agriculture news in Marathi, brinjal at 500 to 1200 rupees in Jalgaon, Maharashtra | Agrowon

जळगावात वांगी प्रतिक्विंटल ५०० ते १२०० रुपये
चंद्रकांत जाधव
मंगळवार, 2 जानेवारी 2018

जळगाव ः गत सप्ताहात बाजार समितीत भरीताच्या वांग्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. दर प्रतिक्विंटल ५०० ते १२०० रुपये आणि सरासरी ८०० रुपयांपर्यंत होते. तर मेथी, कोथिंबीर, पालकचे दरही प्रतिक्विंटल एक हजारांखालीच राहीले. 

जळगाव ः गत सप्ताहात बाजार समितीत भरीताच्या वांग्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. दर प्रतिक्विंटल ५०० ते १२०० रुपये आणि सरासरी ८०० रुपयांपर्यंत होते. तर मेथी, कोथिंबीर, पालकचे दरही प्रतिक्विंटल एक हजारांखालीच राहीले. 

वांग्यांची प्रतिदिन आवक ४० क्विंटलपर्यंत होती. काटेरी हिरवे व लहान आकाराचे वांगे कमी आले, परंतु भरिताच्या वांग्यांची वरणगाव (ता. भुसावळ, जि. जळगाव), कुऱ्हे (ता. भुसावळ), पाडळसे (ता. यावल, जि. जळगाव) आणि जळगाव तालुक्‍यातील विदगाव, कानळदा, असोदा, भादली, आवार, तरसोद भागातून आवक वाढली. ३१ डिसेंबर साधण्यासाठी अनेकांनी वांगी दोन ते तीन दिवस राखून ठेवली होती. त्यातच शुक्रवारपासून (ता. २९) आवक वाढू लागली. आवक वाढली दर ५०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. 

मेथीची आवक प्रतिदिन पाच क्विंटल होती. तिस ५०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल दर राहिला. कोथिंबीरची आवक प्रतिदिन चार क्विंटल राहिली. प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर राहिला. पालकची आवक प्रतिदिन तीन क्विंटल राहिली. त्याला प्रतिक्विंटल एक हजार रुपये दर मिळाला. भेंडीची आवकही प्रतिदिन आठ क्विंटल होती, तिला ९०० ते १४०० आणि सरासरी ११०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. बोरांची आवक वाढली. त्यात मेहरूणच्या बोरांची अधिकची आवक सुरू झाली. प्रतिदिन सात क्विंटलपर्यंत आवक होती. त्यांना प्रतिक्विंटल ११०० रुपये दर मिळाला. 

बटाट्याचे दरही स्थिर होते. त्यांची प्रतिदिन २०० क्विंटल आवक होती. दर २५० ते ४५० रुपये प्रतिक्विंटल होते. कांद्याचे दर प्रतिक्विंटल २००० ते २८०० रुपयांपर्यंत होते. आवक प्रतिदिन २५० क्विंटलपर्यंत होती. हिरव्या मिरचीची आवक प्रतिदिन ३५ क्विंटल राहिली. तिला १५०० ते २१०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. सोयाबीनला कमाल दर ३००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. तर उडदाला ३८०० रुपये प्रतिक्विंटल किमान दर होता. मुगाचे किमान दर ४००० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक राहिले. सोयाबीन, उडीद व मुगाची आवक मात्र फारशी नव्हती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 केळी दरही स्थिर
केळीचे दर स्थिर होते. बिगर उतिसंवर्धित कांदेबाग केळी ९५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर होता. तर दर्जेदार केळीला ऑन म्हणजेच क्विंटलमागे २०० ते २५० रुपये जादा दर मिळाले. जुनारीचे दर ८५० रुपये प्रतिक्विंटल होते. पिलबागमधील केळीची आवक रावेर, यावलमध्ये अधिक राहीली. त्यालाही ८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर होता.

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...