agriculture news in marathi, BT Seed Report, Dhananjay Munde | Agrowon

बीटी बियाणे अहवाल दडपला : धनंजय मुंडे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

मुंबई : बीटी बियाण्याला बोंड अळी दाद देत नाही. त्यामुळे त्यातून शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते, असा स्पष्ट अहवाल केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने डिसेंबर २०१५ मध्ये शासनाला दिला होता. हा अहवाल शासनाने जाणीवपूर्वक दडपला, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

मुंबई : बीटी बियाण्याला बोंड अळी दाद देत नाही. त्यामुळे त्यातून शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते, असा स्पष्ट अहवाल केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने डिसेंबर २०१५ मध्ये शासनाला दिला होता. हा अहवाल शासनाने जाणीवपूर्वक दडपला, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

‘‘दैनिक ‘अॅग्रोवन’ने अगदी सुरवातीपासून सातत्याने हा विषय लावून धरला आहे. या अहवालाकडे सरकारने दुर्लक्ष केले. यामुळे कोणत्याच उपाययोजना झाल्या नाहीत. म्हणूनच बीटी बियाण्यावरील प्रादुर्भावामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले. सरकारनेच शेतकऱ्यावर हे संकट आणले. यामुळे हा एक मोठा कॉटन सीड स्कॅम असून, त्याची चौकशी झाली पाहिजे,’’ अशी मागणीही मुंडे यांनी केली आहे.

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने राज्य सरकारला बीटी बियाणासाठी दिलेल्या अहवालावर सरकार काहीच कार्यवाही करत नाही, ही बाब लक्षात आल्याने आपण शासनाला ६ जुलै रोजी पत्र लिहून माहिती दिली होती. या पत्राची एक प्रत मुंडे यांनी मुख्यमंत्र्यासोबतच कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनाही पाठवली होती. मात्र त्याची दखल घेतली नाही असे मुंडे यांचे म्हणणे आहे.

जर सरकारने आपल्या पत्राची दखल घेतली असती तर आज राज्यातील बीटी बियाण्यावरील प्रादुर्भावामुळे झालेली जीवितहानी आणि आर्थिक हानी टाळता आली असती. यामुळे आज बीटी बियाणांच्या प्रादुर्भावामुळे जे नुकसान झाले आहे, त्यासाठी पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. सरकारने केंद्रीय कापूस संशोधन अहवालाकडे दुर्लक्ष केले असल्याने हा एक मोठा ‘कॉटन सीड स्कॅम’ असून, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
मार्चअखेरपर्यंत टप्प्याटप्याने... मंदीतील ब्रॉयलर्सचा बाजार मार्चअखेरपर्यंत...
पुण्यात लसूण, फ्लॉवर, मटार वधारलापुणे ः वाढता उन्हाळ्यामुळे शेतीमालाचे उत्पादन...
चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये...चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति...
राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍...पुणे : सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी...
सत्तावीस कारखान्यांकडून १ कोटी २१ लाख... नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या...
पुणे जिल्ह्यातील १०० मंडळांमध्ये... पुणे  ः हवामान अंदाजाबाबत अचूक माहिती...
लाचखोर तालुका कृषी अधिकारी 'लाचलुचपत'...अकोला : जलसंधारणाच्या केलेल्या कामांची देयके...
परभणी जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे परभणी ः पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे...
स्वखर्चाने शेततळे करणाऱ्यांना मिळेना...औरंगाबाद : शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून...
कोल्हापुरात गुळाचे पाडव्यानिमित्त सौदे कोल्हापूर : येथील बाजार समितीत पाडव्यानिमित्त...
साखरेप्रमाणे कापसासाठी धाेरण ठरवावे :...पुणे : साखरेप्रमाणेच कापसासाठी दरावर लक्ष कें....
राज्यात आज अन्नत्याग आंदोलनमाळकोळी, नांदेड ः आजवर आत्महत्या केलेल्या...
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
परभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
औरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद  : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
पशू सल्लागोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना...
सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ... सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ...
जळगावमधील शेतकऱ्यांचा परदेश अभ्यास दौरा... जळगाव : परदेशातील शेतीचे तंत्रज्ञान, शेती,...