agriculture news in Marathi, brinjal at 300 to 2500 rupees in state, Maharashtra | Agrowon

राज्यात वांगी प्रतिक्विंटल ३०० ते २५०० रुपये
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

जळगावात प्रतिक्विंटल ३०० ते ६०० रुपये
जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वांग्याची आवक टिकून आहे. त्यांना प्रतिक्विंटल ३०० ते ६०० व सरासरी ४०० रुपयांपर्यंतच दर मिळाला. आवक कायम असून, सध्या शुभकार्य, लग्नसराई आदींमुळे मागणी कायम आहे. 
भरताच्या वांग्यांची आवक २० ते २५ दिवसांपासून शून्यावर आली आहे. लहान आकारातील काटेरी, हिरवी, काळी आदी वांग्यांची आवक अधिक आहे. आवक प्रतिदिन सरासरी २८ क्विंटल राहिली आहे. पुढे आणखी आवक वाढू शकते. आवक पाचोरा, जळगाव, जामनेर, यावल आदी भागांतून होत आहे. रोज लिलाव होत असल्याची माहिती बाजार समितीमधील सूत्रांनी दिली. 

जळगावात प्रतिक्विंटल ३०० ते ६०० रुपये
जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वांग्याची आवक टिकून आहे. त्यांना प्रतिक्विंटल ३०० ते ६०० व सरासरी ४०० रुपयांपर्यंतच दर मिळाला. आवक कायम असून, सध्या शुभकार्य, लग्नसराई आदींमुळे मागणी कायम आहे. 
भरताच्या वांग्यांची आवक २० ते २५ दिवसांपासून शून्यावर आली आहे. लहान आकारातील काटेरी, हिरवी, काळी आदी वांग्यांची आवक अधिक आहे. आवक प्रतिदिन सरासरी २८ क्विंटल राहिली आहे. पुढे आणखी आवक वाढू शकते. आवक पाचोरा, जळगाव, जामनेर, यावल आदी भागांतून होत आहे. रोज लिलाव होत असल्याची माहिती बाजार समितीमधील सूत्रांनी दिली. 

परभणीत प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये
परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केट मध्ये गुरुवारी (ता. ५) वांग्याची ५० क्विंटल आवक झाली असताना प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या येथील फळे भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक परिसरातील सिंगणापूर, बोरवंड, आर्वी, इटलापूर परिसरातून वांग्याची आवक येत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी ३० ते ५० क्विंटल आवक झाली असताना प्रतिक्विंटल सरासरी ५०० ते १५०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.५) ५० क्विंटल आवक झाली असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये होते तर किरकोळ विक्री प्रतिकिलो १५ ते २० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

पुण्यात प्रतिक्विंटल ८०० ते २००० रुपये
पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ५) वांग्यांच्या विविध वाणांची सुमारे १९६ क्विंटल आवक झाली हाेती. या वेळी प्रतिक्विंटल ८०० ते २००० रुपये दर हाेता. सध्या उन्हाळा सुरू असल्याने आवक सरासरीपेक्षा कमी असल्याने दर वाढलेले आहेत, असे अडत्यांनी सांगितले.

नगरमध्ये प्रतिक्विंटल ५०० ते १२०० रुपये
नगर ः नगर बाजार समितीत वांग्याची आज १५ क्विंटलची आवक झाली. त्याला ५०० ते १२०० रुपये आणि साडेआठशे रुपयांचा सरासरी दर मिळाला. मागील आठवड्याच्या तुलनेत वांग्याचे दर सर्वसाधारण स्थिर आहेत. २९ मार्चला १७ क्विंटलची आवक होऊन २०० ते बाराशे व सरासरी सातशे रुपये, तर २२ मार्चला १८ क्विंटलचे आवक होऊन ५०० ते १५०० व सरासरी १००० हजार रुपयांचा दर मिळाला होता. १५ मार्चला १६ क्विंटलची आवक होऊन २०० ते ८०० व सरासरी पाचशे रुपयांचा दर मिळाला होता. ८ मार्चला २२ क्विंटलची आवक होऊन ८०० ते १५०० रुपयांचा व सरासरी १०० रुपयांचा दर मिळाला होता. १ मार्चला आवक कमी होती. त्या दिवशी १२ क्विंटलची आवक होऊन २०० ते ६०० रुपयांचा व सरासरी ४०० रुपयांचा दर मिळाला होता. गेल्या महिनाभरापासून वांग्याचे दर नगरला स्थिर आहेत.

सांगलीत प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये
सांगली ः येथील शिवाजी मंडईत गत सप्ताहापेक्षा चालू सप्ताहात वांग्याच्या आवकेत वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. ५) वांग्याची १५० ते २०० क्रेट (२० किलोचे एक क्रेट) आवक झाली असून, त्यास २००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. वांग्याची आवक तासगाव, वाळवा, मिरज तालुक्‍यासह नजीकच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्‍यातून होते. गत सप्ताहात वांग्याची ५० ते १०० क्रेट आवक होती. त्यास प्रति दहा किलोस ३०० रुपये असा दर मिळाला होता, अशी माहिती व्यापारी वर्गाने दिली.

नाशिकला प्रतिक्विंटल ५०० ते १६०० रुपये
नाशिक : नाशिक बाजार समितीत बुधवारी (ता. ४) वांग्याची २२५ क्विंटल आवक झाली. या वेळी प्रति क्विंटलला ५०० ते १६०० व सरासरी १००० रुपये दर मिळाले. १० किलोच्या क्रेटमध्ये वांग्याची आवक होते. या वेळी वांग्याच्या २२५० क्रेटची आवक झाली. प्रति क्रेटला ५० ते १६० व सरासरी १०० असे दर मिळाले. या हंगामातील हा नीचांकी दर असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. मार्च महिन्यात सरासरी आवक ही १५० क्विंटल होती. त्या वेळी ७०० ते २१०० व सरासरी १४०० असे दर होते. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून आवकेत वाढ झाली. या काळात राज्यभरातील बाजार समित्यांत स्थानिक भाजीपाल्याची आवक वाढली. परिणामी मागणीच्या तुलनेत आवक जास्त राहीली. त्यामुळे वांग्याच्या दरात उतरण झाली. वांग्याची आवक व दराची सद्यस्थिती अजून महिनाभर तशीच राहील असे सूत्रांनी सांगितले.

सोलापुरात प्रतिक्विंटल ५०० ते १२०० रुपये
सोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांग्याच्या आवकेत काहीशी वाढ झाली, पण मागणी चांगली राहिल्याने दर टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. वांग्याला प्रतिदहा किलोसाठी सर्वाधिक १५० रुपये इतका दर मिळाला. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांग्याची आवक रोज ४० ते ५० क्विंटलपर्यंत राहिली. या आधीच्या सप्ताहातही साधारणपणे ५०० ते ७०० क्विंटलपर्यंत आवक राहिली. त्या वेळी वांग्याला प्रतिदहा किलोसाठी किमान ५० रुपये, सरासरी १०० रुपये आणि सर्वाधिक १२० रुपये असा दर राहिला. त्या आधीच्या सप्ताहातही दराच्या सुधारणा नव्हतीच. या सप्ताहात वांग्याची आवक जेमतेम १०० ते २०० क्विंटलपर्यंत राहिली. वांग्याला प्रतिदहा किलोसाठी किमान ८० रुपये, सरासरी १२० रुपये आणि सर्वाधिक १४० रुपये असा दर मिळाला. गेल्या दोन आठवड्यांपासून वांग्याची आवक आणि दरही टिकून आहेत. मागणी वाढेल, तशी आवक कमी होताना दरात तेजी टिकून राहील, असे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

औरंगाबादेत प्रतिक्विंटल ५०० ते ७०० रुपये
औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ५) वांग्याला ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 
औरंगाबाद बाजार समितीमध्ये १ जानेवारीला ४५ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला ८०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला होता. ६ फेब्रुवारीला ५४५ क्‍विंटल आवक होऊन ५०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला होता. २२ फेब्रुवारीला ५८ क्‍विंटल आवक, तर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३१ मार्चला ४३ क्‍विंटल आवक होऊन दर ५०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २ एप्रिलला आवक ६३ क्‍विंटल, तर दर ६०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३ एप्रिलला ४३ क्‍विंटल आवक, तर ५०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ४ एप्रिलला ४९ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला ५०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

इतर अॅग्रो विशेष
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...
खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्रीचाळीसगाव, जि. जळगाव ः लांबलेल्या व अवेळी पडलेल्या...
रब्बी पेरणी २० टक्क्यांनी घटलीनवी दिल्ली ः देशातील बहुतांशी भागात यंदाच्या...
सातारा, सोलापूर, परभणीत ऊसदरासाठी आंदोलनपुणे ः गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच...
निर्यातीच्या केळीला १८०० रुपये दरजळगाव ः राज्यात निर्यातीच्या केळीला यंदा उच्चांकी...
नागपूर, गोंदिया गारठलेपुणे : उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
दक्षिण महाराष्टात ऊसतोडी सुरूकोल्हापूर : ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. ११) दुपारी...