agriculture news in Marathi, brinjal, french bean and capsicum rates increased in Nashik, Maharashtra | Agrowon

नाशिकला वांगी, घेवडा, ढोबळी मिरची तेजीत
ज्ञानेश उगले
मंगळवार, 2 जानेवारी 2018

नाशिक : नाशिक बाजार समितीत गत सप्ताहात वांगी, घेवडा, ढोबळी मिरची या फळभाज्यांना तेजीचे दर मिळाले. कांद्याची आवक स्थिर असून मागील महिन्यापासून प्रतिक्विंटलला २१५० ते ३५०० व सरासरी ३००० रुपये या दरावर कांदा स्थिरावला आहे.

या खेरीज भेंडी, हिरवी मिरची या भाज्यांनाही स्थानिक तसेच जिल्ह्याबाहेरील बाजारातून होणारी मागणी कायम असल्याचेच चित्र दिसून आले. कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, चांदवड, सिन्नर या भागातील अर्ली हंगामातील द्राक्षांची आवक सुरू असून या द्राक्षांना दिल्लीच्या बाजारात प्रतिकिलोला ५० ते १०० रुपये दर मिळाले. 

नाशिक : नाशिक बाजार समितीत गत सप्ताहात वांगी, घेवडा, ढोबळी मिरची या फळभाज्यांना तेजीचे दर मिळाले. कांद्याची आवक स्थिर असून मागील महिन्यापासून प्रतिक्विंटलला २१५० ते ३५०० व सरासरी ३००० रुपये या दरावर कांदा स्थिरावला आहे.

या खेरीज भेंडी, हिरवी मिरची या भाज्यांनाही स्थानिक तसेच जिल्ह्याबाहेरील बाजारातून होणारी मागणी कायम असल्याचेच चित्र दिसून आले. कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, चांदवड, सिन्नर या भागातील अर्ली हंगामातील द्राक्षांची आवक सुरू असून या द्राक्षांना दिल्लीच्या बाजारात प्रतिकिलोला ५० ते १०० रुपये दर मिळाले. 

नाशिक जिल्ह्यात गत सप्ताहात सकाळचे किमान तापमान ५ ते ७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले. या स्थितीत बाजारातील फळभाज्यांची आवक घटली. परिणामी, स्थानिक तसेच जिल्ह्याबाहेरील बाजारपेठेतून मागणी वाढली. वांग्याला हिवाळ्यात मागणी वाढते.

गतसप्ताहात वांग्याची दिवसाला सरासरी १०० क्विंटलची आवक झाली. वांग्याला प्रतिक्विंटलला २००० ते ३००० व सरासरी २६०० रुपये दर राहिले. घेवडा व हिरवी मिरचीची आवक अत्यल्प झाली. घेवड्याची आवक अवघी १५ क्विंटल झाली. घेवड्याला प्रति क्विंटलला २५०० ते ५००० व सरासरी ३५०० दर मिळाले. हिरव्या मिरचीची आवक तर घेवड्याहून कमी म्हणजे अवघी ८ क्विंटलच्या आसपास होती. हिरव्या मिरचीला क्विंटलला २५०० ते ४१०० व सरासरी ३५०० असे दर मिळाले. 

ढोबळी मिरचीची आवक जास्त असून मागणी असल्याने दरही चांगले मिळत आहे. गतसप्ताहात ढोबळीची १०० ते १२० क्विंटलची आवक होती. या मिरचीला २५०० ते ४५०० व सरासरी ३५०० असे तेजीचे दर मिळाले. या वेळी भेंडीची आवक ५० क्विंटल होती. भेंडीचे दर प्रतिक्विंटलला ३००० ते ४००० व सरासरी ३७०० असे होते. 

द्राक्षांना मागणी वाढली 
नाशिक कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या भागातील अर्लीचा द्राक्ष हंगाम ८० टक्के आटोपला आहे. नाशिक भागात आता सिन्नर व चांदवड भागातील द्राक्षांचे खुडे सुरू झाले आहेत. हा माल रशियाला निर्यात होतो. यातील बहुतांश द्राक्ष माल दिल्लीच्या बाजारात पाठविला जातो. गत सप्ताहात देशांतर्गत बाजारात द्राक्षांना ५० ते ७० व सरासरी ६० रुपये दर मिळाले. यावेळी निर्यातक्षम द्राक्षांना ६० ते १०० व सरासरी ८० रुपये दर मिळाले. नाशिक भागातील कांद्याची मागणी टिकून आहे. गत सप्ताहात कांद्याला प्रतिक्विंटलला २१०० ते ३५०० व सरासरी ३००० रुपये दर मिळाले. येत्या सप्ताहात हे दर टिकून राहतील, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...