agriculture news in marathi, Buy and sell teams will buy | Agrowon

खरेदी-विक्री संघांची खरेदी रखडणार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

यवतमाळ : शासकीय हमीभाव खरेदीसाठी खरेदी-विक्री संघाकडे दहा लाख रुपयांचे भांडवल प्रमाणपत्र सक्‍तीचे करण्यात आले आहे. हे पैसे आणायचे कोठून, असा प्रश्‍न करीत खरेदीसंदर्भाने असलेल्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षांनी केली आहे. जिल्हा प्रशासनाला या संदर्भाने निवेदन देण्यात आले.

यवतमाळ : शासकीय हमीभाव खरेदीसाठी खरेदी-विक्री संघाकडे दहा लाख रुपयांचे भांडवल प्रमाणपत्र सक्‍तीचे करण्यात आले आहे. हे पैसे आणायचे कोठून, असा प्रश्‍न करीत खरेदीसंदर्भाने असलेल्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षांनी केली आहे. जिल्हा प्रशासनाला या संदर्भाने निवेदन देण्यात आले.

नाफेडचे सब एजंट म्हणून खरेदी विक्री संघ हमी केंद्रावर शेतमालाची खरेदी करणार आहेत. त्यापूर्वी नाफेडने काही जाचक अटी पूर्ण करण्याचे बंधन घातले आहे. यामध्ये चाळणी, ताडपत्री, आर्द्रता मीटर, आयटी रिटर्न भरल्याचे प्रमाणपत्र, धान्याची उलाढाल करताना तूट आल्यास ती भरून देण्याची जबाबदारी संघाची असणार आहे. तसेच संघाकडे दहा लाख रुपये भांडवल शिल्लक असावे लागणार आहे. तसे प्रमाणपत्र असेल तरच संघाला खरेदी करता येईल.

नाफेडने गेल्यावर्षीच्या शेतमाल खरेदीचे कमिशन खरेदी-विक्री संघाला अदा केलेले नाही. या मुळे वर्षभरापासून कर्मचाऱ्यांना वेतनही अदा करता आले नाही. संघाची संपूर्ण मालमत्ता बॅंकांकडे गहाण आहे. त्याची सोडवणूक करायची आहे. हे प्रश्‍न सुटल्यानंतरच संघ शेतमाल खरेदी करण्यास तयार होणार असल्याचे मत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्‍त केले. जिल्हाधिकाऱ्यांपुढे हा प्रश्‍न मांडण्यात आला.

या वेळी कळंब बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख, यवतमाळ बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक, आर्णी बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, मारेगाव बाजार समितीचे नरेंद्र कोंबे, दत्तकुमार दरणे, राजकुमार गुघाणे यांची उपस्थिती होती.

इतर बातम्या
कृषी विभाग म्हणते, पॉलिहाउस, शेडनेट...जळगाव ः खानदेशात १ ते ११ जून यादरम्यान झालेल्या...
केळी पीकविमाधारकांना परताव्यांची...जळगाव  ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत...
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाअभावी... कोल्हापूर  : अनेक ठिकाणी पेरण्या झाल्या...
कांदा निर्यात, प्रक्रियेवर भर गरजेचा ः...राजगुरुनगर, जि. पुणे : कांदा बाजारभावातील अनिश्‍...
सात महिन्यांपूर्वी विकलेल्या मुगाचे...अकोला ः नाफेडने खरेदी केलेल्या मुगाचे पैसे सात...
महावितरण’द्वारे देखभाल, दुरुस्तीची ९०३३...‘सातारा : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व...
रत्नागिरीत खतनिर्मिती कारखान्यावर छापारत्नागिरी : येथील एमआयडीसी परिसरात मच्छीच्या...
आषाढी पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभाग...पुणे : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर...
गोंदिया जिल्ह्यात २ लाख हेक्‍टरवर...गोंदिया ः राइससिटी असा लौकिक असलेल्या गोंदिया...
आमदार दीपिका चव्हाण यांनी मांडली...नाशिक : जिल्ह्यातील बागलाण व चांदवड तालुक्यातील...
औरंगाबाद जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती औरंगाबाद : जिल्ह्यातील ७७८ गाव व २७२...
नाशिकला ‘राष्ट्रवादी युवक’चे रेल रोको...नाशिक  : केंद्र व राज्य सरकारच्या अपयशामुळे...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कापूस...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २०१८-...
जतला कर्नाटकातून पाणी मिळणे धूसरसांगली : कर्नाटकातून कृष्णेचे पाणी जत तालुक्याला...
आषाढी वारीत ३५ हजार विद्यार्थी करणार...सोलापूर : आषाढी वारीत पाच विद्यापीठांतील ३५ हजार...
कात्रजकडून गायीच्या दूध खरेदीदरात वाढपुणे  : दुष्काळी स्थितीत दूध उत्पादक...
सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थी हिस्सा...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत...
कृषी विभागात बदल्यांची धूमपुणे  : राज्यात ऐन खरिपाच्या नियोजनात कृषी...
विधीमंडळ अधिवेशन ः सलग तिसऱ्या दिवशीही...मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही...
हायब्रीड बियाणे किमतीवर सरकारी नियंत्रण...पुणे  : महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती...