‘एफआरपी’ थकविलेल्या कारखान्यांना दणका

‘एफआरपी’ थकविलेल्या कारखान्यांना दणका
‘एफआरपी’ थकविलेल्या कारखान्यांना दणका

कोल्हापूर : हंगाम सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी झाला आहे. मात्र, कायद्यानुसार ‘एफआरपी’ न दिल्याने येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील तेरा कारखान्यांना कारणे दाखवा नोटिसा दिल्या आहेत. १८ डिसेंबरपर्यंत संबंधित कारखान्याच्या प्रतिनिधींनी समक्ष येऊन ‘एफआरपी’ न देण्याच्या कारणाविषयी समाधानकारक खुलासा करावा. अन्यथा संबंधित कारखान्यावर कारवाई करण्याचा इशारा पत्रात दिला आहे.

एकीकडे साखरेला दर व उठाव नसल्याने ‘एफआरपी’ थकविलेल्या कारखान्यापुढे आता कारवाईचा बडगा संकट म्हणून उभा राहिला आहे. ‘एफआरपी’ थकीत असणाऱ्या व हंगाम सुरू होऊन १४ दिवसांच्या वर कालावधी झालेल्या इतर कारखान्यांनाही काही दिवसांत या नोटिसा देणार असल्याचे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.  

दोन्ही जिल्ह्यांत ६२४ कोटी थकीत  दिवाळीनंतर कारखाने नियमित सुरू झाले. परंतु पहिल्या पंधरवड्यानंतर ऊस तोडणी झालेल्या शेतकऱ्यांना एक रुपयाही रक्कम मिळाली नाही. साखर कारखान्यांनी गाळप तर सुरू केले. परंतु दर व उठाव नसल्याची री ओढत उत्पादकांची हक्काची रक्कम अडकवून ठेवली आहे. यामुळे उत्पादकांचे आर्थिक गणित तर चुकले आहेच. परंतु पैसे नसल्याचे शेतकामेही खोळंबली आहेत. शेतकऱ्यांत अस्वस्थता आहे. 

सगळेच चिडीचूप अनेक उत्पादकांनी कारखान्याकडे उसाच्या रक्कमेबाबत विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही. काही कारखाना प्रतिनिधींशी याबाबत संपर्क केला असता अनेक कारखान्यांनी योग्य दराने साखर विक्री होत नसल्याचे सांगितले. साखर शिल्लक रहात असल्याने खर्चाची गणिते जमवताना नाकीनऊ येत आहेत. जवळ पुरेशी रक्कमच नसल्याने हतबल असल्याचे कारखानदारांनी सांगितले. 

दोन टप्प्याचा पर्याय  चांगली परिस्थिती असल्याने अनेक कारखान्यांनी पहिल्या हप्त्याची तयारी केली आहे. काही कारखाने पुढील कारखाने रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची शक्‍यता आहे. परंतु एकाने पैसे जमा केले की दुसऱ्यावर दबाव येत असल्याने देणाऱ्यालाही थांबविण्याचे प्रयत्न काही कारखानदारांकडून होत असल्याने परिस्थिती बिकट बनण्याची शक्‍यता आहे. काही कारखान्यांनी दोन टप्प्यात ‘एफआरपी’ देण्याचा विचार सुरू केला आहे. परंतु अशी रक्कम जमा केल्यास आंदोलनाची दिशा आपल्या कारखान्यावर होइल, या भीतीपोटी हे कारखानेही निर्णय घेऊ शकत नसल्याची स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com