agriculture news in marathi, BT cotton seeds much more in states says Agri department | Agrowon

बीटी बियाणे भरपूर; पण धुळपेरणी टाळा
टीम अॅग्रोवन
रविवार, 18 मार्च 2018

पुणे : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळण्यासाठी शासन दक्षता घेत आहे. तथापि, गुलाबी बोंड अळीच्या संकटामुळे शेतकऱ्यांनी यंदा कपाशीची धुळपेरणी टाळावी, असा आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

पुणे : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळण्यासाठी शासन दक्षता घेत आहे. तथापि, गुलाबी बोंड अळीच्या संकटामुळे शेतकऱ्यांनी यंदा कपाशीची धुळपेरणी टाळावी, असा आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

राज्याचे कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी बीटी कापूस बियाण्यांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला असून, दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेसे मिळण्याबाबत सूचना दिल्या आहेत. "बीटी बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची मागणी १६० लाख पाकिटांची गृहीत धरण्यात आली आहे. मात्र, उपलब्धता १९० लाख पाकिटांपर्यंत राहील, असे आमच्या यंत्रणेचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी परराज्यातील किंवा शंकास्पद बियाणे अजिबात विकत घेऊ नये़, तसेच धुळपेरणी टाळावी. यामुळे गुलाबी बोंड अळीच्या विरोधातील मोहीम प्रभावीपणे राबविता येईल," असे कृषी आयुक्तांनी सांगितले. 

"बीटी बियाणे यंदा कमी मिळेल किंवा गेल्या हंगामात बोंड अळी वाढल्यामुळे यंदा बियाण्याला दर्जा नसेल, अशा अफवांवर शेतकऱ्यांनी अजिबात विश्वास ठेवू नये. शंकास्पद बियाणे लक्षात येताच त्वरित कृषी विभागाला कळवावे. यामुळे बोगस बियाण्यांची विक्री रोखून चांगल्या बियाण्यांची बाजारातील उपलब्धता वाढविण्याच्या कृषी विभागाचा हेतू यशस्वी होईल," असे कृषी विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. शासनाची मान्यता नसलेले बीटी बियाणे परराज्यांतून शेतकऱ्यांपर्यंत येण्याची शक्यता कृषी विभागाने गृहीत धरलेली आहे.

गेल्या हंगामात सहा लाखांहून अधिक एचटी (हर्बिसाईड टॉलरन्ट) कपाशी बियाणे राज्यात आले होते. या बियाण्याला केंद्र शासनाने मान्यता दिलेली नाही. तथापि, शेतकऱ्यांना या बियाण्यांची विक्री कोणी केली, याचा तपास लावण्यासाठी राज्य शासनाने आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांची एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन केली आहे. गुलाबी बोंड अळीचा समूळ नायनाट झालेला नाही. त्यामुळे धुळपेरणी केल्यानंतर पावसाचा ताण बसल्यास नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. शेतकऱ्यांनी त्यासाठी यंदा कपाशीची धुळपेरणी टाळण्याची गरज आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलडाणा या भागात धुळपेरणी होते. त्यामुळे आम्ही स्थानिक कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी सूचना दिल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

बोंड अळीचे संकट कायम असल्याने सल्ला पाळावा 
गेल्या हंगामात कपाशीचे पीक शेतात उभे असतानाच गुलाबी बोंड अळी वाढण्याचे संकेत मिळाले होते. त्यामुळे फरदळ (कपाशीचे दुहेरी किंवा तिहेरी पीक घेण्याची पद्धत) पीक न घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले होते. मात्र, अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी नेहमीसारखेच फरदळ पीक घेण्याचा प्रयत्न केला. परिणामी उत्पादनात ५० ते ८० टक्क्यांपर्यंत घट आली होती. गुलाबी बोंड अळीचे संकट यंदाही कायम आहे. त्यामुळे कृषी विभागाचा धुळपेरणी न करण्याचा दिलेला सल्ला ऐकावा, अन्यथा धुळपेरणी करणारी गावे अडचणीत येऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...