ब्रॉयलर्स बाजार दहा रुपयांनी उसळला, अंडीही तेजीत

अपेक्षेप्रमाणे बाजारात सुधारणा दिसली आहे. येत्या आठवड्यांत बाजारातील सुधारणा टिकून राहील आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बाजारात किफायती असेल. - डॉ. पी. जी. पेडगावकर, सचिव पीएफबीए.
पोल्ट्री समालोचन
पोल्ट्री समालोचन

ब्रॉयलर्सचा बाजार अपेक्षेप्रमाणे जोरदार उसळी घेतली असून, चारच दिवसांत प्रतिकिलोमागे २० टक्क्यांनी दरात सुधारणा झाली आहे. चालू आठवडा ते होळीपर्यंत बाजार सध्याच्या ६५ रु. प्रतिकिलोच्या पातळीवर स्थिरावेल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.  गेल्या आठवड्यात बेंचमार्क नाशिक विभागात ब्रॉयलरचे दर ५५ रु. प्रतिकिलोच्या पातळीवरून ६५ रु. प्रतिकिलोपर्यंत वधारले. गेल्या पंधरवड्यात नकारात्मक व निराधार बातम्यांमुळे खप कमी झाला होता आणि परिणामी बाजारभाव नरमले होते. संबंधित बातम्यातील फोलपण लक्षात आल्यानंतर ग्राहक पुन्हा चिकनकडे वळले आहेत. नाशिक येथील पोल्ट्री उद्योजक डॉ. अनिल फडके म्हणाले, ‘‘शनिवारी (ता. १७) नाशिक विभागात ६६ रु. प्रतिकिलोपर्यंत वरच्या दराने लिफ्टिंग झाले. बाजाराने चांगली सुधारणा दाखवली आहे. महाराष्ट्राशेजारील राज्यांतही बाजार वधारले आहेत. यापुढील काळात किरकोळ खपात वाढ अपेक्षित आहे. यामुळे सध्याची बाजारभावाची पातळी टिकून राहील.’’ पोल्ट्री ब्रीडर्स वेल्फेअर असोसिएशनचे सचिव डॉ. प्रसन्न पेडगावकर म्हणाले, की मागील सप्ताहात म्हटल्याप्रमाणे ब्रॉयलरच्या बाजारात सुधारणा झाली आहे. यापुढेही बाजारातील सुधारणा टिकून राहील आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बाजारात किफायती असेल. वातावरणातील हंगामी बदलांमुळे पक्ष्यांची विक्री वाढताना दिसत आहे. दुसरीकडे, खाद्यावरील खर्चात वाढ होत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. या दोन्हीं घटकांचा मार्च दुसऱ्या पंधरवड्यानंतर बाजारभावावर प्रभाव पडेल. दक्षिण भारतातील बाजारभावासंदर्भात कोमरला समूहाचे संचालक कृष्णचरण म्हणाले, की अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रासह दक्षिणेतील बाजारात सुधारणा होत आहे. खासकरून शिवरात्रीनंतर खपात वाढ झाली आहे. मागील चार दिवसांत तब्बल दहा रुपयांची किंवा २० टक्क्यांनी बाजारभाव वधारले आहेत. दक्षिणेत हैदराबाद ६६, बंगळूर ६८, सांगली ६२ असे दर असून, ६० रु. प्रतिकिलोच्या वर बाजार टिकला आहे. पुढचा आठवडा आणि होळीपर्यंत बाजार स्थिर राहणे अपेक्षित आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत हॅचिंग एग्जचे दर प्रतिनगामागे १ रु. कमी झाले आहेत, तर एका दिवसाच्या पिलाचे (चिक्स) दर ३ रुपयांनी नरमले आहेत. अंड्याचा पुणे लिफ्टिंग दर प्रतिशेकडा ८० रु. सुधारला आहे. कच्च्या मालात सोयामीलचे दर वर्षातील उच्चांकी पातळीवर आहेत. चिक्स नरमले; पण सोयामील वधारले ओपन फार्मर्सच्या दृष्टीने उत्पादन खर्च जैसे थे आहे. कारण, चिक्सचे बाजारभाव दहा रुपयांनीने कमी झाले असले, तरी महिनाभरातच सोयामील रूपाने एकूण खाद्यावरील खर्चात प्रतिकिलोमागे जवळपास २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. चिक्सचे दर हे कच्चा माल महागल्यावरही चढे राहू शकत नाहीत. सोयामीलमधील तेजी आणि चिक्सच्या दरातील घट ही कमी कालावधीत ज्या वेगाने झाली त्यावरून वरील बाब अधोरेखित होते.

प्रकार     भाव     परिमाण     बाजारपेठ
ब्रॉयलर     ६५     प्रतिकिलो नाशिक
चिक्स     ३४     प्रतिनग     पुणे
हॅचिंग एग्ज  ३३.५     प्रतिनग     मुंबई
अंडी     ४१० प्रतिशेकडा     पुणे
मका १११०     प्रतिक्विंटल देवळा
सोयामील     ३१९३०     प्रतिटन     इंदूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com