agriculture news in Marathi, cabbage, flower, bringel and tomato rates increased in pune | Agrowon

पुण्यात कोबी, फ्लॉवर, वांगी, टोमॅटोचे दर वाढले
टीम अॅग्रोवन
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

पुणे : ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्‍यता असल्याने रविवारी (ता. ११) गुलटेकडी मार्केट यार्डात सुमारे १५० ते १६० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली. तर कांद्यांची सुमारे अडीचशे ट्रक आवक होऊनदेखील दर मात्र स्थिर राहिले. आवक वाढल्याने कोबी, फ्लॉवर, वांगी, टोमॅटो, शेवगा, गाजर, घेवडा यांच्या दरात दहा ते वीस टक्‍क्‍यांनी घट झाली. तर आवक घटल्याने आले, गवार, हिरवी मिरची आणि मटार यांच्या दरात अल्पशी वाढ झाली.

पुणे : ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्‍यता असल्याने रविवारी (ता. ११) गुलटेकडी मार्केट यार्डात सुमारे १५० ते १६० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली. तर कांद्यांची सुमारे अडीचशे ट्रक आवक होऊनदेखील दर मात्र स्थिर राहिले. आवक वाढल्याने कोबी, फ्लॉवर, वांगी, टोमॅटो, शेवगा, गाजर, घेवडा यांच्या दरात दहा ते वीस टक्‍क्‍यांनी घट झाली. तर आवक घटल्याने आले, गवार, हिरवी मिरची आणि मटार यांच्या दरात अल्पशी वाढ झाली.

परराज्यांतून बेंगलोर येथून चार टेंपो आल्याची आवक झाली, मध्य प्रदेशमधून १० ते १२ ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून तीन ते चार ट्रक कोबी, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून ५ ते १६ टेंपो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ४ ते ५ टेंपो शेवगा, राजस्थान येथून ७ ते ८ ट्रक गाजर, कर्नाटकातून ३० ते ३५ ट्रक रताळी, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची साडेतीन ते चार हजार गोणी इतकी आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले १० ते १२०० पोती, टॉमेटोची सहा ते साडेसहा हजार पेटी, हिरव्या मिरचीची ३ ते ४ टेंपो, फ्लॉवरची १८ ते २० टेंपो, कोबीची १८ ते २० टेंपो, ढोबळी मिरचीची १० ते २ टेंपो, पावटा ४ ते ५ टेंपो, तांबड्या भोपळ्याची १० ते २ टेंपो, गवारची ३ ते ४ टेंपो, कांद्याची २५० ट्रक, आग्रा, इंदूर आणि गुजरात, तळेगाव येथून नवीन बटाट्याची ६० ते ६५ ट्रक इतकी आवक झाली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कंसात किलोचे भाव
कांदा : १७०-२०० (२५-३०), बटाटा : ६०-११० (१५-२०), लसूण : १५०-३०० (५०-६०), आले : सातारी ः २२०-२६० (५०-६०) बेंगळूर : २६०-२८० (४०-५०), भेंडी : २००-२५० (६०-७०), गवार : ५००-७०० (८०-९०), टोमॅटो : ३०-६०, (१५-२०), दोडका : ३००-४०० (५०-६०), हिरवी मिरची : ३००-४०० (६०-७०), दुधी भोपळा : ४०-८० (३०-४०), चवळी : २००-२५० (५०-६०), काकडी : १२०-१६० (४०-५०), कारली : हिरवी ३०० (५०-६०) पांढरी : २५० (५०-६०), पापडी : १६०-२०० (३०-४०), पडवळ : १६०-१८० (४०-५०), फ्लॉवर : २००-४०० (२५-३०), कोबी : २००-५०० (३०-४०), वांगी : ८०-१४० (३०-४०), डिंगरी : १४०-१६० (५०-६०), नवलकोल : ६०-८० (३०-४०), ढोबळी मिरची : २५०-३०० (२५-३०), तोंडली : कळी २००-२५०, (५०-६०) जाड : १००-१२० (३०-४०), शेवगा : २५०-३०० (६०-७०), गाजर : १००-१४० (३०-४०), वालवर : १००-१४० (४०-५०), बीट : ४०-८० (२०-३०), घेवडा : २००-२५० (५०-६०), कोहळा : १००-१५० (५०-६०), आर्वी : २००-२५० (६०-७०), घोसावळे : १४०-१५० (३०-४०), ढेमसे : १५०-२०० (५०-६०), भुईमूग : ३००-३५० (८०-१००), पावटा : २४०-२६० (४०-५०), मटार : परराज्य : २२०-२४० (४०-५०) स्थानिक : २५०-२८० (४०-४५), तांबडा भोपळा : ८०-१४० (३०-४०), रताळी : ८०-२०० (३०-४०), सुरण : २६०-२८० (५०-६०), मका कणीस : ५०-६० नारळ (शेकडा) : १०००-१६०० (१०-१६)

पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) :
कोथिंबीर : ३००-७०० (१०-१२), मेथी : २००-४०० (८-१०), शेपू : ३००-५०० (१०-१२), कांदापात : ५००-८०० (१०-१२), चाकवत : ४००-५०० (१०-१२), करडई : ३००-५००, (१०-१२), पुदिना : २००-३०० (५-६), अंबाडी : ४००-५००, (१०-१२),मुळे : ५००-८००(१५-२०), राजगिरा : ४००-५०० (१०-१२), चुका ५००-६०० (१०-१२), चवळई : ५००-६०० (१०-१२), पालक : ३००-५०० (१०-१२), हरभरा गड्डी : ५००-७०० (१०-१२) 

फुलबाजार ‘फुलला’
लग्नसराईला सुरवात झाल्याने जर्बेरा, तर दोन दिवसांवर आलेल्या ‘व्हॅलेंटाइन डे’साठी लाल गुलाबाला रविवारी मागणी वाढली. महाशिवरात्रीमुळे झेंडू, शेवंती, गुलछडी, बिजलीला मागणी राहिली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून बाजारात फुलांची आवक वाढली आहे. परिणामी, फुलांच्या दरात १० ते २० टक्‍क्‍यांनी घट झाली आहे, अशी माहिती व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

‘गारेगार’ फळांची गोडी
दिवसभराच्या तपमानात वाढ झाल्याने कलिंगड, खरबूज, मोसंबी, पपईची आवक वाढली. मात्र आवक वाढूनही या फळांचे दर स्थिर राहिले. सफरचंदाचा हंगाम संपत असल्याने चांगल्या दर्जाचे सफरचंद पेटीमागे ५० ते १०० रुपयांनी वधारले. आवक घटून मागणी वाढल्याने डाळिंबाचे दर १० ते २० टक्‍क्‍यांनी वाढले. तर आवक वाढल्याने लिंबांचे दर गोणीमागे ४० ते ५० रुपयांनी घटले. उन्हाचा तडका वाढल्यामुळे चांगल्या प्रतीच्या द्राक्षांची आवक वाढली असून, गोडीदेखील वाढली आहे.

आंब्यांचा राजाचा दिमाखात प्रवेश
देवगड येथील कुणकेश्‍वर येथून या हंगामीतील पहिल्याच देवगड हापूस आंब्यांची आवक झाली. ही आवक पत्र्याच्या पेटीतून झाली. एका पेटीत सहा डझन आंबे असल्याचे व्यापारी युवराज काची यांनी सांगितले. एका पेटीचा दर (सहा डझन) पाच हजार रुपये असा आहे. या पेट्यांची पूजा बाजार समितीचे सचिव बी. जे. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली. देवगड हापूस आंब्याची आवक दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरू होते, तर मार्चमध्ये थांबते. उन्हाळा वाढला की हे आंबे टिकत नाही, असेही काची यांनी सांगितले. 

मासळी दर वाढले
वातावरणातील बदलांमुळे देशाच्या पूर्व व पश्‍चिम किनारपट्टीवरील स्थानिक बाजारपेठांमध्ये मासळीची आवक घटली आहे. आवकच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने गेल्या आठवड्यात तुलनेत मासळीच्या दरात १० ते २० टक्कयांची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात आवक कमी होऊनही मासळीचे दर स्थिर राहिले होते. या आठवड्यात मात्र तेवढीच आवक होऊनदेखील दरामध्ये थोडी वाढ झाली आहे. रविवारी गणेश पेठेतील घाऊक बाजारात खोल समुद्रातील मासळीची सुमारे आठ टन, खाडी व नदीतील मासळीची प्रत्येकी २०० ते २५० किलो इतकी आवक झाली. तर, आंध्र प्रदेशातील रहू, कतला, सीलन या मासळींची सुमारे दहा ते बारा टन आवक झाली असल्याची माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. दरम्यान, मटणाचे दर स्थिर असून, चिकनच्या भावात १० रुपयांनी घट झाली आहे. तर, गावरान अंड्याच्या दरात शेकड्यामागे २० रुपयांनी आणि इंग्लिश अंड्याच्या दरात शेकड्यामागे ५ रुपयांनी वाढ झाली आहे. अंड्याचे प्रतिनगाचे दर स्थिर आहेत.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...