परभणीत कोबी प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये

कोबी
कोबी

परभणी ः कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २२) कोबीची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. गवारीची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २२०० ते ३००० रुपये दर मिळाले. पालकाची १८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३०० ते ७०० रुपये दर मिळाले. मेथीच्या ६० हजार जुड्यांची आवक असताना प्रतिशेकडा १०० ते २५० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ७० क्विंटल आवक तर प्रतिक्विंटल ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ५०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. वांग्याची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ३० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २०००  ते २८०० रुपये दर मिळाले. फ्लाॅवरची ३५ क्विंटल आवक झाली तर प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. दोडक्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. कारल्याची १५ क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. काकडीची २० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १५ क्विंटल आवक तर प्रतिक्विंटल ४०० ते १००० रुपये दर मिळाले. गाजरची १०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. लिंबाची ४० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. पपईची २० क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटल ६०० त १२०० रुपये दर मिळाले. बीट रुटची ३ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com