agriculture news in Marathi, broiler market up due to christmas and new year, Maharashtra | Agrowon

नाताळ, नववर्षाच्या उत्सवी माहोलामुळे ब्रॉयलर्स तेजीत
दिपक चव्हाण
सोमवार, 25 डिसेंबर 2017

नववर्षामुळे असलेले उत्सवी वातावरण, सुट्या आणि सहलींमुळे संस्थात्मक मागणीतील वाढ आणि थंडीचा प्रभाव, यामुळे ब्रॉयलर्सच्या खपवाढीला अनुकूल वातावरण आहे. 
- डॉ. अनिल फडके, पोल्ट्री उद्योजक, नाशिक
 

नाताळ ते ३१ डिसेंबर या वर्षातील सर्वाधिक खपाच्या काळात मागणीच्या प्रमाणात पुरवठा संतुलित राहिल्याने ब्रॉयलर्सचे बाजारभाव तेजीत आहेत. दक्षिण भारतातील खप घटल्याने अंड्यांचे भाव दहा टक्क्यांनी नरमले आहेत.

शनिवार (ता. २४) रोजी बेंचमार्क नाशिक विभागात ८५ रु. प्रतिकिलोने ब्रॉयलर पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. आठ दिवसांत ८० रु. वरून ८५ रु. पर्यंत बाजार वधारला आहे. ता. १८ डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर महाराष्ट्रातील घरगुती व संस्थात्मक मागणी वाढ झाली आहे. पुणे विभागात अंड्यांचे प्रतिशेकडा फार्म लिफ्टिंग दर ३४५ रु. पर्यंत खाली आले असून, आठवडाभरात दहा टक्क्यांनी बाजार नरमला आहे.

गेल्या काही वर्षानंतर प्रथमच डिसेंबरचा शेवटचा आठवडा ब्रॉयलर्सच्या बाजारासाठी किफायती ठरला आहे. या वर्षी दिवाळीनंतर तापमानात मोठे चढ-उतार होते. काही प्रमाणात पक्ष्यांची वाढ नियंत्रित झाली आहे. पिलांचे भाव उच्चांकी पातळीवर असल्यामुळे ओपन फार्मर्सची संख्या कमी आहे. सर्वाधिक माल हा संस्थात्मक क्षेत्राकडे असून, परिणामी ब्रॉयलर्सच्या विक्रीमध्ये पॅनिक सेलिंग होताना दिसत नाही. त्यामुळे बाजार संतुलित राहत आहे.
नाशिक येथील पोल्ट्री उद्योजक डॉ. अनिल फडके म्हणाले, की महिनाभरात ब्रॉयलर्सच्या बाजारभावात टप्प्याटप्प्याने चांगली वाढ झाली आहे. नववर्षामुळे असलेले उत्सवी वातावरण, सुट्या आणि सहलींमुळे संस्थात्मक मागणीतील वाढ आणि थंडीचा प्रभाव यामुळे खपवाढीला अनुकूल वातावरण आहे. यामुळे ब्रॉयलर्सचा बाजार आणखी उंचावत जाईल. पक्ष्यांच्या वजनात वाढ असली तरी मागणीचा वेग त्यापेक्षा जास्त आहे.

‘‘बारामती फलटण विभागात देशी पक्ष्यांचा लिफ्टिंग दर १४० रु. प्रतिकिलोच्या आसपास आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पक्ष्यांचे उत्पादन नियंत्रित झाले आहे. त्यामुळे १०० रु. उत्पादन खर्चाच्या तुलनेत गावठी पक्ष्यांना किफायती दर मिळत आहे. यंदाची वर्षाखेर देशी कोंबडीपालकांसाठी तुलनेने चांगली आहे,’’ असे पुण्यातील पोल्ट्री उद्योजक पांडुरंग सांडभोर यांनी सांगितले.

दर आठवड्यात अंड्यांच्या बाजारभावात उतरता कल दिसत आहे. सध्याचे बाजारभाव उत्पादन खर्चाच्या तुलनेत दहा टक्क्यांनी अधिक असले तरी ते महिनभरात वेगाने खाली आले आहेत. याबाबत पुण्यातील योजना पोल्ट्री संचालक राजू भोसले म्हणाले, की महाराष्ट्रात अंड्यांच्या खपात मागशीर्षनंतर वाढ झाली आहे. मात्र, दक्षिण भारतात अयप्पा उत्सवामुळे अंड्यांचा घरगुती खप कमी आहे. त्यामुळे बाजारभाव नरमले आहेत. चालू मोसमात उच्चांकी पातळीवरून प्रतिशेकडा दोनशे रुपयांनी बाजार उतरला आहे. 

एका दिवसाच्या पिलांचे भाव आजवरच्या उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. गेल्या आठवड्यात ४४ रु. प्रतिनगाने पिलांची विक्री झाली. हॅचिंग्ज एग्जचे बाजारभावदेखील प्रतिनग ३४ रु. या पातळीपर्यंत वधारले आहेत. ब्रॉयलर पक्ष्यांच्या तेजीने पिलांच्या आणि हॅचिंग्ज एग्जच्या बाजारभावाला आधार दिला आहे. या वर्षी खाद्यावरील खर्चात बचत झाली आहे. ओपन फार्मर्सच्या दृष्टीने पिलांचे भाव वाढल्यामुळे एकूण उत्पादन खर्च कमी झालेला नाही.
 

प्रकार     भाव परिमाण बाजारपेठ
ब्रॉयलर   ८५   प्रतिकिलो   नाशिक
अंडी    ३४५  प्रतिशेकडा     पुणे
चिक्स     ४४    प्रतिनग    पुणे
हॅचिंग एग्ज    ३४    प्रतिनग  मुंबई
मका १३००    प्रतिक्विंटल         सांगली
सोयामिल २३,२५०      प्रतिटन    इंदूर

        
     
   

   
 
    

 

इतर अॅग्रोमनी
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
कृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
हरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...
भात निर्यातीसाठी मागणीबरोबरच भूराजकीय...भारतीय भात निर्यातदारांच्या वाढीसाठी जागतिक...
मका, साखर, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन...
अर्थमंत्री जेटली १ फेब्रुवारीला...नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार त्यांच्या...
कापूस उद्योगाचे अमेरिका-चीनच्या...जळगाव : चीन व अमेरिकेत मागील नऊ महिन्यांपासून...
सातत्याने ताळेबंद तपासत शेती राखली...जळगाव जिल्ह्यातील नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील...
हळदीच्या निर्यात मागणीत वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सर्वच शेती...
हळदीच्या स्थानिक, निर्यात मागणीत वाढया सप्ताहात नाताळच्या सुटीमुळे आंतरराष्ट्रीय...
ग्राहकाला आधारसक्ती केल्यास 1 कोटींचा...नवी दिल्ली: दूरसंचार कंपन्यांकडून मोबाइल फोन...
युरियाची आयात ४२ लाख टनांवरनवी दिल्ली : भारताची चालू आर्थिक वर्षातील...
मका, हळद वगळता इतर शेतमालाच्या भावात वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस व...
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...
कापसाचा लांबवरचा कल वाढताया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस...
कापूस, हरभऱ्याची मागणी वाढतीया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व...
देशात ३४० लाख कापूस गाठी उत्पादनाचा...जळगाव : देशात सप्टेंबरच्या पावसासंबंधी अनियमितता...
द्राक्षाच्या तिहेरी विक्री व्यवस्थापनात...मालगाव (जि. सांगली) येथील संजय भीमराव बरगाले...
वायदे बाजार : सोयाबीन, कापसाचा लांबवरचा...या सप्ताहात सोयाबीन, हळद, साखर व गवार बी यांचे...