agriculture news in Marathi, brinjal and onion rates up in kolhapur, Maharashtra | Agrowon

कोल्हापुरात वांग्यासह कांदा दर वधारले
राजकुमार चौगुले
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

वांग्याची दररोज तीनशे ते चारशे करंड्या आवक होती. वांग्यास दहा किलोस १७० ते ६५० रुपये इतका दर मिळाला. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत वांग्याच्या दरात दीड वाढ झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. गवारीची दररोज शंभर ते दीडशे पोती आवक झाली. 

कोल्हापूर: येथील शेती उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात बहुतांशी भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्याने तेजीचा माहोल राहिला. गेल्या सप्ताहात पडलेल्या जोरदार पावसामुळे पालेभाज्याच्या काढणीत मोठी घट झाल्याने भाजीपाल्यांचे दर सातत्याने तेजीत राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. वांगी, गवारीच्या दरात सातत्याने तेजी राहिली.

वांग्याची दररोज तीनशे ते चारशे करंड्या आवक होती. वांग्यास दहा किलोस १७० ते ६५० रुपये इतका दर मिळाला. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत वांग्याच्या दरात दीड वाढ झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. गवारीची दररोज शंभर ते दीडशे पोती आवक झाली. 

गवारीस दहा किलोस २०० ते ६०० रुपये दर मिळाला. गवारीच्या दरातही गेल्या सप्ताहाच्या तुलनेत वाढ होती. टोमॅटोच्या आवकेत काहीशी वाढ झाली असली तरी दर मात्र तेजीतच होते. टोमॅटोची दररोज दीड ते दोन हजार कॅरेटची आवक होती. टोमॅटोस दहा किलोस १०० ते ३५० रुपये दर होता. दोडक्‍याची शंभर ते एकशे पंचवीस करंड्या आवक झाली. दोडक्‍यास दहा किलोस १०० ते ६०० रुपये दर मिळाला. 

  या सप्ताहात विशेषकरून पालेभाज्यांची दर सातत्याने तेजीत होते. कोथिंबिरीची दररोज आठ ते दहा हजार पेंढी आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा १००० ते ३००० रुपये दर होता. मेथीची दररोज दोन ते तीन हजार पेंढ्या आवक झाली. मेथीस शेकडा १००० ते १४०० रुपये दर मिळाला. 

सध्या पाऊस थांबला असला तरी शिवारात अजूनही पाणी साचून आहे. यामुळे भाजीपाला काढणी ठप्प आहे. ढगाळ हवामानामुळे रोगांचे प्रमाणही वाढल्याने भाजीपाल्याचे व्यवस्थापन 
करणे कठीण जात आहे. ‘‘या वर्षी पाऊस प्रमाणापेक्षा जास्त पडला  परिणामी, तयार भाजीपाला शेतकऱ्यांना वेळेत काढता आला नाही. हा भाजीपाला शेतातच कुजून नष्ट झाला. शिवाय अतिपावसामुळे फूल गळही झाली. यामुळे गेल्या काही दिवसांपासून  फळभाजी, पालेभाजीचे दर वाढलेले आहेत. बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होण्यास अजून १५ ते २० दिवसांचा कालावधी लागण्याची शक्‍यता असल्याचे व्यापार सूत्रांनी सांगितले. 

कांदाही तेजीत 
भाजीपाल्याबरोबर कांदा बाजारातही तेजी दिसून आली. पावसामुळे नव्या कांद्याचे नुकसान झाल्याने कांद्याच्या आवकेत घट झाली. कांद्याची दररोज केवळ एक ते दोन हजार पोतीच आवक झाली. कांद्यास दहा किलोस १५० ते ४१० रुपये इतका दर मिळाला. गेल्या काही सप्ताहातील दराच्या तुलनेत या सप्ताहात कांद्याचे दर वाढल्याचे कांदा बटाटा विभागातील सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...