agriculture news in marathi, Cabinet sub-committee for micro-irrigation of sugarcane | Agrowon

उसाच्या सूक्ष्म सिंचनाखाली मंत्रिमंडळ उपसमिती
टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

मुंबई : राज्यातील ऊस पिकाखालील क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठी योजनेला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नियुक्त करण्यात आली.

मुंबई : राज्यातील ऊस पिकाखालील क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठी योजनेला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नियुक्त करण्यात आली.

ऊस पिकाखालील क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणावयाच्या योजनेमध्ये ऊस पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन बसविण्यासाठी प्रतिहेक्टरी ८५ हजारच्या मर्यादेत ५ हेक्टरपर्यंत सवलतीच्या दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी नाबार्डकडून ५.५० टक्के दराने कर्ज घेऊन राज्य शिखर बँक व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ७.२५ टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर व्याजाच्या दायित्वापैकी ४ टक्के व्याजाचे दायित्व राज्य शासन व १.२५ टक्के व्याजाचे दायित्व साखर कारखाने सोसणार आहेत. शेतकऱ्यांना फक्त २ टक्के व्याजाच्या रकमेचा भरणा करावा लागणार आहे.

अशी आहे समितीची कार्यकक्षा
सहकारमंत्री अध्यक्ष असलेल्या या उपसमितीमध्ये कृषिमंत्री, जलसंपदामंत्री, जलसंधारणमंत्री यांचा सदस्य म्हणून, तर साखर आयुक्त यांचा सदस्य सचिव म्हणून समावेश आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांकडून कर्जासाठी अर्ज मागविणे, कर्ज प्रस्ताव तयार करणे व कर्जवसुलीबाबत कार्यपद्धती निश्चित अशी समितीची कार्यकक्षा आहे.

इतर बातम्या
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत व्याज माफ;...बारामती, पुणे ः "छत्रपती शिवाजी महाराज...
सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ... सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ...
जळगावमधील शेतकऱ्यांचा परदेश अभ्यास दौरा... जळगाव : परदेशातील शेतीचे तंत्रज्ञान, शेती,...
बुलडाणा जिल्ह्यातील ७४८ गावे... बुलडाणा : जिल्ह्यात २०१७-१८ च्या खरीप हंगामात...
टीस विद्यापीठ-एसआयआयएलसी शैक्षणिक करारपुणे : शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित टाटा...
मोहरीवर्गीय आच्छादन पिके तण...तणनाशकांना प्रतिकारकता विकसित झालेली असल्याने...
बीटी बियाणे भरपूर; पण धुळपेरणी टाळापुणे : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना...
औरंगाबाद विभागात ७२ लाख ५१ हजार टन ऊस...औरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील सहा...
नाशिक जिल्ह्यातील धरणात ४६ टक्केच पाणी...नाशिक : मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात हवामानातील...
मराठवाड्यात शेततळ्यांचे पूर्णत्‍व...औरंगाबाद : मराठवाड्यात उद्दीष्टाच्या तुलनेत...
'कृषी उद्योग'मधील वादग्रस्त सूर्यगण...पुणे : महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळातील...
‘फॉस्फोनिक ॲसिड’च्या आढळाने ‘सॅंपल फेल’...पुणे : डाळिंब पिकात केवळ सातच लेबल क्लेम...
बोंड अळी, धान नुकसानग्रस्तांना मदतीसाठी...पुणे : बाेंड अळीच्या प्रादुर्भावाने नुकसान...
बेदाण्याचे यंदा तीस टक्केच उत्पादनसांगली : राज्यात दरवर्षी सुमारे २ लाख टन...
हमीभावाच्या मुद्द्यावरून गैरसमज पसरवले...नवी दिल्ली : उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक...पुणे : राज्यावर अवकाळीचे ढग असल्याने पावसाचे सावट...
आसामी रेडकाचा ‘क्लोन’ यशस्वीहिस्सार, हरियाणा : येथील केंद्रीय म्हैस संशोधन...
राज्यात १५ लाख टन साखर उत्पादन वाढलेकोल्हापूर : राज्यात सुरू हंगामात यंदा अंदाजपेक्षा...