agriculture news in marathi, built up new godowns for the storage of agricultural produce, satara, maharashtra | Agrowon

शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामे
हेमंत पवार
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतीमाल सुस्थितीत राहावा आणि किमान आधारभूत किमतीने खरेदी केलेल्या धान्याची साठवणूक चांगल्या पद्धतीने करता यावी यासाठी राज्यातील १०८ बाजार समित्यांमध्ये प्रत्येकी एक हजार मेट्रिक टन क्षमतेची गोदामे उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी १०९.८४ कोटी रुपये खर्च करण्यात येतील. या माध्यमातून शेतीमालाची चांगल्या प्रकारे साठवणूक होऊन बाजारपेठेत चांगला दर असेल त्या वेळी शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री करता येणे शक्य होणार आहे.

कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतीमाल सुस्थितीत राहावा आणि किमान आधारभूत किमतीने खरेदी केलेल्या धान्याची साठवणूक चांगल्या पद्धतीने करता यावी यासाठी राज्यातील १०८ बाजार समित्यांमध्ये प्रत्येकी एक हजार मेट्रिक टन क्षमतेची गोदामे उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी १०९.८४ कोटी रुपये खर्च करण्यात येतील. या माध्यमातून शेतीमालाची चांगल्या प्रकारे साठवणूक होऊन बाजारपेठेत चांगला दर असेल त्या वेळी शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री करता येणे शक्य होणार आहे.

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालास चांगला बाजारभाव मिळेल याची खात्री नसते. एकदा पिकांची काढणी सुरू झाली की बाजारपेठेत संबंधित शेतमालाची आवक  वाढते. त्यामुळे बाजारपेठेत संबंधित शेतीमालाचे दर पडतात. परिणामी शेतकऱ्यांनी केलेला उत्पादन खर्चही निघत नसल्याचे दरवर्षी दिसून येते. त्यातून अनेक शेतकरी कर्जबाजारी झाल्याचीही उदारहणे आहेत. त्यासाठी शासनाने शेतमाल तारण योजना सुरू केली आहे.

ज्या वेळी शेतकऱ्यांचा शेतीमाल निघेल त्या वेळी जर बाजारपेठेत दर कमी असतील तर त्याने बाजार समित्यांच्या गोदामात शेतीमाल ठेवावा. शेतमाल तारण ठेवल्यास शेतकऱ्यांना त्यावर कर्ज देण्याचीही व्यवस्था शासनाने केली आहे. या योजनेबाबत गेल्या चार ते पाच वर्षांत चांगली जनजागृती झाल्यामुळे शेतकऱ्यांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर सरकारने किमान आधारभूत किमतीने शेतमाल खरेदी सुरू केली आहे. बाजार समित्यांमार्फत पणनच्या माध्यमातून ही खरेदी केली जाते. मात्र शेतकऱ्यांनी आणलेला शेतमाल आणि किमान आधारभूत किमतीने बाजार समित्यांनी खरेदी केलेला शेतमाल ठेवण्यासाठी सुसज्ज अशा गोदामांचीच मोठी अडचण होती. त्यासाठी बाजार समित्यांनी पणनकडे गोदाम बांधण्यासाठी प्रस्तावही सादर केले होते.

त्याला सरकारने मंजुरी दिली असून शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला शेतीमाल सुस्थितीत राहावा आणि सरकारने किमान आधारभूत किमतीने खरेदी केलेले धान्याची साठवणूक चांगल्या पद्धतीने करता यावी यासाठी राज्यातील १०८ बाजार समित्यांमध्ये प्रत्येकी एक हजार मेट्रिक टनाची गोदामे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी १०९.८४ कोटी रुपये खर्च होणार असून हा खर्च केंद्र व राज्य शासनाच्या मदतीतून आणि पणन, बाजार समित्यांच्या निधीतून करण्यात येणार आहे.
 
गोदामांचे होणार प्रमाणीकरण

बाजार समित्यांच्या आवारात पणन मंडळाच्या देखरेखीखाली गोदामांची उभारणी करण्यात येणार आहे. गोदामांची उभारणी चांगल्या पद्धतीने दर्जेदार, आवश्यक त्या मोजमापात आणि ठरलेल्या आराखड्यानुसार झाली आहे की नाही याची तपासणी नवी दिल्ली येथील वेअरहाउसिंग डेव्हलपमेंट अॅण्ड रेग्युलेटरी अॅथाॅरिटी यांच्याकडून करण्यात येणार आहे. त्यानंतर ते गोदाम बाजार समित्यांकडे वापरण्यास हस्तांतरीत करण्यात  येणार आहेत.

इतर ताज्या घडामोडी
नियोजन खरिपाचे : ठिबक, खत व्यवस्थापन...शेतकरी ः विजय इंगळे चित्तलवाडी, ता. तेल्हारा, जि...
नियोजन खरिपाचे : लागवडीसह सिंचन, काढणी...शेतकरी - दीपक माणिक पाटील माचले, ता. चोपडा, जि....
जळगावात दीड हजारांवर शेततळ्यांची कामे...जळगाव ः जिल्ह्यात "मागेल त्याला शेततळे''...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ साधणार...अमरावती ः दुष्काळ, पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर...
नांदगाव तालुक्यात फळबागा वाचविण्यासाठी...नाशिक : नांदगाव तालुक्यातील फळबागा वाचविण्यासाठी...
अरुणाग्रस्तांचा गाव न सोडण्याचा निर्धारसिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पात पाणीसाठा केला, तरी...
नांदेड : साडेतेरा हजार हेक्टरवर उन्हाळी...नांदेड : जिल्ह्यात २०१९ च्या उन्हाळी हंगामात १३...
परभणीत फ्लॉवर ३५०० ते ५००० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
पुणे जिल्ह्यातील चौदा कारखान्यांकडे...पुणे   ः जिल्ह्यात गळीत हंगाम संपवून...
जळगावात कांदा विक्रीत शेतकऱ्यांची लूटजळगाव ः कांद्याचे दर दबावात असतानाच त्याची विपणन...
जळगावात किसान सन्मान निधीचे वितरण...जळगाव ः खानदेशात सुमारे सव्वादोन लाख शेतकऱ्यांना...
पुणे जिल्ह्यात फळबाग लागवडीसाठी एक...पुणे  ः यंदा खरीप हंगामात फळबाग लागवड करू...
नगर, शिर्डीत ‘काँटे की टक्कर’ मतात...नगर ः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कामावर...
अकरापैकी सहा आमदारांचा लोकसभेत प्रवेशमुंबई ः सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात...
पुण्यातील पाणी, वाहतुकीचे प्रश्न...पुणे  ः येत्या पाच वर्षांत पुण्याचा...
निवडणुका घेतल्या नसत्या तरी चालले असते...सातारा  ः देशात नरेंद्र मोदी यांच्या...
मंत्रिपदाची संधी जळगाव की धुळ्याला?जळगाव ः खानदेशने भाजपला कौल दिला असून, आता...
‘ईव्हीएम’चा विजय असो : छगन भुजबळनाशिक  : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये...
सातारा मतदारसंघातून उदयनराजे भोसलेंना...सातारा : अत्यंत चुरशीच्या झालेल्या सातारा लोकसभा...
नगरमध्ये डॉ. सुजय विखे, शिर्डीत...नगर  : विसाव्या फेरीअखेर नगर लोकसभा...