agriculture news in Marathi, brinjal at 300 to 3000 rupees in state, Maharashtra | Agrowon

राज्यात वांगी प्रतिक्विंटल ३०० ते ३००० रुपये
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल ६०० ते ९०० रुपये
औरंगाबाद:  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२६) वांग्याची आवक ३७ क्‍विंटल झाली. या वांग्याला ६०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल ६०० ते ९०० रुपये
औरंगाबाद:  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२६) वांग्याची आवक ३७ क्‍विंटल झाली. या वांग्याला ६०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये वांग्याची आवक व दरात चढउतार कायम राहिला आहे. ३१ मार्चला ४३ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला ५०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १४ मार्चला ५७ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याचे दर ५०० ते ८०० रुपये राहिले. २७ मार्चला ५४ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला ३०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटचा दर मिळाला. २ एप्रिलला वांग्याची आवक ६३ क्‍विंटल झाली. या वांग्याला ६०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर हाेता. ७ एप्रिलला ५५ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याचे दर ४०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १० एप्रिलला ९६ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला २०० ते ५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २४ एप्रिलला ८० क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला ५०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २५ एप्रिलला ३० क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला ६०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

पुण्यात प्रतिक्विंटल ६०० ते १५०० रुपये
पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २६) विविध वांग्यांच्या वाणांची सुमारे १० टेम्पाे आवक झाली हाेती. यावेळी प्रतिक्विंटल ६०० ते १५०० रुपयांपर्यंत दर हाेते. सध्या आवक जास्त असून मागणी कमी असल्याने दर सरासरी असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
बाजार समितीमध्ये पुणे विभागातील विविध जिल्ह्यांमधून विविध वाणांच्या वांग्यांची आवक हाेत अाहे. यामध्ये प्रामुख्याने हिरवी, जांभळी, भरताची माेठी वांगी आणि लांब आकाराच्या वांग्यांचा समावेश आहे.

नगरला प्रतिक्विंटल २०० ते १००० रुपये
नगर ः नगर बाजार समितीत वांग्यांची आज २० क्विटलची आवक झाली व २०० ते १००० व सरासरी ६०० रुपयांचा दर होता. मागील महिन्यापेक्षा आता काहीसा दर वाढला आहे. नगर बाजार समितीत दररोज सरासरी २० ते २५ क्विंटलची आवक होत असते. १९ एप्रिल ला  २० क्विंटल ची आवक झाली. त्या दिवशी ५०० ते १२०० व सरासरी ८५० रुपयांचा दर होता. १२ एप्रिल रोजी १७ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १२०० व ८५० रुपयांचा सरासरी दर होता. ५ एप्रिल रोजी १५ क्विंटल ची आवक होऊन १०० ते ५०० व ३०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. गेल्या महिनाभराचा विचार करता वांग्यांच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. आवक मात्र स्थिर असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

जळगावात प्रतिक्विंटल ३०० ते ६०० रुपये
जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महिनाभरापासून वांग्यांना अपेक्षित दर शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. वांग्याची आवक टिकून आहे. सरासरी दर महिनाभर ५०० रुपये प्रतिक्विंटल एवढाच राहीला. दर कमी मिळत असल्याने जळगाव व यावल तालुक्‍यातील तापीकाठानजीकच्या गावांमधील वांगी उत्पादकांनी पीक मोडले. सध्या बाजार समितीत एरंडोल व जळगाव येथून वांग्यांची आवक अधिक आहे. यापाठोपाठ पाचोरा तालुक्‍यातूनही काही प्रमाणात आवक होत आहे. प्रतिदिन १८ क्विंटल आवक मागील २० ते २५ दिवस राहिली आहे. कमाल दर ६५० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक नव्हते, अशी माहिती मिळाली. आवक अजूनही टिकून आहे. हिरव्या काटेरी वांग्यांचा लिलाव लवकर होतो. काळ्या व मोठ्या आकाराच्या वांग्यांना फारशी मागणी नाही.

परभणीत प्रतिक्विंटल २०००  ते ३००० रुपये
परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे- भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.२६) वांग्याची २० क्विंटल आवक झाली असताना प्रतिक्विंटल २०००  ते ३००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या फळे-भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून आवक येत आहे. 
महिनाभरात प्रत्येक गुरुवारी सरासरी २० ते ४० क्विंटल आवक झाली. गुरुवारी (ता.२६) २० क्विंटल आवक झाली असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये होते. किरकोळ विक्री प्रतिकिलो ४० ते ६० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

नाशिकला प्रतिक्विंटल ५०० ते १५०० रुपये
नाशिक : येथील बाजार समितीत बुधवारी (ता.२५) वांग्याची २३० क्विंटलची आवक झाली. या वेळी वांग्याला प्रतिक्विंटलला ५०० ते १५०० रुपये व सरासरी १००० रुपये दर मिळाले. मार्च महिन्यात वांग्याची आवक सरासरी २०० क्विंटल होती. त्या वेळी वांग्याचे दर क्विंटलला ५०० ते २२०० व सरासरी १५०० होते. मात्र, एप्रिल महिन्यात वांग्याच्या आवकेत काही प्रमाणात वाढ झाली. याचकाळात देशातील इतरही बाजारपेठांत वांग्याची स्थानिक आवक वाढली आहे. परिणामी, वांग्याचे दर क्विंटलला ५०० ते १५०० यादरम्यानच स्थिर राहिले आहेत. अजून पंधरा दिवस तरी वांग्याच्या दराची ही स्थिती कायम राहील, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

सांगलीत प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये
सांगली ः येथील शिवाजी मंडईत वांग्याची दररोज सुमारे १०० ते १५० करंड्यांची अावक (प्रतिकरंडी ३० किलो) होत आहे. गुरुवारी (ता. २६) १५० करंड्यांची आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये असा दर होता. अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यातील कवठेपिरान, तूंग, दूधगाव, आष्टा, मिरज; तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्‍यातून वांग्याची आवक होते. बुधवारी (ता. २५) वांग्याची १५० करंड्यांची आवक झाली असून, त्यास प्रतिदहा किलोस १०० ते १५० रुपये असा दर मिळाला. मंगळवारी (ता. २४) वांग्याची १०० करंड्याची आवक झाली होती. त्यास प्रति दहाकिलोस १०० ते १५० रुपये असा दर होता. शिवाजी मंडईत गतसप्ताहापेक्षा वांग्याची आवकीत घट झाल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले.

साताऱ्यात प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये
सातारा ः येथील कृषी उत्पन्न समितीत गुरुवारी (ता.२६) वांग्याची २४ क्विंटल आवक झाली.  वांग्यास प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाला आहे. वांग्याचे दर एप्रिलपासून क्विंटलला ५०० ते १२०० यादरम्यान स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे. बाजार समितीत कोरेगाव, फलटण, खटाव, सातारा तालुक्‍यातून आवक होत आहे. पाच एप्रिलला वांग्याची १५ क्विंटल आवक झाली असून, वांग्यास ८०० ते १००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. १२ एप्रिलला २४ क्विंटल आवक होऊन वांग्यास क्विंटला १००० ते १५०० रुपये दर मिळाला आहे. १९ एप्रिलला ३० क्विंटल आवक झाली असून, ५०० ते १००० रुपये दर मिळाला आहे. वांग्याची १५ ते २० रुपये किलोप्रमाणे किरकोळ विक्री केली जात आहे.

इतर अॅग्रो विशेष
प्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
ऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...
मॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...
सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...
‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...
महसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...