गुणनियंत्रणात कृषी विभाग नापास
विनोद इंगोले
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

अमेरिकेत संकरित वाणाऐवजी सरळ वाणामध्ये बि. टी. आहे. आपल्याकडे मात्र संकरित वाणात आहे. दरवर्षी बियाणे नंतर खत, कीटकनाशक घ्यावीच लागली पाहिजे आणि शेतकऱ्यांना लुटता आल पाहिजे, याकरिता कंपन्यांनी हा पॅटर्न रुजविला. या चक्रव्यूहात शेतकरीरुपी अभिमन्यू फसला आता त्याला बाहेरच पडता येत नाही, अशी स्थिती आहे. 
- विजय जावंधिया, शेतीप्रश्‍नाचे अभ्यासक, नागपूर

शेती झाली विषारी... भाग 5

यवतमाळ : बोंडअळीसोबतच मुख्य पीक सुरक्षीत ठेऊन तणांचे नियंत्रण करणारे नवे तंत्रज्ञान राउंडअप रेडी बिटीच्या चाचण्या सुरू आहेत. चाचणी प्रक्षेत्रावरील हीच बिटी यवतमाळ जिल्ह्यात सर्रास चोर बिटी म्हणून विकल्या गेली. तणावरचा चार हजार रुपयांचा खर्च वाचतो म्हणून गुजरातेतून आयात झालेल्या या बिटीची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगीतले जाते. 

यवतमाळ जिल्ह्यात ४ लाख ७० हजार हेक्‍टर क्षेत्रावर बि. टी. कापूस आहे. राउंडअपरेडी बियाण्यांचा सोशल मीडियावरून खुलेआम प्रसार झाला. पाकिस्तानमधील हे उत्पादनक्षम वाण असून भारतात याला परवानगी नसल्याचे सोशल मीडियावरील त्या पोस्टमध्ये नमूद होते. या बियाण्याकरिता संपर्कासाठी एका व्यक्‍तीचा मोबाईल क्रमांकही देण्यात आला होता. अमरावती विभागीय गुणनियंत्रण विभागाकडे देखील ही पोस्ट पोचली. त्यांनी कृषी आयुक्‍तालय स्तरावरील गुणवत्ता नियत्रंण विभागाकडे हे प्रकरण चौकशीसाठी पाठविले. मात्र हंगामात सर्वदूर या अवैध बि.टी.ची लागवड झाली, परंतु आजवर कृषी खात्याच्या गुणनियंत्रणाची चौकशी पूर्ण झाली नाही.

याप्रकरणी संबंधीत मोबाईल क्रमांकधारकावर देखील कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही किंवा साधी चौकशीदेखील कृषी विभागाने केली नाही. त्यावरूनच अवैध बियाणे आणि निविष्ठांना संरक्षण देण्याचे कृषी खात्याचे धोरणच स्पष्ट होते. 

९०० ते १२०० रुपयांत अवैध बि.टी. बियाण्याचे पाकीट विकल्या गेले. निंदणाचा मजुरी दर २०० रुपये आहे. त्यानुसार एकरी चार हजार रुपयांचा निंदणावरचा खर्च वाचतो म्हणून याची लागवड जिल्ह्यात झाली; पण याकडे देखील स्थानिक, विभागीय आणि राज्यस्तरीय गुणनियंत्रण विभागाचे दुर्लक्ष झाले. कृषी विभागाचा हाच निष्काळजीपणा शेतकऱ्यांच्या जीवावर बेतला. 

उत्पादन झालेच कसे 
मोदींच्या गुजरातमधूनच राउंडअपरेडी बियाणे पोचले, अशी चर्चा आहे. त्याचे उत्पादनच कसे झाले? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कृषी विद्यापीठांनी भारतीय शेतीलापूरक असे तंत्रज्ञान उपलब्ध कररून दिले नाही. त्यामुळे विदेशी तंत्रज्ञानावर आपल्याला निर्भर राहावे लागले. अमेरिकेत संकरीत वाणाऐवजी सरळ वाणामध्ये बि. टी. आहे. आपल्याकडे मात्र संकरीत वाणात आहे. दरवर्षी बियाणे नंतर खत, कीटकनाशक घ्यावीच लागली पाहिजे आणि शेतकऱ्यांना लुटता आल पाहिजे याकरिता कंपन्यांनी हा पॅटर्न रुजविला. सरकारने देखील सरळ वाणात बि. टी.चा अंतर्भाव करण्याची सक्‍ती कंपन्यांना केली नाही. पाच हजार कोटीची बि. टी. बियाणे कंपन्यांची उलाढाल आहे, असे शेतीप्रश्नाचे अभ्यासक विजय जावंधिया यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले... सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप...
केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान... जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा...
परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
शिरूर तालुक्यातील पिकांचे पावसामुळे... रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील...
जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र... जळगाव :  जिल्ह्यात मागील चार ते पाच...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे सोधी...वाशीम : संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने राबविण्यात...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली, दर स्थिरपुणे : पावसामुळे मार्केट यार्ड येथील...
सिंचन प्रकल्पांसाठी ७१८० कोटींचे... मुंबई ः महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त...
आमचे पैसे दंडासह परत करा ः...अकोला ः कृषी व संलग्न विषयांमध्ये अाचार्य पदवी...
पुणे जिल्ह्यातील सोळा धरणे तुडुंबपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून परतीच्या...
वैद्यकीय महाविद्यालयांतील तज्ज्ञांचे... यवतमाळ : कपाशीवर कीटकनाशकांची फवारणी करताना...
कापूस उत्पादनात घटीसोबत दरातही दिवाळेऔरंगाबाद : सोयाबीनची सोंगणी व कापसाची पहिली वेचनी...
कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात ः...पुणे : कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली...
नाशिक विभागात कांदा चाळींसाठीचा निधी... नाशिक : कांदा साठवणुकीची सोय नसल्याने...
जळगाव जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारीची कापणी... जळगाव : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
गावातील कारभाऱ्यांकडून हायटेक प्रचार सातारा ः जिल्ह्यातील २६० ग्रामपंचायतींच्या...
‘स्वाभिमानी’ने केले हंगामा अांदोलन बुलडाणा ः संग्रामपूर तालुक्यात या हंगामात तूर...
सांगली जिल्ह्यातून परदेश दौऱ्यांसाठी ४७...सांगली ः तीन वर्षांच्या खंडानंतर शेतकऱ्यांची...
औरंगाबाद, जालना , बीड जिल्ह्यांत रब्बी...औरंगाबाद  : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व...
अमरावती विभागातील महसूल कर्मचाऱ्यांचा... अकोला : महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेले काम बंद...