्र, सत्ताधारी रात्री मोबाइलच्या उजेडात दुष्काळाची पाहणी करीत आहेत. राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजना झोलयुक्त केली. सरकारने फेकूगिरी करीत सर्वांना चकवा दिला. अजूनही जनधन खात्यात एक रुपयाही जमा झाला नाही. पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव वाढले आहेत. जर २०१९ मध्ये कॉँग्रेसचे सरकार आले, तर पेट्रोलचे भाव ६० ते ६५ रुपयांच्या आत आणू, आणि जर हेच सरकार ठेवले तर पेट्रोल १०० रुपये पार करेल, असे नमूद करून कॉँग्रेस देशाच्या संविधानाचे रक्षण करीत आहे, असे ते म्हणाले.  

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘शासनाच्या शासन निर्णयात दुष्काळ शब्द नाही. शासनाने आज पाच वाजेपर्यंत दुष्काळी गावांची यादी जाहीर करावी. या सरकारला माज आला आहे का? राज्यात दुष्काळ जाहीर करून राज्याच्या तिजोरीतून का मदत दिली जात नाही, असा सवालही त्यांनी केला.  

श्री. विखे पाटील म्हणाले, ‘चार वर्षे पूर्ण झाली म्हणून सरकार चार दिवसांत १३ जिल्ह्यांत सुराज्य यात्रा काढणार आहे. जनता मरत आहे, आणि हे उत्सव साजरे करीत आहेत. शासनाने दुष्काळ जाहीर करून एकरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी आणि सर्व खरीप कर्ज माफ करावे, अशी मागणी त्यांनी केली.’

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...