agriculture news in marathi, BT cotton rates decision will be taken on 5 march | Agrowon

बीटी कापूस बियाणे दरावर ५ मार्चला निर्णय
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 मार्च 2018

नागपूर : येत्या हंगामात शेतकऱ्यांना कमी दराने बीटी कापूस बियाणे पुरवण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर २२ फेब्रुवारीला या संदर्भाने पहिली बैठक पार पडली. त्यानंतर आता या संदर्भाने अंतिम निर्णय घेण्याकरिता ५ मार्चला बैठक होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

नागपूर : येत्या हंगामात शेतकऱ्यांना कमी दराने बीटी कापूस बियाणे पुरवण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर २२ फेब्रुवारीला या संदर्भाने पहिली बैठक पार पडली. त्यानंतर आता या संदर्भाने अंतिम निर्णय घेण्याकरिता ५ मार्चला बैठक होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

देशात सुरवातीला बोलगार्ड-१ तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. त्यानंतर विविध प्रकारच्या बोंड अळीला बोलगार्ड-२ हा जिन प्रतिकारक असल्याचे सांगत या तंत्रज्ञानाच्या प्रसारणालादेखील मान्यता देण्यात आली. सुरवातीला ९४० रुपये दराने बीटी बियाण्याची विक्री झाली. त्यानंतर सरकारने हस्तक्षेप करत हे दर ८०० रुपये प्रतिपाकटी इतके खाली आणले. दरम्यान, गेल्या खरिपात देशात सर्वदूर बीजी-२ तंत्रज्ञानावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला.

महाराष्ट्रातदेखील बोंड अळीने कपाशी उत्पादक पूरता उद्ध्वस्त झाला. त्यानंतर बोलगार्ड-२ तंत्रज्ञान बोंड अळीला बळी पडत असल्याचा मुद्दा चर्चेत आला. बोंड अळीचा प्रादुर्भाव हे तंत्रज्ञानाचे अपयश असल्याचे सांगत नॅशनल सिड असोसिएशनने यापोटी महिको मोन्सॅटोला देण्यात येणारे प्रतिपाकीट ४९ रुपयाचे तंत्रज्ञान शुल्क रद्द करण्याची मागणी केली. त्याकरिता केंद्र व राज्य सरकार स्तरावर असोसिएशनकडून पाठपुरावा सुरू आहे. २२ फेब्रुवारीला तंत्रज्ञान पुरवठादार महिको मोन्सॅटो तसेच नॅशनल सिड असोसिएशनच्या वतीने आपली बाजू मांडण्यात आली.

सरकार दर कमी करण्यासाठी आग्रही
बीटी बियाणे दर नियंत्रण समिती केंद्र सरकारने गठित केली आहे. संयुक्‍त सचिव (बियाणे) अश्‍वनी कुमार हे या समितीचे अध्यक्ष आहेत. ही समिती येत्या हंगामासाठी बीटी बियाणे दराचा पुनर्विचार करून ते कमी करण्यासाठी आग्रही असल्याचे सूत्र सांगतात. दरम्यान, कंपन्यांनी मात्र बियाणे दर कमी करण्याला विरोध करत तंत्रज्ञान शुल्क हटवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असा रेटा लावला आहे. समितीची पुढील बैठक पाच मार्चला होणार असून, या बैठकीत बीटी बियाणे दराबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचे सूत्र सांगतात. 

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...