agriculture news in marathi, BSC Agri degree admission process from 11 june | Agrowon

कृषी पदवीसाठी प्रवेश प्रक्रिया ११ जूनपासून
टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 जून 2018

पुणे : राज्यातील कृषी पदवीच्या १५ हजार २२७ जागांसाठी यंदा प्रथमच सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी घेण्यात आल्यानंतर आता प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया ११ जूनपासून सुरू होत आहे. 

पुणे : राज्यातील कृषी पदवीच्या १५ हजार २२७ जागांसाठी यंदा प्रथमच सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी घेण्यात आल्यानंतर आता प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया ११ जूनपासून सुरू होत आहे. 

राज्यातील खासगी कायमस्वरूपी विना अनुदानित महाविद्यालयांच्या प्रवेश कोट्यातील प्रवेशदेखील यंदा गुणवत्तायादीतून होणार आहेत. २० टक्के कोट्यात जिल्हाबाहेरील विद्यार्थी येणार असून त्याविरोधात राज्य शासनाकडे व न्यायालयात दाद मागण्याची तयारी संस्थाचालकांनी सुरू केली आहे.
  
औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी प्रमाणेच कृषी पदवीसाठी सामायिक प्रवेश परीक्षा मंडळाने ११ मे रोजी पहिली सीईटी घेतली. राज्यात चार कृषी विद्यापीठांच्या अखत्यारित १८७ महाविद्यालयातून दहा विद्याशाखांचा पदवी अभ्यासक्रम शिकवला जातो. त्यात ३१ शासकीय, दोन अनुदानित आणि १५४ कायमस्वरूपी विना अनुदानित महाविद्यालयांचा समावेश आहे.  

बीएसस्सी कृषी, उद्यानविद्या, वनविद्या, कृषी अभियांत्रिकी, अन्नतंत्रज्ञान, सामाजिक विज्ञान, जैवतंत्रज्ञान, मत्सशास्त्र, पशुसंवर्धन याच अभ्यासक्रमांना व्यावसायिक दर्जा मिळालेला आहे. यातील कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रम अजूनही व्यावसायिक म्हणून जाहीर झालेला नाही. 

सामायिक प्रवेश परीक्षा मंडळ सध्या यातील मत्सशास्त्र, पशुसंवर्धन आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन हे तीन अभ्यासक्रम वगळून उर्वरित विद्याशाखांची प्रवेश प्रक्रिया सुरू करीत आहे. यंदा अनाथ उमेदवारांसाठी प्रथमच एक टक्के जागा राखीव ठेवल्या जात आहेत. 

महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रवींद्र जगताप यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आता परिषदेच्या संकेतस्थळावर प्रवेशाची माहिती आरक्षणासहीत जाहीर करण्यात आलेली आहे. त्यासाठी http://www.dtemaharashtra.gov.in / http://www.mcaer.org / maha-agriadmission.in या संकेतस्थळांवरून विद्यार्थ्यांना माहिती मिळणार आहे. 

११ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीची वाटप यादी २६ जूनला जाहीर होईल. तीन ऑगस्टला दुसऱ्या फेरीची यादी, ९ ऑगस्टला तिसऱ्या व १६ ऑगस्टला चौथ्या फेरीतील वाटप यादी जाहीर होईल. सर्व प्रवेश फेऱ्या झाल्यानंतर रिक्त जागेकरिता प्रवेश फेरीचे काम २७ ते ३० ऑगस्ट दरम्यान केले जाणार आहे. २७ ऑगस्टला वर्ग सुरू होतील तर १० सप्टेंबरला प्रवेश प्रक्रिया पूर्णतः समाप्त केली जाणार आहे.

इतर अॅग्रो विशेष
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...