agriculture news in Marathi, brinjal and tomato rates increased in solapur, Maharashtra | Agrowon

सोलापुरात वांगी, टोमॅटोच्या दरात किरकोळ सुधारणा
सुदर्शन सुतार
मंगळवार, 1 मे 2018

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात टोमॅटो, वांग्याची आवक कमी राहिली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या दरात काहीशी घसरण सुरू होती. पण या सप्ताहात त्यांना मागणी चांगली असल्याने दरात सुधारणा झाली. भाज्यांचे दरही पुन्हा वधारलेलेच राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात टोमॅटो, वांग्याची आवक कमी राहिली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या दरात काहीशी घसरण सुरू होती. पण या सप्ताहात त्यांना मागणी चांगली असल्याने दरात सुधारणा झाली. भाज्यांचे दरही पुन्हा वधारलेलेच राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

गतसप्ताहात वांग्याची रोज ३० ते ४० क्विंटल आणि टोमॅटोची २०० ते ३०० क्विंटल इतकी आवक झाली. स्थानिक भागातूनच ही सगळी आवक झाली. गेल्या महिनाभरापासून वांगी, टोमॅटोच्या दरात चांगलीच घसरण होते आहे. या सप्ताहातही काहीशी तशीच स्थिती होती. पण आठवड्याच्या सुरवातीला मागणी एकदम वाढल्याने त्यांच्या दरात काहीशी सुधारणा झाल्याचे दिसून आले. टोमॅटोला प्रतिदहा किलोसाठी २०० ते १००० रुपये आणि वांग्याला ८० ते  १६० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय कोथिंबिर, मेथी, शेपू या भाज्यांचे दरही पुन्हा वधारलेलेच राहिले.

भाज्याची आवक रोज १० ते १५ हजार पेंढ्यांपर्यंत होती. या सप्ताहात भाज्यांची आवकेत वाढ झालीच, शिवाय मागणीही होती. कोथिंबिरीला शंभरपेंढ्यांसाठी ६०० ते १६०० रुपये, मेथीला ६०० ते ८०० रुपये आणि शेपूला २०० ते ६०० रुपये असा दर मिळाला. पालक, चुका आणि अंबाडीच्या भाज्यांना प्रत्येकी २०० ते ३५० रुपयांपर्यंतर दर मिळला.

डाळिंबाचे दर टिकून 
गेल्या काही दिवसांपासून डाळिंबाच्या आवकेत काहीशी घट होत आहे. रोज एक ते दीड टनापर्यंत आवक असते. पण या सप्ताहात त्यात सातत्य राहिले नाही, शिवाय आवकही तुलनेने कमीच राहिली. डाळिंबाला प्रतिक्विंटलसाठी ७०० ते ८५०० रुपये असा दर होता. गेल्या काही दिवसांतील त्यांच्या दराचा विचार  करता डाळिंबाचे दर काहीसे टिकून राहिल्याचे दिसून आले.

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...
प्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...