परभणी, हिंगोलीत दीड लाख क्विंटल कापूस खरेदी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परभणी विभागातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत (ता.२३) पणन महासंघ, सीसीआय आणि खासगी व्यापारी यांची मिळून एकूण १ लाख ४५ हजार ३४ क्विंटल कापूस खरेदी झाली. यामध्ये पणन महासंघातर्फे हिंगोली येथील केंद्रावर ९ शेतकऱ्यांचा १०३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.

राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परभणी विभागातील परभणी जिल्ह्यात परभणी आणि ताडकळस (ता.पूर्णा) येथे, तर हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली आणि हयातनगर (ता. वसमत) येथे अशी चार खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली होती.

शुक्रवारपर्यंत  (ता.२३) पणन महासंघाच्या हिंगोली येथील केंद्रावर ९ शेतकऱ्यांचा १०३ क्विंटल कापूस ४ हजार ३२० रुपये या हमीदराने खरेदी करण्यात आला. यापैकी ३६ क्विंटल कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यात आले. परभणी जिल्ह्यातील दोन आणि हिंगोलीतील एका केंद्रांवर मात्र कापूस खरेदी झाली नाही.

परभणी जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील कृषी उत्पन्न बाजार समित्याअंतर्गंत ३७ जिनिंगमध्ये खासगी व्यापाऱ्यांनी १ लाख ३५ हजार ७१५ क्विंटल कापूस खरेदी केली आहे.

दरम्यान भारतीय कापूस महामंडळातर्फे (सीसीआय)  परभणी जिल्ह्यात सेलू, जिंतूर आणि मानवत येथे खरेदी सुरब आहे. सेलू येथे १ हजार ७६० क्विंटल, जिंतूर येथे ८० क्विंटल, मानवत येथे ८९ क्विंटल अशी एकूण १ हजार ९२९ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार (ता. औंढा नागनाथ) येथे १ हजार ३१३ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. दोन्ही जिल्ह्यांत एकूण ३ हजार २४२ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com