agriculture news in marathi, BT_cotton seeds availability in state for Kharif season | Agrowon

यंदा बीटी कापूस बियाणे मुबलक : कृषी विभाग
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 एप्रिल 2019

पुणे : राज्याच्या कापूस उत्पादक भागातील शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात बीटी कापूस बियाण्यांचा मुबलक पुरवठा होण्याची शक्यता आहे. बियाणे कंपन्यांच्या नियोजनानुसार एकूण सव्वादोन कोटी कापूस बीटी पाकिटांचा पुरवठा होईल. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा आठ लाख पाकिटे जादा असतील, अशी माहिती कृषी विभागाने दिली. 

पुणे : राज्याच्या कापूस उत्पादक भागातील शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात बीटी कापूस बियाण्यांचा मुबलक पुरवठा होण्याची शक्यता आहे. बियाणे कंपन्यांच्या नियोजनानुसार एकूण सव्वादोन कोटी कापूस बीटी पाकिटांचा पुरवठा होईल. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा आठ लाख पाकिटे जादा असतील, अशी माहिती कृषी विभागाने दिली. 

राज्यात सरासरी ४१ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड केली जाते. विदर्भ, मराठवाडा व खानदेशात कोरडवाहू भागाचे मुख्य पीक बनलेल्या कपाशीमुळे कोट्यवधी रुपयांच्या बाजारपेठा तयार झाल्या आहेत. त्यामुळे बियाणे, खते, कीटकनाशके उत्पादक कंपन्या तसेच जिनिंग उद्योगाला चालना मिळाली आहे. मात्र, २०१७ च्या हंगामात आलेल्या गुलाबी बोंड अळीमुळे शेतकऱ्यांसह सर्व उद्योगांना मोठा फटका बसला.  

गेल्या हंगामाप्रमाणेच यंदादेखील कपाशीची लागवड तेजीत राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे लागवडदेखील ३८ लाख हेक्टरच्या पुढे जाईल. कपाशीला सहा हजार रुपये प्रतिक्विंटलच्या पुढे मिळणारा भाव, बोंड अळीवर आलेले नियंत्रण यामुळे शेतकरी यंदा पेरा वाढवतील, असा अंदाज आहे. त्यामुळेच गेल्या हंगामाच्या तुलनेत राज्यात यंदा बीटी बियाण्यांचा पुरवठा आठ लाख पाकिटांनी वाढविण्याचा प्रयत्न आमचा आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 
 बीटी बियाणे उत्पादनातील सर्व प्रमुख कंपन्यांनी आपले बियाणे वितरण नियोजन आराखडे तयार केलेले आहेत. गेल्या हंगामात राज्याभरात २८ कंपन्या होत्या. गेल्या हंगामासाठी दोन कोटी २० लाख बीटी पाकिटांचे नियोजन केले गेले. यंदा किमान दोन कोटी २८ लाख पाकिटांपर्यंत पुरवठा नियोजन झाल्यामुळे कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये अडचणी येणार नाहीत, असे कृषी विभागाला वाटते. 

राज्याच्या गुण नियंत्रण विभागाचे संचालक विजयकुमार इंगळे, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी केशव मुळे, मुख्य बियाणे निरीक्षक चंद्रकांत गोरड यांच्याकडून बियाण्यांच्या पुरवठा नियोजनाचा आढावा घेण्यात आला आहे. ‘यंदा सर्वांत जास्त बीटी बियाण्यांचा पुरवठा राशी सीडस् कंपनीकडून राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अजित, अंकूर, नुझिविडू कंपन्या देखील भरपूर प्रमाणात पुरवठा करण्याची चिन्हे आहेत,’ असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

गरजेपेक्षाही ८० लाख जादा पाकिटे
बीटी कापूस बियाण्यांच्या एकूण पुरवठ्यापैकी प्रमुख कंपन्यांकडून दीड कोटी पाकिटांच्या आसपास पुरवठा होण्याचा अंदाज आहे. अंदाजे राशी कंपनीकडून ३२ लाख पाकिटे, अजित सीडसकडून २० लाख, अंकूरकडून २७ लाख, तर नुजिविडू २६ लाख पाकिटांचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. तसेच महिको कंपनीकडून ११ लाख पाकिटांची उपलब्धता होण्याची शक्यता आहे. ‘मुळात राज्यातील शेतकऱ्यांची प्रत्यक्ष गरज पावणेदोन कोटी पाकिटांच्या आतच असते. त्यामुळे गरजेपेक्षाही ७०-८० लाख पाकिटे जादा आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा चांगल्या वाणांची खरेदी करावी. उत्पादनवाढीसाठी चांगले नियोजन करावे,’ असे मराठवाड्यातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

 

इतर अॅग्रो विशेष
वर्धा : रोजगारासाठी स्थलांतरामुळे गावं...वर्धा : शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून...
गावाेगावी पाण्याच्या टॅंकरकडं नजरानगरः तलाव, धरणं कोरडी पडली. कधीच आटल्या नाहीत,...
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची माहिती...मुंबई : दुष्काळासंदर्भात उत्तर देण्यासाठी...
सत्तर कारखान्यांना बजावली 'आरआरसी'पुणे : राज्यातील १९५ साखर कारखान्यांकडून...
सेवानिवृत्तीनंतर शिक्षकाची शेतीत सेवा...आयुष्यभर नोकरी करताना अनेक गोष्टींचा त्याग करावा...
पतआराखड्याची वाट न बघता खरिपासाठी कर्जपुणे : खरीप पीक कर्जवाटप नियोजनात मुख्य भूमिका...
गिलक्‍याने दिले अर्थकारणाला बळबाजारपेठेची गरज ओळखून कठोरा (ता. जि. जळगाव) येथील...
जरंडीत ‘एक गाव, एक वाण’ योजना फसलीनागपूर ः कापसाचे एक गाव एक वाण लावण्याचा आदर्श...
उन्हाचा चटका कायम राहणार पुणे : विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी...
आया मौसम बदली कामार्च ते मे हे तीन महिने शासकीय अधिकारी-...
आगीपासून वन वाचविण्याचा करूया निर्धारजंगलातील वाळलेला पालापाचोळा हा ज्वलनशील पदार्थ...
उद्योगाला साखर कडूचमहाराष्ट्रातील गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली...
‘एफआरपी'साठी शेतकरी संघटना पुन्हा...सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या...
विदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली २३...वर्धा जिल्ह्यात केळी पिकाला पुन्हा गतवैभव प्राप्त...
भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसन...पुणे : भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसनाची...
वर्षभरात पाच हंगामात दर्जेदार कोथिंबीरपाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे...
राज्यात आता पीकविमा शेतकरी सहभाग अभियानपुणे: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी यंदा...
छावण्यातील जनावरांची आठवड्यातून एकदा...मुंबई ः दुष्काळी भागातील चारा छावण्यांमधील...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला मागणीकोल्हापूर: निर्यातीच्या बाबतीत पिछाडलेल्या...
शुक्रवारपर्यंत उष्ण लाटेचा इशारापुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने चटका असह्य...