agriculture news in Marathi, broiler rates increased by 20 percent, Maharashtra | Agrowon

ब्रॉयलर्सच्या बाजारभावात २० टक्क्यांनी वाढ
दिपक चव्हाण
सोमवार, 18 डिसेंबर 2017

पक्ष्यांची वजने विक्रीयोग्य पातळीवर आली असतील तर माल न रोखता त्याची विक्री करणे अधिक शहाणपणाचे ठरेल. सर्वांनीच ३१ डिसेंबरसाठी गर्दी करणे सयुक्तिक होणार नाही.
- डॉ. पी. जी. पेडगावकर, सचिव, पीएफबीए.

आठवडभरात ब्रॉयलर्सच्या बाजारात जोरदार तेजी दिसली असून, २० टक्क्यांनी दर वधारले आहेत. दुसरीकडे पुरवठा सुरळीत झाल्यामुळे अंड्यांचे दर चार टक्क्यांनी नरमले आहेत.

श निवार (ता. १७) रोजी बेंचमार्क नाशिक विभागात ८० रु. प्रतिकिलोने ब्रॉयलर पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. आठ दिवसांत ६७ रु. वरून ८० रु.पर्यंत बाजार वधारला आहे. पुणे विभागात अंड्यांचे प्रतिशेकडा फार्म लिफ्टिंग बाजारभाव ४२१ वरून ४०५ रु.पर्यंत नरमले आहेत. नोव्हेंबर महिन्यात ब्रॉयलर पक्ष्यांचा बाजार मंदीत होता. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून बाजारात टप्प्याटप्प्याने सुधारणा होत गेली आहे. मार्गशीर्ष महिन्यात खप कमी होऊन बाजारभाव खाली जाण्याची धास्ती होती. मात्र, प्रत्यक्षात बाजाराने तेजी दाखवली आहे.

पोल्ट्री फार्मर्स अॅंड ब्रीडर्स असोसिएशनचे (पीएफबीए) सचिव डॉ. पी. जी. पेडगावकर म्हणाले, की अपेक्षेप्रमाणे बाजाराने तेजीची चाल पकडली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी २५ ते ३१ डिसेंबरदरम्यान माल काढण्याचे नियोजिन केले आहे. सध्या मागणी चांगली असतानाही पुरवठा कमी प्रमाणात दिसत आहे. जर पक्ष्यांची वजने विक्रीयोग्य पातळीवर आली असतील, तर माल न रोखता त्याची विक्री करणे अधिक शहाणपणाचे ठरेल. सर्वांनीच ३१ डिसेंबरसाठी गर्दी करणे सयुक्तिक होणार नाही.
नाशिक येथील पोल्ट्री उद्योजक अनिल फडके म्हणाले, की वातावरण वाढीसाठी अनुकूल असल्यामुळे सध्या मोठ्या पक्ष्यांची उपलब्धता अधिक दिसतेय. ओपन फार्मर्सकडील मालाची उपलब्धताही वाढली आहे. सध्याच्या जोरदार तेजीनंतर बाजारात थोडी नरमाई येऊ शकते. तथापि, मोठ्या खपाच्या इव्हेंट्समुळे एकूण बाजार किफायती राहील. 

अंड्याचे दर उच्चांकी पातळीवरून १५० रु. प्रतिशेकडाने खाली आले आहेत. गेल्या महिनाभरात टप्प्याटप्प्याने बाजारभाव खाली आले आहेत. तथापि, ३ रु. प्रतिनग उत्पादन खर्चाच्या तुलनेत अंड्यांना किफायती बाजारभाव मिळाला असून, गेल्या काही वर्षांनंतर प्रथमच सरासरी उत्पादन खर्चापेक्षा विक्री दर मोठ्या फरकाने अधिक राहिला आहे. यामुळे लेअर पोल्ट्री उद्योगाच्या नफ्या चांगली वाढ झाली आहे.

ब्रॉयलर्सचे बाजारभाव वधारल्यामुळे एका दिवसाच्या पिलांमधील तेजीलाही आधार मिळाला आहे. ४४ रु. प्रतिनग या उच्चांकी पातळीवर चिक्सचे दर स्थिरावले आहेत. हॅचिंग एग्जलादेखील ३३.५० रु. प्रतिनग असा उच्चांकी दर मिळत आहे. कच्चा माल स्वस्त असल्यामुळे सध्याचा पोल्ट्री फीडचा उत्पादन खर्च कमी असून, त्यातुलनेत ब्रॉयलर्सचा चांगला दर मिळत आहे. यामुळे चिक्स व हॅचिंग एग्जचे भाव तेजीत राहत आहेत. तथापि, चिक्स उच्चांकी पातळीवर असल्याने ओपन फार्मर्सचा एकूण उत्पादन खर्च वाढला आहे. 
 

प्रकार     भाव     परिमाण     बाजारपेठ
ब्रॉयलर     ८०     प्रतिकिलो     नाशिक
अंडी     ४०५     प्रतिशेकडा     पुणे
चिक्स     ४४     प्रतिनग     पुणे
हॅचिंग एग्ज  ३३.५०     प्रतिनग     मुंबई
मका     १२८०     प्रतिक्विंटल     सांगली
सोयामिल     २३,१००     प्रतिटन     इंदूर

   

 

इतर ताज्या घडामोडी
`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्‍त शिवार अभियानातंर्गत भूजल...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...
सांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...
नगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...
सोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...
नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...
सोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...
योग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...
नाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीतनाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश...
बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...
प्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...
ऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...
नामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...
वजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...
कोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...
हमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...