agriculture news in marathi, Buy and sell of farmimng product in online issue | Agrowon

ऑनलाइन अन् निकषांच्या फेऱ्यात शेतमाल खरेदी
संतोष मुंढे
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद :  शेतमालाची हमीभावाने खरेदी ऑनलाइन नोंदणी करून केली जाणार असली, तरी या प्रक्रियेला अजून तरी फारसा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत नाही. नोंदणीसाठी केंद्र सुरू असले, तरी त्यांच्याकडे नोंदी करण्यासाठी शेतकरी वळले नाही. जे वळले त्यांना निकषांमुळे हमीभावाने विक्री करता आली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकूणच ऑनलाइन प्रक्रियेविषयी शेतकऱ्यांना माहिती मिळाली का, हा प्रश्न आहे.

औरंगाबाद :  शेतमालाची हमीभावाने खरेदी ऑनलाइन नोंदणी करून केली जाणार असली, तरी या प्रक्रियेला अजून तरी फारसा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत नाही. नोंदणीसाठी केंद्र सुरू असले, तरी त्यांच्याकडे नोंदी करण्यासाठी शेतकरी वळले नाही. जे वळले त्यांना निकषांमुळे हमीभावाने विक्री करता आली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकूणच ऑनलाइन प्रक्रियेविषयी शेतकऱ्यांना माहिती मिळाली का, हा प्रश्न आहे.

राज्य शासनाने शेतमालाचे पडलेले दर पाहता आधारभूत किमतीनुसार शेतमालाची खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी यंदाच्या खरिपापासून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकपेऱ्यासह सातबारा, आधार कार्ड व इतर आवश्‍यक कागदपत्रांसह ऑनलाइन नोंदणी करण्याचे धोरण अमलात आणले. त्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात पंधरवड्यापूर्वी औरंगाबाद, लासूर स्टेशन, वैजापूर या तीन केंद्रांवर शेतकऱ्यांची हमीभावाने शेतमाल विक्रीसाठी नोंदणी सुरू झाली.

जालना जिल्ह्यातील अंबड, बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्‍यांसह उस्ममानाबाद जिल्ह्यातील सात केंद्रांवर शेतमाल हमीभावाने विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झाली. प्रत्यक्षात या नोंदणीसाठी आजवर औरंगाबाद जिल्ह्यात मोजक्‍याच शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. उडीद, मूग व सोयाबीनचा पेरा औरंगाबाद जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेने कमी असल्याने तीनही केंद्रांवर खरेदी सुरू होऊनही या केंद्रावर उडीद, मूग इतर शेतमालाची दखलपात्र खरेदी झाली नसल्याची चित्र आहे.

जालना जिल्ह्यात नाफेडमार्फत हमीभावाने सोयाबीन, मूग, उडीद खरेदीचा तिढा गुरुवारी (ता. २६) जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सुटला. जालना जिल्ह्यात अंबड येथे शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात आली होती. परंतु शेतकऱ्यांच्या ऑनलाइन सातबारावर यंदाचा पीकपेरा नसल्याने शेतकऱ्यांना हमीभावाने मालाची विक्री करण्यासाठी नोंदणी करता आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

अंबड येथे केवळ एका शेतकऱ्याची ऑनलाइन शेतमाल विक्रीसाठी नोंद झाली असून, जालना येथील नोंदणी व खरेदी केंद्र शुक्रवारी (ता. २७) सायंकाळपर्यंत सुरू होणे अपेक्षित होते. जाफ्राबाद व भोकरदन येथे खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी नाफेडकडे प्रस्ताव देण्यात आला असून, त्याला मंजुरी येणे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बीड जिल्ह्यात अकरा केंद्रांवरून शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात आली. २६ ऑक्‍टोबरपर्यंत जवळपास १४५० शेतकऱ्यांनी नोंदणी केली. बीड, गेवराई, माजलगाव, पाटोदा कडा ही पाच खरेदी केंद्रेही सुरू करण्यात आली. परंतु एफएक्‍यू प्रतीच्या निकषात बसणारा शेतमाल विक्रीस न आल्याने अजून खरेदी सुरू झाली नसल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी सांगितले.

शुक्रवारी जिल्ह्यातील वडवणी, धारूर, परळी व केज येथील खरेदी केंद्रे सुरू करता येतील का, याची चाचपणी सुरू होती. उस्मानाबाद जिल्ह्यात सात केंद्रांवरून शेतकऱ्यांची नोंदणी व खरेदीची प्रक्रिया सुरू होती. ऑनलाइन प्रक्रियेनुसार दरदिवशी निकषाच्या अाधीन राहून ५० ते ६० क्‍विंटलच मालाची खरेदी होत असल्याची माहिती उस्मानाबाद जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी दिली.

इतर बातम्या
बारामतीतील विकासाचे काम देशातील...बारामती : ग्रामीण विकासाच्या माध्यमातून सामान्य...
सुकाणू समितीच्या कार्यकारिणीची जवळगाव...अंबाजोगाई, जि. बीड : शेतकरी संघटना व सुकाणू...
मराठवाड्यात पीककर्ज वितरण कासवगतीनेऔरंगाबाद : आढावा बैठकींचा सपाटा, काही ठिकाणी...
‘बोंड अळी व्यवस्थापनाचा महाराष्ट्र...परभणी : कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या...
रताळ्याच्या पिठापासून ‘अ’...टांझानियातील एका खासगी कंपनीने ‘अ’ जीवनसत्त्वांनी...
पोकराअंतर्गत ८४ गावांत आंतरपीक...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत...
पीककर्ज वाटपाचा टक्का वाढेनाअकोला  : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाच्या...
कांदा बाजारात दरवाढीचे संकेतनाशिक : राजस्थान व मध्य प्रदेशमध्ये...
कुलगुरू भट्टाचार्य यांचा राजीनामा अखेर...पुणे : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
नाशिक बाजार समिती संचालकांवर गुन्हे...नाशिक : आचारसंहिता काळात शासकीय वाहनाचा वापर...
उपराष्ट्रपती आज बारामतीतबारामती ः उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू शुक्रवारी (...
‘प्रलंबित वीजजोडणीसाठी मोबाईल नोंदणी...मुंबई : मार्च-२०१८ अखेर राज्यात...
पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन...पुणे : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या...
ऊस उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञान...पुणे ः सहकारी साखर कारखाने शक्तिस्थळे असून,...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी बहुस्तरीय...पुणे ः शेती क्षेत्राच्या विकासासाठी सिंचन,...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; चार...सातारा : जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाने...
कापूस बाजारात भारताला संधीन्यूयाॅर्क ः चालू कापूस हंगामात पिकाला फटका...
मॉन्सून सक्रिय होण्यास प्रारंभ पुणे  ः अरबी समुद्र आणि हिंदी महासागर...
शेतकऱ्यांनी अपघात विमा योजनेचा लाभ...सातारा : राज्यातील सातबारा उताराधारक...
थकली नजर अन्‌ पाय...औरंगाबाद : घोषणा झाली, पण काय व्हतंय कुणास ठाऊक,...