agriculture news in marathi, Bulk drought survey by Agriculture Ministers | Agrowon

कृषी राज्यमंत्र्यांकडून बुलडाण्यातील दुष्काळाची पाहणी
टीम अॅग्रोवन
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

बुलडाणा : जिल्ह्यात झालेल्या जेमतेम पावसामुळे संपूर्ण खरीप हंगाम संकटात सापडला आहे. याची पाहणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. दोन दिवसांच्या दौऱ्याची सुरवात त्यांनी शेगाव तालुक्यातील सवर्णा गावापासून केली. त्यानंतर चिंचोली कारफार्मा येथील शेतकरी गोपाळ गिते यांच्या कापूस पिकाची पाहणी केली.

बुलडाणा : जिल्ह्यात झालेल्या जेमतेम पावसामुळे संपूर्ण खरीप हंगाम संकटात सापडला आहे. याची पाहणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. दोन दिवसांच्या दौऱ्याची सुरवात त्यांनी शेगाव तालुक्यातील सवर्णा गावापासून केली. त्यानंतर चिंचोली कारफार्मा येथील शेतकरी गोपाळ गिते यांच्या कापूस पिकाची पाहणी केली.

खोत यांनी कपाशीची सुकलेली व अळीग्रस्त बोंडांची पाहणी करून शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. खामगाव तालुक्यातील जयपूर लांडे येथील शेतकरी विजयसिंग पवार यांच्या कापूस व तूर पिकाची पाहणी केली. शेतकऱ्याकडून त्यांनी काढणीसाठी लागणारा खर्च, मिळणारे उत्पन्न, पीकविमा सहभागाची स्थिती आदी माहिती जाणून घेतली. त्यांनी शेतातील विहिरीच्या पाणीपातळीही पाहिली.

घाटपुरी येथील नामदेव इंगळे यांच्या शेतात तूर पिकाची पाहणी करून खरिपातील पिकांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर जळका भडंग येथे नर्मदाबाई सपकाळ यांच्या शेताला, तर निपाणा येथे विश्वनाथ गावंडे यांच्या कापूस पिकला भेट दिली. बोरजवळा येथील कोरडे पडलेले तलाव, तलावातील गाळ काढणे, काढलेला गाळ व निर्मिती आदींविषयी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर मोताळा तालुक्यातील आडविहीर येथील लक्ष्मण फाटे यांच्या शेतातील कापूस पिकाची पाहणी केली.

दौऱ्याप्रसंगी आमदार ॲड. आकाश फुंडकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, सुनील विंचनकर, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

इतर बातम्या
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
गिरणा, हतनूरच्या आवर्तनाची शेतकऱ्यांना...जळगाव : जिल्ह्यातील अनेक गावांतील शेती,...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
गडचिरोलीत १०० बेली ब्रिज उभारणार :...गडचिरोली : गडचिरोली हा नद्यांचा जिल्हा आहे....
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
पोखरापूर तलाव प्रकल्प मार्गी लागणारसोलापूर  : जिल्ह्यातील पोखरापूर तलाव आणि...
एकापेक्षा अधिक चारा छावण्यास मंजुरीसोलापूर : राज्यातील महसूल मंडळामध्ये एकच छावणी...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
नियोजन आणि देखरेख समित्या स्थापन कराऔरंगाबाद : यंदा मराठवाड्याला अभूतपूर्व जलसंकटाला...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...