agriculture news in marathi, Buldana District Paisevari on correct, Maharashtra | Agrowon

बुलडाण्यातील पैसेवारी चुकीची : काँग्रेसचा आरोप
टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

बुलडाणा : जिल्ह्यात चुकीच्या पद्धतीने पैसेवारी काढण्यात आली अाहे. खरिपातील सर्वच पिकांची उत्पादकता घटलेली असताना यंत्रणांनी जास्तीची पैसेवारी काढून एक प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय केला अाहे. तातडीने ही पैसेवारी रद्द करावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने जिल्हाभर करण्यात अाली. जिल्हास्तरावर, तसेच तालुका तालुक्यात याबाबत प्रशासनाला निवेदने देण्यात अाली अाहेत. शासनाच्या महसूल विभागाने चुकीच्या पद्धतीने पैसेवारी काढल्याचा अारोप या निवेदनात करण्यात अाला अाहे.

बुलडाणा : जिल्ह्यात चुकीच्या पद्धतीने पैसेवारी काढण्यात आली अाहे. खरिपातील सर्वच पिकांची उत्पादकता घटलेली असताना यंत्रणांनी जास्तीची पैसेवारी काढून एक प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय केला अाहे. तातडीने ही पैसेवारी रद्द करावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने जिल्हाभर करण्यात अाली. जिल्हास्तरावर, तसेच तालुका तालुक्यात याबाबत प्रशासनाला निवेदने देण्यात अाली अाहेत. शासनाच्या महसूल विभागाने चुकीच्या पद्धतीने पैसेवारी काढल्याचा अारोप या निवेदनात करण्यात अाला अाहे.

जिल्ह्यात काही ठिकाणी ५३, तर काही ठिकाणी ६३ पर्यंत पैसेवारी काढण्यात अाली आहे. वास्तिवक या वर्षी संपूर्ण जिल्ह्यात पाऊस झालेला असला तरी त्यात वारंवार खंड होता, तसेच या खंडामुळे पिकांची उत्पादकता थेट घटली. पावसाच्या अनियमितपणामुळे जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील कापूस, मूग, उडीद, सोयाबीन या प्रमुख पिकांच्या उत्पन्नात घट झाली. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचा माल हेक्‍टरी कमी प्रमाणात खरेदी करण्याच्या सूचना संबंधित विभागास दिल्या आहेत.

एकीकडे शासन पिकांची उत्पादकता कमी झाली म्हणून शेतमाल जास्त खरेदी केला जाऊ शकत नाही, असे सांगते तर दुसरीकडे सर्वेक्षणात पैसेवारी ५० पैशांवर दाखवत आहे. शासनाच्या अशा कार्यपद्धतीचा शेतकऱ्यांना फटका बसणार अाहे. सरकारने दबावतंत्राचा वापर करून कृषी विभागाकडून चुकीचा अहवाल मागविल्याची शंका काँग्रेसने घेतली अाहे.

दुष्काळाचा लाभ शेतकऱ्यांना मिळू नये म्हणून केंद्र सरकारने दुष्काळ जाहीर करण्याचे निकष व कार्यपद्धती बदलली आहे. सरकारच्या शेतकरीविरोधी निर्णयाचा कॉंग्रेसने निषेध केला. पैसेवारीसाठीचे  अहवाल रद्द करून नवीन व अंतिम पैसेवारी जाहीर करावी. केंद्र, राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून वास्तविकता पडताळणी व दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसकडून देण्यात अाला. 

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...