agriculture news in Marathi, Brinjal, fenuagreek and coriander rates up in Satara, Maharashtra | Agrowon

साताऱ्यात वांगी, मेथी, कोथिंबीर तेजीत
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 जानेवारी 2018

सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.२४) वांगी, वाटाणा, मेथी, कोथिंबीर तेजीत असून हिरवी मिरची, पावटा, गवारीच्या आवकेत वाढ झाली आहे. वाटाण्याची २२ क्विंटल आवक झाली असून दहा किलो वाटाण्यास २५० ते ३०० रुपये दर मिळाला आहे. वाटाण्यास गुरुवारच्या (ता.१८) तुलनेत दहा किलो मागे शंभर रुपयांची दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.२४) वांगी, वाटाणा, मेथी, कोथिंबीर तेजीत असून हिरवी मिरची, पावटा, गवारीच्या आवकेत वाढ झाली आहे. वाटाण्याची २२ क्विंटल आवक झाली असून दहा किलो वाटाण्यास २५० ते ३०० रुपये दर मिळाला आहे. वाटाण्यास गुरुवारच्या (ता.१८) तुलनेत दहा किलो मागे शंभर रुपयांची दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

वांग्याची तीन क्विंटल आवक झाली असून दहा किलो वांग्यास १०० ते २०० रुपये दर मिळाला. दोडक्‍याची चार क्विंटल आवक झाली असून दहा किलो दोडक्‍यास ३०० ते ३५० रुपये दर मिळाला. भेंडीची पाच क्विंटल आवक होऊन दहा किलो भेंडीस ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. ढोबळी मिरचीची नऊ क्विंटल आवक झाली. दहा किलो ढोबळीस २०० ते ३०० रुपये दर मिळाला.

शेवग्याची तीन क्विंटल आवक झाली, दहा किलो शेवग्यास ३०० ते ३५० रुपये दर मिळाला. काळा घेवड्याची सहा क्विंटल आवक होऊन दहा किलोस ३०० ते ३५० रुपये दर मिळाला. कारल्याची तीन क्विंटल आवक तर दहा किलोस ३०० ते ३५० रुपये दर मिळाला. टोमॅटोची २४ क्विंटल आवक होऊन दहा किलोस ५० ते ७० रुपये दर मिळाला. हिरवी मिरची, पावटा, गवारीच्या आवकेत वाढ झाली होती.

हिरव्या मिरचीची १६ क्विंटल आवक झाली असून दहा किलोस १५० ते २२० रुपये दर मिळाला. पावट्याची तीन क्विंटल आवक होऊन दहा किलोस ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. गवारीची दोन क्विंटल आवक तर दहा किलोस ४०० ते ५०० रुपये दर मिळाला. मेथीची २२०० जुड्यांची आवक होऊन शेकड्यास ५०० ते ६०० रुपये दर मिळाला. कोथिंबीरीची २५०० जुड्याची आवक झाली होऊन शेकड्यास ६०० ते ७०० रुपये दर मिळाला. 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...