agriculture news in marathi, The bull market in Pandharpur | Agrowon

पंढरपुरात खिलार बैलांचा बाजार फुलला
भारत नागणे
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

पंढरपूर, जि. सोलापूर ः कार्तिकी यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या येथील खिलार जनावरांच्या बाजारात सोमवार (ता. ३०) पासून खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू झाले आहेत. या वर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने विशेषतः शेती कामासाठी खिलार खोंडाना मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने खिलार बैलांच्या किमतीतदेखील वाढ झाली आहे.

पंढरपूर, जि. सोलापूर ः कार्तिकी यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या येथील खिलार जनावरांच्या बाजारात सोमवार (ता. ३०) पासून खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू झाले आहेत. या वर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने विशेषतः शेती कामासाठी खिलार खोंडाना मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने खिलार बैलांच्या किमतीतदेखील वाढ झाली आहे.

या वर्षी बाजारात किमान पाच कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होईल, असा अंदाज बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात कार्तिकी खिलार जनावरांचा बाजार प्रसिद्ध आहे. येथील बाजारात राज्यासह कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून मोठ्या संख्येने खिलार जनावरे विक्रीसाठी आली आहेत.

सोमवारपासून बाजारात खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू झाले आहेत. बाजार चांगला भरल्याने व्यापाऱ्यांची संख्यादेखील या वर्षी वाढली आहे. मागील दोन वर्षांच्या दुष्काळानंतर या वर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतीकामासाठी अजूनही मोठ्या प्रमाणावर खिलार बैलांचा वापर केला जातो. त्यामुळे पुन्हा खिलार जनावरांचे बाजार फुलू लागले आहेत.

वाखरी (ता. पंढरपूर) येथील पालखी तळावरील जनावरांच्या बाजारात बाजार समितीच्या वतीने पिण्याचे पाणी, पशुवैद्यकीय सेवा, शौचालय, सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्याचे बाजार समितीचे उपसभापती विवेक कचरे यांनी सांगितले. बाजारात जनावरांसाठी लागणारे कासरे, मोरक्‍या, वेसणी, झुली, चाबूक, चंगाळ्या आदी साहित्य विक्रीची दुकाने थाटली आहेत.

इतर बातम्या
बारामतीतील विकासाचे काम देशातील...बारामती : ग्रामीण विकासाच्या माध्यमातून सामान्य...
सुकाणू समितीच्या कार्यकारिणीची जवळगाव...अंबाजोगाई, जि. बीड : शेतकरी संघटना व सुकाणू...
मराठवाड्यात पीककर्ज वितरण कासवगतीनेऔरंगाबाद : आढावा बैठकींचा सपाटा, काही ठिकाणी...
‘बोंड अळी व्यवस्थापनाचा महाराष्ट्र...परभणी : कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या...
रताळ्याच्या पिठापासून ‘अ’...टांझानियातील एका खासगी कंपनीने ‘अ’ जीवनसत्त्वांनी...
पोकराअंतर्गत ८४ गावांत आंतरपीक...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत...
पीककर्ज वाटपाचा टक्का वाढेनाअकोला  : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाच्या...
कांदा बाजारात दरवाढीचे संकेतनाशिक : राजस्थान व मध्य प्रदेशमध्ये...
कुलगुरू भट्टाचार्य यांचा राजीनामा अखेर...पुणे : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
नाशिक बाजार समिती संचालकांवर गुन्हे...नाशिक : आचारसंहिता काळात शासकीय वाहनाचा वापर...
उपराष्ट्रपती आज बारामतीतबारामती ः उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू शुक्रवारी (...
‘प्रलंबित वीजजोडणीसाठी मोबाईल नोंदणी...मुंबई : मार्च-२०१८ अखेर राज्यात...
पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन...पुणे : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या...
ऊस उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञान...पुणे ः सहकारी साखर कारखाने शक्तिस्थळे असून,...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी बहुस्तरीय...पुणे ः शेती क्षेत्राच्या विकासासाठी सिंचन,...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; चार...सातारा : जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाने...
कापूस बाजारात भारताला संधीन्यूयाॅर्क ः चालू कापूस हंगामात पिकाला फटका...
मॉन्सून सक्रिय होण्यास प्रारंभ पुणे  ः अरबी समुद्र आणि हिंदी महासागर...
शेतकऱ्यांनी अपघात विमा योजनेचा लाभ...सातारा : राज्यातील सातबारा उताराधारक...
थकली नजर अन्‌ पाय...औरंगाबाद : घोषणा झाली, पण काय व्हतंय कुणास ठाऊक,...