agriculture news in marathi, Buy seven thousand quintals of soybean | Agrowon

साताऱ्यात ७ हजार क्विंटल सोयाबीन खरेदी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 नोव्हेंबर 2017

सातारा : शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आधारभूत किंमत मिळावी, यासाठी जिल्हा मार्केटिंग विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्रांवर सहा हजार ९५४ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. मात्र, या केंद्रांच्या तुलनेत शेतकऱ्यांचा खासगी व्यापाऱ्यांकडे सोयाबीन विक्री करण्याकडे कल दिसत आहे.

सातारा : शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आधारभूत किंमत मिळावी, यासाठी जिल्हा मार्केटिंग विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्रांवर सहा हजार ९५४ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. मात्र, या केंद्रांच्या तुलनेत शेतकऱ्यांचा खासगी व्यापाऱ्यांकडे सोयाबीन विक्री करण्याकडे कल दिसत आहे.

दरात घसरण झाल्याने जिल्हा मार्केटिंग विभागाकडून जिल्ह्यात सातारा, कऱ्हाड, कोरेगाव व वाई या खरेदी केंद्रांवर सोयाबीन ३०५० रुपये दराने खरेदी करण्यात येत आहे. मात्र आर्द्रतेमुळे  खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्री करण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे शेतकरी खासगी व्यापाऱ्यांकडे सोयबीन विक्री करत आहेत.

खरेदी केंद्रांवर आजपर्यंत सहा हजार ९५४ क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. त्यापैकी १६ नोव्हेंबरपर्यंत आलेल्या चार हजार ६२५ क्विंटल सोयाबीनचे एक कोटी ४१ लाख तीन हजार १३७ रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात ७३ हजार हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाल्याने सहा ते सात लाख क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. या उत्पादनाचे आकडे व खरेदी केंद्रांवरील होणारी सोयाबीनची आवक बघता सोयाबीनची विक्री व्यापाऱ्यांकडे जास्त होत असल्याचे दिसून येत आहे. केंद्रांवर जावे लागणारे अंतर, त्यासाठीचा येणारा भाडे खर्च, रोख पैसे मिळत नसल्याने तसेच व्यापाऱ्यांनी सोयाबीनचे दर वाढवले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा खरेदी केंद्रांचा कल कमी होऊ लागला आहे.

खरेदी केंद्राचा सकारात्मक परिणाम
जिल्ह्यात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या केंद्रांवर सुरवातीच्या काळात जाचक अटी आणि कमकुवत नियोजनामुळे प्रतिसाद कमी होता. त्यानंतर काही अटी शिथिल केल्याने व केंद्रांवर सुधारणा केल्याने सोयाबीन विक्रीस प्रतिसाद वाढला आहे. ही केंद्र सुरू केल्यामुळे काही प्रमाणात का होईना सोयाबीन खरेदीदार व्यापाऱ्यांवर दबाब वाढला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून दर वाढवला जात आहे.

सोयबीनला आधारभूत दर मिळावा यासाठी जिल्ह्यात चार केंद्रे सुरू आहेत, तसेच सोयबीन काडीकचरा काढण्यासाठी चाळे उपलब्ध करण्यात आले आहेत..शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री खरेदी केंद्रावर करावी.
-ए. एस. देसाई, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, सातारा.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला सल्लाडिसेंबर महिन्यात थंडीचे प्रमाण वाढून दुसऱ्या...
सांगलीत गूळ प्रतिक्विंटल ३३०० ते ४४००...सांगली ः येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी अधिक...
पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांबाबत बोलत नाहीत...अहमदाबाद, गुजरात  ः गुजरातमधील विधानसभा...
भारतात भुईमूग उत्पादन सात दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः पीक क्षेत्रात झालेली वाढ अाणि...
नोकरीसाठीच नव्हे, तर शेतीसाठी कृषी...बुलडाणा : सध्या प्रत्येकाला नोकरी हवी आहे....
कपाशीचे पीक बोंडअळीच्या घशातकिनगाव ः कापूस राज्यातील दुसरे महत्त्वाचे...
डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष... राहुरी, जि. नगर : डॉ. तनपुरे सहकारी साखर...
शरद पवारांकडून ३२ वर्षांनंतर मोर्चाचे...नागपूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज...
विधान भवनावर विरोधकांचा आज हल्लाबोल...नागपूर : शेतकरी कर्जमाफी, बोंड अळीमुळे कपाशीचे...
पुणे जिल्ह्यातील धरणांत १४३ टीएमसी...पुणे : यंदा पुणे जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात...
हरभरा क्षेत्रात ९७ हजार हेक्टरने वाढ परभणी : खरिपातील सोयाबीन, कापूस या प्रमुख नगदी...
शेतकरी आत्महत्येला जबाबदार मंत्र्यांवर...मानोरा, जि. वाशीम ः सोयजना येथील शेतकरी...
नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो हंगाम अंतिम...नाशिक : दसऱ्यापासून सुरू झालेला नाशिक भागातील...
नागपुरात सोयाबीन २८५० ते २९५० रुपयेनागपूर ः पंधरवाड्यापूर्वी २३०० ते २५०० रुपये क्‍...
कोल्हापुरात गवार, मटार तेजीतकोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
धुळे जिल्ह्यात कापसाचे उत्पादन दीड...धुळे ः गुलाबी बोंडअळीचा उद्रेक, सिंचनासाठी...
अमरावतीत बोंडअळीमुळे कपाशीत ५१...अमरावती ः या वर्षीच्या हंगामात जिल्ह्यात एक लाख ३...
खासदार सुप्रिया सुळे यांना नागपुरात अटक...नागपूर : राज्यातील झोपी गेलेल्या सरकारला जागे...
देशातील रब्बी पेरणी माघारलीनवी दिल्ली  : देशभरात शुक्रवारअखेर (ता. ८)...
कुपोषण, प्रथिने जागृतीकडे लक्ष...पुणे : भारतात प्रथिनांच्या कमततेअभावी होणाऱ्या...