औरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये

औरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये
औरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते २००० रुपये

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २६) वांग्याची ३७ क्‍विंटल आवक झाली. या वांग्याला १००० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी कांद्याची ५३७ क्‍विंटल आवक झाली. कांद्याला १०० ते ६५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ११५ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर २००० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ७५ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरचे दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. टोमॅटोची आवक १७० क्‍विंटल झाली. या टोमॅटोला ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ७१ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. भेंडीची आवक ३५ क्‍विंटल झाली. भेंडीला १६०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १५० क्‍विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीचे दर ४०० ते ५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. कैरीची आवक १७५ क्‍विंटल झाली. या कैरीला ७०० ते १२००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २५ क्‍विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याला ५०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ढोबळी मिरचीची आवक १६ क्‍विंटल झाली. या ढोबळी मिरचीला १६०० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ६३ क्‍विंटल आवक झालेल्या भुईमुगाच्या शेंगांना २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ११०० क्‍विंटल आवक झालेल्या बटाट्याचे दर १४०० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. पालकची आवक ९ हजार जुड्यांची झाली. पालकाला ३०० ते ५०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. २१ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीचे दर ४०० ते ७०० रुपये प्रतिशेकडा राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com