धुरकऱ्याविनाच शेतात ये-जा करते बैलगाडी

बैल कुठेही न थांबता थेट शेताजवळ जाऊन उभे राहतात. संपूर्ण रस्त्याने ही बैलगाडी सरकारी नियमानुसार डाव्या बाजूने चालत राहते. मध्येच काहीही आडवे आले तर हे बैल थांबतात. वाहनाला जाऊ देतात आणि पुन्हा चालायला लागतात. मात्र डाव्याबाजूचा रस्ता बदलत नाहीत.
लोणवडी येथील एकनाथ जवंजाळ यांच्याकडे असलेली ही बैलजोडी विनाधुरकऱ्याची घरापासून शेतात आणि शेतातून घरी परतत असते.
लोणवडी येथील एकनाथ जवंजाळ यांच्याकडे असलेली ही बैलजोडी विनाधुरकऱ्याची घरापासून शेतात आणि शेतातून घरी परतत असते.

लोणवडी, जि. बुलडाणा ः शेतीत यांत्रिकीकरण वाढत असले तरी आजही शेतीतील कामांसाठी असंख्य शेतकऱ्यांकडे बैलजोडीच वापरली जाते. नांदुरा (जि. बुलडाणा) तालुक्‍यातील लोणवडी येथील एकनाथ मिठाराम जवंजाळ यांच्याकडे गेल्या दहा-बारा वर्षांपासून एक बैलजोडी आहे. ही बैलजोडी इतरांसारखी नाही. धुरकऱ्यांशिवाय बैलगाडी शेतात जाऊ शकते आणि घरी परतही येते. नांदुरा-मोताळा या रहदारीच्या मार्गावर जवंजाळ यांची शेती असून, या रस्त्याने दिवसभरात शेकडो वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र धुरकऱ्याविना चालणारी बैलजोडी जणू वाहतूक नियमांचे पालन करत गाडी डाव्या बाजूने शेतात घेऊन जाते. धुरकऱ्याशिवाय चालत राहणारी ही बैलगाडी रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांच्या कुतूहलाचा विषय बनली आहे. नियमितपणे या रस्त्यावर धावणाऱ्या वाहनधारकांनासाठी ही बाब नेहमीची झाली आहे. अनेकांनी बैलगाडीचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  एकनाथ जवंजाळ यांनी साधारणतः आठ वर्षांपूर्वी ही बैलजोडी विकत घेतली होती. तेव्हा ही जोडी अगदी गोऱ्हेच होते. तेव्हापासून जवंजाळ यांनी त्यांचे पालनपोषण केले. या बैलजोडीच्या साह्यानेच ते १२ एकरांतील व्यवस्थापन करतात. शेतातील नांगरणी, वखरणी, शेतमालाची वाहतूक सर्वकाही या बैलांच्या साह्यानेच होत असते.  इतर शेतकऱ्यांकडील बैल अशी कामे करीतच असतात. मात्र एकनाथ जवंजाळ यांच्याकडे असलेल्या या बैलांचे काही गुण वेगळे आहेत. त्यांचे शेत गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे. नांदुरा-मोताळा या रहदारीच्या रस्त्यालगत हे शेत आहे. शेतातील कामे करण्यासाठी दररोज बैलजोडी शेतात नेली जाते. पण बहुसंख्य वेळा हे बैल गाडीला जुंपताच, धुरकऱ्याविना ही गाडी रस्त्याने लावून दिली जाते. बैल कुठेही न थांबता थेट शेताजवळ जाऊन उभे राहतात. संपूर्ण रस्त्याने ही बैलगाडी सरकारी नियमानुसार डाव्या बाजूने चालत राहते. मध्येच काहीही आडवे आले तर हे बैल थांबतात. वाहनाला जाऊ देतात आणि पुन्हा चालायला लागतात. मात्र डाव्याबाजूचा रस्ता बदलत नाहीत. जवंजाळ यांच्याकडे दुचाकी आहे. शेतातील कामे लवकर करण्याच्या उद्देशाने ते बहुतांश वेळा दुचाकीने शेतात जातात आणि मागून बैलगाडी येत राहते. गेली सात-आठ वर्षे हे होत आहे. या काळात कधीही बैलांमुळे कुणाचे नुकसान झाले नाही किंवा बैलांनी रस्ताही बदलला नाही. बैलजोडी माणसाळलेली या बैलांबाबत सांगताना एकनाथ भावुक होतात. दहाबारा वर्षांपूर्वी जेव्हा ही जोडी घेतली तेव्हा बैल तरुण होते. पूर्वीच्या शेतकऱ्याकडे असताना यातील एक बैल तर ‘मारका’होता. अनेकांना तो दोरालाही हात लावू देत नव्हता. परंतु आमच्या घरी ही बैलजोडी आल्यापासून कधीच कुणाला इजा केली नाही. हे बैल माणसाळले आहेत. लहान मुलेसुद्धा त्यांना सोडतात. चारापाणी करतात. शेतातील सर्व कामे याच बैलांद्वारे करून घेतली जातात. बैलांना गाडीला जुंपले की ते घरून शेताचा आणि शेतातून घराचा रस्ता धरतात. या बैलांमुळे शेतीतील असंख्य कामे आजवर झाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com