agriculture news in marathi, bt cotton compainies worries for compensation | Agrowon

यंदा प्रादुर्भाव झाल्यास पुन्हा कंपन्याच भरपाई देणार का?
टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

नागपूर : गेल्या खरिपात बीटी कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. येत्या हंगामातदेखील तो कमी-अधिक प्रमाणात होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे या वर्षी पुन्हा बियाणे कंपन्यांकडून सरकार भरपाई घेणार का, असा प्रश्‍न बियाणे कंपन्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. भरपाई प्रकरणात मॉन्सॅन्टोला मोकळीक देण्याचा प्रकारही संशयास्पद असल्याचेही सीड असोसिएशनच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. 

नागपूर : गेल्या खरिपात बीटी कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. येत्या हंगामातदेखील तो कमी-अधिक प्रमाणात होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे या वर्षी पुन्हा बियाणे कंपन्यांकडून सरकार भरपाई घेणार का, असा प्रश्‍न बियाणे कंपन्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. भरपाई प्रकरणात मॉन्सॅन्टोला मोकळीक देण्याचा प्रकारही संशयास्पद असल्याचेही सीड असोसिएशनच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. 

राज्यात या वर्षी कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला, याची जबाबदारी घेत बियाणे कंपन्यांनी हेक्‍टरी १६ हजार रुपयांची मदत करावी, असे राज्य सरकारने सांगितले आहे. कंपन्यांनी मात्र सरकारच्या या भरपाई धोरणाला आक्षेप घेतला. भरपाई प्रकरणात सरकारने केवळ बियाणे डीलर आणि कंपन्यांनानाच दोष नसताना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

बियाणे उगवणशक्‍ती आणि त्याला बोंडधारणा योग्य आहेत; मग बियाणे कंपन्या दोषी कशा? बोंड अळी येण्यामागे तंत्रज्ञानाचे अपयश सरकारने दुर्लक्षित केले. या वर्षी पुन्हा बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला, तर मग पुन्हा बियाणे कंपन्याच भरपाई देणार का, असा मुद्दा सीड असोसिएशनकडून मांडण्यात आला आहे. त्यामुळे बीजी-२ तंत्रज्ञानावरील मॉन्सॅन्टोकडून आकारले जाणारे शुल्क रद्द करावे, अशी मागणी आहे. 

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
वारणा नदीवरील बंधारा दुरुस्तीमुळे...कोल्हापूर  : वारणा नदीवरील विविध बंधाऱ्यांची...
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...