agriculture news in marathi, Build a specialist with coconut fruit grapes | Agrowon

मोसंबी फळगळीबाबत तज्ज्ञ बांधावर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

औरंगाबाद : मराठवाड्यातील मोसंबीच्या संकटात सापडलेल्या आंबे बहाराची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. २९) पैठण तालुक्‍यात पाहणी केली. या पाहणीत तज्ज्ञांनी फळगळीच्या कारणांचा शोध घेतला असता विविध कारणे पुढे आली. त्यावर उपायही सुचविले गेले. कारणांच्या स्पष्टतेसाठी आणखी काही भागात प्रत्यक्ष बागेत जावून पाहणी केली जाणार आहे. या पाहणीदरम्यान मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना शासनाकडून मदत देण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.

औरंगाबाद : मराठवाड्यातील मोसंबीच्या संकटात सापडलेल्या आंबे बहाराची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. २९) पैठण तालुक्‍यात पाहणी केली. या पाहणीत तज्ज्ञांनी फळगळीच्या कारणांचा शोध घेतला असता विविध कारणे पुढे आली. त्यावर उपायही सुचविले गेले. कारणांच्या स्पष्टतेसाठी आणखी काही भागात प्रत्यक्ष बागेत जावून पाहणी केली जाणार आहे. या पाहणीदरम्यान मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना शासनाकडून मदत देण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.

मराठवाड्यातील मोसंबीचे पीक सर्वात महत्त्वाचे. या फळपिकाच्या आंबे बहारावर यंदा फळगळीचं मोठ संकट ओढवलं आहे. गतवर्षीपर्यंत पाच ते दहा टक्‍क्‍यांपर्यंत असणारी ही फळगळ यंदाच्या आंबे बहारात २० ते ५० टक्‍क्‍यांपर्यंत पोहचली आहे.

‘ॲग्रोवन’ने बुधवारी (ता. २९) मोसंबीच्या आंबे बहाराच्या परिस्थीतीसह शेतकऱ्यांच्या मागणीविषयीचे वृत्त प्राधान्याने प्रकाशीत केले. त्या वृत्ताची दखल घेत संकटात सापडलेल्या मोसंबी उत्पादकांना उपाय सुचविण्यासाठी बुधवारीच मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. एम. बी. पाटील, राष्‌ट्रीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. एस. बी. पवार, वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. गजेंद्र जगताप, कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्वर ठोंबरे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब पायघन, मंडळ कृषी अधिकारी रामनाथ कारले, वसंतराव कातबने, संदीप जवने आदींनी पैठण तालुक्‍यातील मोसंबी उत्पादकांच्या बांधांवर जावून मोसंबीच्या अवस्थेची पाहणी केली.

या पाहणीदरम्यान लोहगाव येथे शेतकरी विजय रेंधे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी फळगळ झालेल्या शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीप्रकरणी शासनाने मदत देण्याची मागणी केली.

फळगळीची तज्ज्ञांच्या निदर्शनास आलेली कारणे
संतुलित खत वापराचा अभाव
लागवडीचे अंतर शिफारशीनुसार नसणे
माती परीक्षणावर भर नसणे
पावसाच्या खंडाचाही परिणाम
हवामानातील बदलाचा परिणाम
गरजेपेक्षा जास्त मोकळे पाणी देणे
ठिबकनेही पाणी देण्यासाठी सदोष पद्धतीचा वापर

 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...