agriculture news in marathi, bt cotton purity test doing in latur, maharashtra | Agrowon

‘बीटी’ बियाण्याची लातूर येथे होणार अनुवंशिक शुद्धता पडताळणी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 28 मे 2018

परभणी  ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत लातूर येथील कृषी जैवतंत्र महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेमध्ये कपाशीच्या बीटी तसेच नाॅन बीटी बियाण्याची अनुवंशिक शुद्धता (डीएनए फिंगर प्रिंटिंग) पडताळणी करण्यासाठी कृषी आयुक्तालयाने मान्यता दिली आहे. यामुळे कपाशीच्या बियाण्यातील भेसळ तसेच बोगस बियाणे ओळखण्यास मदत होणार आहे. वाणांचा दर्जा राखण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे, अशी माहिती कुलगुरू डाॅ. बी. व्यंकटेश्वलू यांनी दिली.

परभणी  ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत लातूर येथील कृषी जैवतंत्र महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेमध्ये कपाशीच्या बीटी तसेच नाॅन बीटी बियाण्याची अनुवंशिक शुद्धता (डीएनए फिंगर प्रिंटिंग) पडताळणी करण्यासाठी कृषी आयुक्तालयाने मान्यता दिली आहे. यामुळे कपाशीच्या बियाण्यातील भेसळ तसेच बोगस बियाणे ओळखण्यास मदत होणार आहे. वाणांचा दर्जा राखण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे, अशी माहिती कुलगुरू डाॅ. बी. व्यंकटेश्वलू यांनी दिली.

बीटी कपाशी बियाण्यातील भेसळीमुळे गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनुवंशिक शुद्धता पडताळणीमुळे बीटी तसेच नाॅन बीटी कपाशीच्या बियाणातील बेसळ, बोगस बियाणे ओळखता येते. त्यादृष्टीने कृषी आयुक्तालयाने लातूर येथील कृषी जैवतंत्र महाविद्यालयातील प्रयोगशाळेमध्ये कपाशी वाणांच्या बियाण्याची अनुवंशिक शुद्धता पडताळणीसाठी यंदा मान्यता दिली आहे.

त्यासाठी बियाणे उत्पादक कंपनीकडून कपाशीच्या वाणांचा अनुवंशिक डाटा, वाण तसेच त्यांचे दोन पॅरेंट असे एकूण तीन बियाणे नमुने घेतले जात आहेत. आजवर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यातील बीटी कापूस बियाणे उत्पादक १५ कंपन्यांनी सुमारे ३५० बियाणे नमुने प्रयोगशाळेकडे जमा केले आहेत.

पडताळणीनंतर बियाणे उत्पादक कंपनीला प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यानंतर बियाणे विक्री करता येईल. पडताळणीमुळे बियाणे उत्पादक कंपन्यांकडून केले जाणारे तंत्रज्ञान चोरी तसेच फसवेगिरीचे प्रकार उघडकीस येऊ शकतात.

कपाशीच्या बीटी, नाॅन बीटी सर्व वाणांचा जनुकीय नकाशा तयार केला जाणार आहे. तूर्त कपाशीच्या बियाण्याची पडताळणी केली जात असली, तरी आगामी काळत अन्य पिकांचीदेखील पडताळणी केली जाऊ शकते. सद्यःस्थितीत कृषी विभागाकडे जैवतंत्रज्ञ कृषी अधिकाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जैवतंत्रज्ञान पदवीधरांची बियाणे गुणवत्ता निरीक्षक म्हणून नियुक्त करणे आवश्यक आहे असे लातूरच्या कृषी जैवतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत पाटील यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...