एप्रिल महिन्यात राज्यातील तापमान ४० अंश सेल्शिअसच्या वर गेलेले असताना, वाढत्या इंधन दराचे चटकेही
अॅग्रोमनी
डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात नाताळ, सुट्यांचा हंगाम आणि वर्षाखेर अशा खपाच्या मोठ्या इव्हेंट्समुळे चिकनचा जोरदार खप होईल. त्यामुळे सध्याचे बाजारभावातील मंदीचे सावट कमी होईल.
- कृष्णचरण, संचालक कोमरला समूह, बंगळूर.
पुणे : रविवारी (ता. २६) बेंचमार्क नाशिक विभागात ६० रुपये प्रतिकिलो दराने ब्रॉयलर पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. पुणे विभागात खाण्याच्या अंड्यांचे फार्म लिफ्टिंग दर उच्चांकावरून ९५ रुपयांनी कमी होत ४६० रुपये प्रतिशेकड्यापर्यंत नरमले आहेत. ब्रीडर्स इंडिग्रेटर्ससाठी किंवा स्वत:ची पिले असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सध्याच्या ब्रॉयलर्सचा दर उत्पादन खर्चाच्या आसपास आहे. तथापि पिले विकत घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सध्याचा बाजार दहा टक्क्यांनी नुकसानदायक ठरतोय. दुसरीकडे खाण्याची अंडी नरमली असली तरी सध्याचा दैनंदिन फार्म लिफ्टिंग दर उत्पादन खर्चाच्या तब्बल ५० टक्क्यांनी अधिक आहे.
कोमरला समूहाचे संचालक कृष्णचरण म्हणाले, की महाराष्ट्रातील पुणे, सांगली आणि नाशिक या तिन्ही विभागातील बाजार सुधारला आहे. प्लेसमेंट आणि अनुकूल हवामानामुळे वजनाच्या रुपाने झालेली उत्पादन वाढ बाजार वर जाण्यासाठी अडचणीची ठरत आहे. सध्या अडीच किलोचा माल बाजारात असून, त्यामुळे दबाव कायम असला तरी पुढे वाढत्या मागणीमुळे शिल्लक माल वेगाने चालला जाईल. डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात नाताळ, सुट्यांचा हंगाम आणि वर्षाखेर अशा खपाच्या मोठ्या इव्हेंट्समुळे चिकनचा जोरदार खप होईल. त्यामुळे सध्याचे बाजारभावातील मंदीचे सावट कमी होईल. तथापि, बाजाराकडून मोठ्या तेजीची अपेक्षा नसून, उत्पादन खर्चाच्या आसपासच दर राहतील.
एका दिवसाच्या पिलांचे बाजारभाव चालू सहा महिन्यात तरी फारसे कमी होणार नाहीत. मात्र, पुढील वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत म्हणजे जुलैपासून पुढे पिलांचा पुरवठा वाढून बाजार ३० रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो. पुढे २०१९ पासून पिलांचे दर वाजवी पातळीवर येण्याची अपेक्षा आहे. ब्रॉयलर्स ब्रीडर्स उद्योगातील उत्पादनाचे चक्र संतुलित करण्यासाठी सहा-सहा महिन्यांचा कालावधी लागतो. तिमाही किंवा सहामाहीत बदल होत नाहीत. २०१८ पासून सहा-सहा महिन्यांनी पिलांचा पुरवठा मागणीनुसार संतुलित होत जाईल. या काळात प्लेसमेंटवाढीचा दर नेमका किती राहतो, हे पिलांचा बाजारभाव ठरण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल, असे श्री. कृष्णचरण यांनी स्पष्ट केले.
लेअर (अंडी) उद्योगात तेजीमुळे समाधानकारक चित्र आहे. दरवर्षी पाच टक्के दराने वाढणारी देशांतर्गत मागणी, हिवाळ्यात 30 टक्क्यांनी खपात वाढ यामुळे अंड्यांचा बाजार वधारला. नोटाबंदीमुळे बाधित झालेले उत्पादनाचे चक्र, भाजीपाल्याची दरवाढ, सध्या शीतगृहात असलेला नीचांकी साठा यामुळेही बाजाराला बळ मिळाले. सध्या बाजार उच्चांकी पातळीवरून सुमारे २० टक्क्यांनी खाली आला. गेल्या आठवड्यात एकाच दिवसांत बाजार ३० रुपये प्रतिशेकड्याने खाली आला होता. मात्र, सध्याचा तेजीचा कल पुढील दोन महिने सुरू राहण्यासारखी परिस्थिती असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
ब्रॉयलर्सच्या बाजारात आश्वासक सुधारणा दिसत आहे. येत्या दिवसांत वाढत्या खपामुळे बाजाराला सध्याच्या भावपातळीवर चांगला आधार मिळेल. डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात परिस्थिती आणखीन सुधारले, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
प्रकार | भाव | परिमाण | बाजारपेठ |
ब्रॉयलर | ६० | प्रतिकिलो | नाशिक |
अंडी | ४६० | प्रतिशेकडा | पुणे |
चिक्स | ४१ | प्रतिनग | पुणे |
हॅचिंग एग्ज | ३३.५० | प्रतिनग | मुंबई |
मका | १२५० | प्रतिक्विंटल | सांगली |
सोयामिल | २१००० | प्रतिटन | इंदूर |
- 1 of 11
- ››