agriculture news in marathi, bt cotton seeds requirement, dhule, maharashtra | Agrowon

धुळे जिल्ह्याला १४ लाख बीटी बियाणे पाकिटांची गरज
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 एप्रिल 2018
 
धुळे  ः जिल्ह्यात कापूस लागवड यंदा रोडावण्याचे संकेत असले तरी कृषी विभाग जेवढे क्षेत्र मागील वर्षी होते, तेवढीच लागवड होईल हे गृहीत धरून बीटी बियाण्यांचा पुरवठा करण्याची तयारी करीत आहे. त्याअनुषंगाने सुमारे १४ लाख बीटी बियाणे पाकिटांची गरज जिल्ह्याला असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 
 
जिल्ह्यात मागील हंगामात सुमारे दोन लाख हेक्‍टरवर कापूस लागवड झाली होती. अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजेच १०५ टक्के लागवड झाली होती. यंदा सुमारे १० ते १२ टक्के लागवड कमी होईल, असा अंदाज काही बियाणे पुरवठादार व कृषी केंद्रचालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.कारण कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. त्यात एवढे नुकसान झाले, की कापूस पिकासाठीचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले.
 
त्यात जिल्ह्यातील शिरपूर, धुळे भागातील ज्या शेतकऱ्यांनी देशी कापूस वाणांची लागवड केली, त्यांना बऱ्यापैकी उत्पादन हाती आले. तसेच, अनेक शेतकऱ्यांनी कृषी संस्थांच्या कापूस वाणांची लागवड केली होती, त्यांनाही उत्पादन मिळाले. त्यामुळे शिरपूर, शिंदखेडा व धुळे भागात देशी कापूस वाणांची लागवड अधिक होऊ शकते. काही खासगी संस्थाही देशी वाणांच्या संदर्भात शिंदखेडा व शिरपूर भागात दाखल झाल्या आहेत.
 
अर्थात, देशी कापूस वाणांची फक्त तीन टक्के मागणी होती, ती या हंगामात सुमारे १५ ते १८ टक्के राहू शकते. बीटी कापूस बियाण्यांची मागणी ९५ टक्‍क्‍यांवरून ८३ ते ८५ टक्‍क्‍यांवर येऊ शकते. देशी कापूस वाण जिल्ह्यात वेळेत उपलब्ध होत नाहीत. म्हणून त्यांचा पुरवठा लवकर व्हायला हवा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
 
पूर्वहंगामी कापूस लागवड जिल्ह्यात सुमारे १५ ते १६ हजार हेक्‍टरपर्यंत असणार आहे. शिरपूर व शिंदखेडा भागातील तापीकाठ आणि धुळे तालुक्‍यातील नेर, कुसुंबे, कापडणे भागात ही लागवड असेल, अशी माहिती मिळाली. 
 

इतर ताज्या घडामोडी
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...