agriculture news in Marathi, bulls arrival decreased in market, Maharashtra | Agrowon

पुसेगाव बाजारात बैलांची आवक कमीच
विकास जाधव
शनिवार, 23 डिसेंबर 2017

सातारा ः राज्यभरात यात्रेनिमित्त ठिकठिकाणी बैलबाजार भरतात. यात्रेनिमित्त भरणाऱ्या बैलबाजारापैकी एक असलेल्या पुसेगाव (जि. सातारा) बैल बाजारात या वर्षी बैलांची आवक घटली आहे. बैलगाडा शर्यतबंदीमुळे बैलाच्या व्यवहार परिणाम झाला असल्याचे शेतकरी व व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. भविष्यात अशीच स्थिती राहिल्यास बैल नामशेष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सातारा ः राज्यभरात यात्रेनिमित्त ठिकठिकाणी बैलबाजार भरतात. यात्रेनिमित्त भरणाऱ्या बैलबाजारापैकी एक असलेल्या पुसेगाव (जि. सातारा) बैल बाजारात या वर्षी बैलांची आवक घटली आहे. बैलगाडा शर्यतबंदीमुळे बैलाच्या व्यवहार परिणाम झाला असल्याचे शेतकरी व व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. भविष्यात अशीच स्थिती राहिल्यास बैल नामशेष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पुसेगाव येथील जिल्ह्यात सर्वांत मोठा बैल बाजार असल्याने राज्याच्या अनेक भागांतून व्यापारी बैल खरेदीसाठी येत असतात. मात्र शेतीत आलेले यांत्रिकीकरण तसेच बैलगाडी शर्यतीवर असलेली बंदी यामुळे दिवसेंदिवस बैलाचे संगोपन करण्याचे काम कमी होऊ लागले आहे. पुसेगाव बाजारात सुमारे २५ ते ३० हजार बैल येत असतात. या वर्षी मात्र घट झाली असून, सुमारे पाच ते सहा हजार बैल आले असल्याचे सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले. 

बैलाचे शेतातील महत्त्व कमी झाल्यामुळे शेतीसाठी बैल खरेदी करण्याचा शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे. तसेच शर्यतबंदीमुळे बाजारात अल्प प्रमाणात व्यवहार होत आहेत. यात्रेत नुसतीच बैलाची पाहणी आणि चौकश्या केल्या जात असल्याने अनेक बैलमालकांनी घरचा रस्ता धरला आहे. मराठवाडा, पुणे, सोलापूर, कोकणासह कर्नाटक राज्यातून येणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या घटली आहे. सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने शेतकरी तसेच बैलांसाठी चारा, वीज, पाणी, जेवण राहण्याची सुविधा करण्यात आल्या आहेत.

मानाच्या बैलांची खरेदी
या यात्रेतून बघाड तसेच पालखीसाठी लागणाऱ्या बैलांची खरेदी झाली आहे. सर्वांत बाणेर येथील बाबूराव विधाते यांनी साडेसात लाख रुपयांला बैलजोडी खरेदी केली आहे. बघाड आणि पालखीसाठी लागणाऱ्या बैलाची साडेतीन लाखांपासून साडेसात लाखांपर्यंत खरेदी झाली असल्याचे व्यापारी राजू गिरिगोसावी यांनी सांगितले. काही शेतकऱ्यांकडून जातिवंत पैदास करण्यासाठी बैले नेली जात असली, तरी याचे प्रमाण खूप कमी झाले आहे.

खिलार संगोपन घटू लागले 
शासनाकडून गोहत्याबंदी कायदा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना देशी गाईपालनाचे संदेश दिले जात आहेत. मात्र खिलार जातीचे जनावरे कमी दूध देत असल्यामुळे शेतकऱ्यांना परवडत नाही. खिलार गाईपासून मिळणाऱ्या खोंडांचा शेतीकामासाठी वापर कमी झाला आहे. दुधाचे उत्पादनही कमी, बैलाची गरज कमी तसेच शर्यतबंदी असल्यामुळे बैल मोठे करून करायाचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून केला जात आहे. टप्पाटप्प्याने खिलार जातीच्या जनावरांचे संगोपन कमी होऊ लगाले आहे.

इतर अॅग्रो विशेष
‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री...पुणे ः ॲग्रिकल्चर सेक्टरमधील खते, बी - बियाणे,...
उत्पादकांना मिळावा उत्पादनवाढीचा लाभदेशातील काही भागांत विशेषत: कर्नाटक, तमिळनाडू व...
सेसवसुली नव्हे; सर्रास लूटजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे आवाराबाहेर...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्यपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी...
‘मेकुणू’ चक्रीवादळ होणार अतितीव्रपुणे : अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या ‘मेकुणू’...
कोकणात शनिवारपासून पाऊस?पुणे : अरबी समुद्रात अालेले ‘मेकुणू’ चक्रीवादळ...
खरिपासाठी पैशांची तजवीज करण्यात शेतकरी...अकोला  ः अागामी हंगामाला अाता अवघा...
सेस वसुलीच्या मुद्यावर प्रशासन, जळगाव...जळगाव ः भाजीपाला व फळे नियमनमुक्त केल्याने...
यंदा वापरा घरचेच सोयबीन बियाणेपुणे : राज्यात गेल्या हंगामात झालेल्या अवेळी...
प्रयोगशील कांदा शेतीत ठळक अोळख मिळवलेले...नाशिक जिल्हा कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. त्यातही...
गोकुळानं ‘गणित’ नाही मांडलंपशुपालनातून दूध व्यवसाय म्हणजे मुळातच उद्योग आहे...
ब्राझीलचा धडा घेणार कधी?सातत्याने दोन वर्षांच्या चांगल्या पाऊसमानानंतर...
उत्तर प्रदेशातील कारखान्यांची अतिरिक्त...नवी दिल्ली ः बाजारात साखरेचे पडलेले दर आणि...
भारतात गोड्या पाण्याची उपलब्धता घटलीवॉशिंग्टन ः भारतात उपलब्ध पाण्याचा आणि पाणी...
कापसाच्या ३७० वाणांच्या विक्रीला...नगर  ः बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कमी आणि...
अधिकाऱ्यांनी कोंडून दिली खुनाची धमकीपुणे  : कृषी खात्यातील पाणलोट व मृद्संधारण...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मध्य...
वादळाने बाष्प खेचून नेले; अरबी समुद्रात...पुणे : अरबी समुद्रात मंगळवारी कमी तीव्रतेचे वादळ...
हिरापूरच्या बैल बाजारात चार कोटींवर...बीड : हिरापूर (ता. गेवराई) येथे बैलांचा आठवडे...