agriculture news in Marathi, bull market cancel from vita APMC, Maharashtra | Agrowon

विटा बाजार समितीमधील बैल बाजार संपुष्टात
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 मार्च 2019

सध्याचे दूध दराचे धोरण अनुकूल नाही. त्यामुळे दुधाला दर मिळेना. सततच्या दुष्काळामुळे लोकांनी म्हैशी पाळणे बंद केले आहे. आधुनिकतेमुळे बैल बाजारही संपुष्टात आला आहे. बाजार समितीत सध्या शेळ्या-मेंढ्या व बोकडाचा बाजार तेजीत आहे. आठवड्याला त्याची सहा लाख रुपयांपर्यंत उलाढाल होत आहे. 
- चंद्रकांत चव्हाण, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, विटा.

विटा, जि सांगली ः येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात दर सोमवारी भरणारा बैल बाजार संपुष्टात आला आहे. बैलांच्या शर्यतीवर असणारी बंदी व यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या कमी झाली आहे. चारा, पाणीटंचाईमुळे दुभत्या म्हैशींच्या खरेदी-विक्रीवर परिणाम होऊ लागला आहे. बाजारात एक ते दोन म्हैशींची खरेदी-विक्री होत आहे.
 

खानापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना सतत दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. सध्या खानापूर घाटमाथ्यावर पाणी, चाराटंचाई जाणवू लागली आहे. परिणामी पशुधन शेतकरी विकू लागले आहेत. विटा कृषी उत्पन्न बाजार समितीत चार वर्षापुर्वी बैलांचा मोठा बाजार भरत होता. बैलांची मोठी उलाढाल होत होती. सांगोला, आटपाडी, मिरज व मंगळवेढा येथून व्यापारी बैले खरेदीसाठी येत होती. शर्यंतीसाठी लागणाऱ्या बैलांची दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत सौदा व्हायचा. परंतु राज्य शासनाने बैलांच्या शर्यंतीवर बंदी घातली. त्यामुळे त्यांची खरेदी-विक्री थंडावली. 

आधुनिकतेमुळे यंत्राद्वारे शेतीची कामे होऊ लागली. त्यामुळे बैलांचा वापर थांबला. शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी म्हैस पालन सुरू केले. परंतु सध्या दुधालाही दर मिळेनासा झाला आहे. त्यामुळे म्हैशीही पाळणे बंद झाले आहे. त्यामुळे तालुक्‍यातील पशुधन कमी होऊ लागले आहे. सध्या यात्रांचा हंगाम सुरू असल्याने पै- पाहुणे, मित्रांना जेवणावळी घालण्यासाठी बोकडांना चांगली मागणी वाढू लागली आहे. बाजार समितीत शेळ्या-मेंढ्यांबरोबर बोकडांचा बाजार मात्र तेजीत सुरू आहे. 

इतर बातम्या
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
पुणे विभागात हरभरा, गव्हाची काढणी...पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने रब्बी हंगामातील गहू...
पूर्व भागात कृष्णा, वारणा नद्या पडल्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पूर्व भागात कृष्णा व...
ताकारीच्या तिजोरीत १३ कोटी शिल्लकवांगी, जि. सांगली ः मागील १५ वर्षांपासून दरवर्षी...
गिरणा नदीतून पाण्याची ग्रामस्थांना...जळगाव ः पिण्याच्या पाण्यासंबंधी सोडलेले गिरणा...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
दुबळवेल ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कारवाशीम : नागरिकांना अावश्यक असलेल्या पायाभूत...
नांदेड, परभणी, हिंगोलीत अन्नत्याग आंदोलननांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
दुष्काळी भागाला मिळतोय चिंचेचा आधारशिरूर कासार, जि. बीड ः दुष्काळाच्या गंभीर झळा...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या कायम ः...राहुरी विद्यापीठ, जि. नगर : विविध पिकांच्या...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...