धुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी

धुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी
धुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९ क्विंटल खरेदी

धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरड धान्य खरेदीसाठी दहा खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये धुळे (बोरविहीर गुदाम), शिरपूर, सांगवी, बोराडी, शिंदखेडा, साक्री, ब्राह्मणवेल, छडवेल, पिंपळगाव, कुडाशी यांचा समावेश आहे.

या दहाही केंद्रांवर गेल्या एक डिसेंबरपर्यंत २३८४.७० क्विंटल मका व २६४.५० क्विंटल ज्वारीची खरेदी झाली आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकारी व आदिवासी विकास महामंडळातर्फे होत असलेल्या भरड धान्य खरेदीत या वर्षी मक्‍याला प्रतिक्विंटल १७०० रुपये, तर ज्वारीला (संकरित) २४३० रुपये आधारभूत दर दिला जात आहे.

शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील ऑनलाइन पीकपेरा नमूद असलेल्या सात-बारा उताऱ्याची मूळ प्रत, आधार कार्डची झेरॉक्‍स, बॅंक पासबुकच्या प्रथम पानाची झेरॉक्‍स, मोबाईल क्रमांक आदी माहिती देऊन ऑनलाइन नोंदणी करावी.

नोंदणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे धान्य खरेदीची तारीख दिली जाणार आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com