agriculture news in marathi, Buy soya bean at minimum subills and buy electricity bills' | Agrowon

'महावितरणने सोयाबीनची हमीभावाने खरेदी करावी'
टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

हिंगोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बागायती पिकांच्या सिंचनासाठी पाण्याची गरज असताना महावितरणने कृषिपंपांच्या वीज देयकांची सक्तीने वसुली सुरू केली आहे; परंतु वीज देयकांची थकबाकी भरण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडे पैसे नसल्यामुळे महावितरणने सोयाबीनची हमीभावाने खरेदी करून वीज देयकांची थकबाकी भरून घ्यावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

हिंगोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बागायती पिकांच्या सिंचनासाठी पाण्याची गरज असताना महावितरणने कृषिपंपांच्या वीज देयकांची सक्तीने वसुली सुरू केली आहे; परंतु वीज देयकांची थकबाकी भरण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडे पैसे नसल्यामुळे महावितरणने सोयाबीनची हमीभावाने खरेदी करून वीज देयकांची थकबाकी भरून घ्यावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

हिंगोली जिल्ह्यामध्ये ७० हजार ७०१ कृषिपंपधारक असून, त्यांच्याकडे ५१४ कोटी २ लाख रुपये वीज देयक थकबाकी आहे. कृषिपंपधारकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील गहू, हरभराच्या पेरणीसाठी रान ओलविता येत नसल्यामुळे पेरणी रखडली आहे. तसेच हळद, केळी, ऊस, कापूस आदी पिकांना पाणी देता येत नाही.

दुसरीकडे आधारभूत किंमत खरेदी केंद्रांवर सोयाबीनचे आर्द्रतेचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा जास्त येत असल्यामुळे अद्याप सोयाबीनची खरेदी सुरू झाली नाही. या परिस्थितीत महावितरणने कृषी पंपाच्या वीज देयकांची वसुली सुरू केली आहे.

पिकांच्या सिंचनासाठी अडथळा येऊ नये म्हणून अनेक शेतकऱ्यांची वीज देयके भरण्याची इच्छा आहे; परंतु त्यांच्याकडे देयक अदा करण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे महावितरण कंपनीनेच सोयाबीनची हमीदराने खरेदी करून वीज देयकांची थकबाकी भरून घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

यासाठी सोमावारी (ता. ३०) हिंगोली येथील महावितरणच्या कार्यालयावर शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पोत्यासह मोर्चा काढला होता. तर विविध पक्ष संघटनांनी शासनाच्या धोरणांचा निषेध केला आहे.

इतर ताज्या घडामोडी
परभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
कोकणात चांगल्या पावसाची शक्यतामहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४...
ढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे...बागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे...
खरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी...सोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष  जमिनीवर...
नाशिक जिल्ह्यात मेंढपाळांची चारा-...नाशिक : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चारा-...
तिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव...तिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (...
पुणे झेडपी : भाकड कालावधीत...पुणे : जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती, जमातीच्या...
मराठवाड्यात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची...औरंगाबाद : जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी...
केळी दरप्रश्‍नी रावेर येथे शेतकऱ्यांचा...जळगाव ः केळीची खानदेशात जाहीर दरांनुसारच खरेदी...
मका, हळद, हरभरा किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी...
पावसाळ्यात टाळा विजेचे धोकेओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. त्यात...
डाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रणडाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे...
खानदेशात लाल कांद्याची आवक घटली; दर...जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत १२२९...नागपूर ः लागवड ते कापणीपर्यंत तंत्रशुद्ध शेती...
बुलडाणा येथे महिलांनी गिरविले बीज...बुलडाणा ः कृषी विभागाची कृषी तंत्रज्ञान...
येवला तालुक्यात कापूस लागवडीला सुरवातनाशिक : मृग नक्षत्रात पावसाने जिल्ह्यात विविध...
सांगली : शनिवारपासून पीकविमा खात्यात...सांगली ः पीकविमा योजनेअंतर्गत आंबिया बहर...
नगर : खरिपात साडेपाच लाख हेक्‍टरवर...नगर : गतवर्षी पावसाने दडी मारल्याने खरीप, रब्बी...
बीडसाठी भरणार मुळा धरणातून टॅंकरराहुरी, जि. नगर : ‘‘मराठवाड्यातील बीड जिल्ह्याची...
रत्नागिरी जिल्ह्यात पेरणीच्या कामाला वेगरत्नागिरी ः वायू चक्रीवादळाचा परिणाम सलग तिसऱ्या...