मूग, उडदाची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी
मूग, उडदाची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी

नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी सुरू आहे. हमीभावापेक्षा कमी दराने खरेदीसाठी शेतकऱ्यांकडून संमतीपत्र भरुन घेतले जात आहे. शासकीय खरेदी सुरू नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरूच आहे.

नांदेड जिल्ह्यात मुगाची २६ हजार ४५१ हेक्टरवर पेरणी झाली होती. सोळापैकी नांदेड आणि हदगाव तालुकेवगळता अन्य १४ तालुक्यांतील उत्पादकता प्रतिहेक्टरी सरासरी ४ क्विंटल ९५ किलो आल्याचे स्पष्ट झाले. नांदेड जिल्ह्यात उडदाची २९ हजार ५२० हेक्टरवर पेरणी झाली होती. नांदेड आणि हदगाव तालुके वगळता उर्वरित १४  तालुक्यांतील उडदाची सरारी उत्पादकता प्रतिहेक्टरी ५ क्विंटल ३० किलो म्हणजेच एकरी २ क्विंटल १२ किलो असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नांदेड बाजार समितीत यंदा गुरुवारपर्यंत (ता. ११) मुगाची २६ क्विंटल खरेदी झाली. मुगाला प्रतिक्विंटल ३५०० ते ४५०० रुपये दर मिळाला. उडदाची २५ क्विंटल खरेदी झाली आहे. उडदाला प्रतिक्विंटल ३१०० ते ३३०० रुपये दर मिळाला.

गतवर्षी (२०१७ मध्ये) नांदेड बाजार समितीमध्ये मूगाची एकूण १७५३ क्विंटल खरेदी झाली होती. त्या वेळी मुगाला ४००० ते ४५०० रुपये दर मिळाले होते. उडदाची ११३ क्विंटल खरेदी झाली होती. उडदाला प्रतिक्विंटल २००० ते ४६५० रुपये दर मिळाले होते.

परभणी, हिंगोलीतील आवक परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारपर्यंत (ता. ११) मुगाची एकूण ८७५ क्विंटल खरेदी झाली. मुगाला प्रतिक्विंटल ३५०० ते ४९५० रुपये दर मिळाले. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारपर्यंत (ता. ११) मुगाची एकूण १ हजार ६९१ क्विंटल खरेदी झाली. मुगाला प्रतिक्विटंल ३२८० ते ३६०० रुपयांपर्यंत दर मिळाले. उडदाची एकूण १ हजार ७०९ क्विंटल खरेदी झाली आहे. उडदाला प्रतिक्विंटल ३०५० ते ३७०० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com