agriculture news in marathi, Buldana sharks by farmer suicide | Agrowon

शेतकरी अात्महत्यांनी बुलडाणा हादरला
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 जून 2018

बुलडाणा  ः खरीप हंगाम सुरू झाला असून, पैशांची तजवीज होत नसल्याने शेतकरी अार्थिक संकटात अाहे. गेल्या २४ तासांत बुलडाणा जिल्ह्यात चार शेतकरी अात्महत्यांच्या घटना समोर अाल्या अाहेत.

जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथे शनिवारी (ता. २३) विठ्ठल सीताराव धर्मे (वय ५५) या शेतकऱ्याने बँकेच्या कर्जापायी अात्महत्या केली. धर्मे यांनी दीड वर्षापूर्वी शेती विकून बँकांचे कर्ज भरले. मागील वर्षी त्यांनी पाच एकर शेती ठोक्याने केली व त्यात कपाशीची लागवड केली. मात्र, बोंड अळीमुळे त्यांचे हे पीक हातातून गेले. पुन्हा ते कर्जबाजारी झाले. या परिस्थितीमुळे त्यांनी शनिवारी अात्महत्या केली.

जिल्ह्यात खामगाव तालुक्यातील हिवरा येथील भागवत कनिराम बघे यांनी विष प्राशन करून आपले जीवन संपविले. मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील अमोल काशीराम झाडे यांनीसुद्धा सततच्या नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेत आपले जीवन संपविले.  मलकापूर तालुक्यातीलच माकनेर येथील महिला शेतकरी वैशाली तानाजी खरासने यांनीसुद्धा आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या केली. गेल्या २४ तासांत अात्महत्यांच्या या घटना झाल्या असून जिल्हा हादरला अाहे.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...