agriculture news in marathi, camp for crop loan distribution, buldhana, maharashtra | Agrowon

पीककर्जासाठी बुलडाण्यात महसूल मंडळस्तरावर मेळावे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 जून 2018

बुलडाणा  : खरीप हंगामाची लगबग सुरू होऊनही जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचा टक्का वाढलेला नाही. त्यामुळे प्रशासनाने पीक कर्जवाटपासाठी महसूल मंडळस्तरावर मेळाव्यांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला अाहे. याची अंमलबजावणी गुरुवारपासून (ता.१४) सुरू करण्यात अाली.

बुलडाणा  : खरीप हंगामाची लगबग सुरू होऊनही जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचा टक्का वाढलेला नाही. त्यामुळे प्रशासनाने पीक कर्जवाटपासाठी महसूल मंडळस्तरावर मेळाव्यांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला अाहे. याची अंमलबजावणी गुरुवारपासून (ता.१४) सुरू करण्यात अाली.

मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाकरिता सर्व आवश्यक कागदपत्रे एका छत्राखाली उपलब्ध होणार असून, सर्वांना वेळीच कर्जपुरवठा करण्यात येणार आहे; तसेच महसूल मंडळांतील संबंधित बँकेचा पीककर्जासाठीचा विहित नमुन्यातील अर्ज व पीककर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे याबाबत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माहिती देत पीककर्ज देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

खरिपाची लगबग सुरू झालेली असताना बुलडाणा जिल्ह्यात खोत यांच्यासमोर सादर केलेली अाकडेवारी केवळ ३.५ टक्के एवढी होती. कर्जवाटपात बुलडाणा जिल्हा अमरावती विभागात जिल्हा सर्वात पिछाडीवर अाहे. याबाबत मंत्र्यांनी तीव्र शब्दांत बँकांबाबत नाराजी व्यक्त केली होती. अखेरीस कर्जवाटपाला गती देण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले.

अाता महसूल मंडळ स्तरावर मेळाव्याचे अायोजन केले जात अाहे. या मेळाव्यासाठी तालुकास्तरीय पीककर्ज वाटप सुलभीकरण समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. समित्यांच्या माध्यमातून पीककर्ज वाटपावर नियंत्रण ठेवले जाईल. या समितीची दर आठवड्याला बैठक होईल; तसेच या बैठकीत प्राप्त तक्रारींचे निवारण केले जाणार आहे. मेळाव्यासाठी संबंधित तलाठी, सचिव, कृषी सहायक, कृषी मंडळ अधिकारी आदींसह सर्व यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

पीककर्ज वाटपामध्ये शेतकऱ्यांना अनावश्यक त्रास होऊ नये यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी प्रत्येक बँकेच्या प्रत्येक शाखेमध्ये तहसील, पंचायत समिती, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध केल्या जात आहे. या मेळाव्याबाबत तहसीलदारांनी गावात पूर्वप्रसिद्धी द्यावी व अधिकाधिक शेतकरी हजर राहतील याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही देण्यात अाल्या अाहेत.

गुरुवारी (ता.१४) बुलडाणा, रायपूर, चिखली, अमडापूर, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, कि.राजा, लोणार, बिबी, मेहकर, जानेफळ, खामगाव, पिंपळगाव राजा, शेगाव, मलकापूर, नांदुरा, वडनेर भोलजी, मोताळा, बोराखेडी, संग्रामपूर, सोनाळा, जळगांव, जामोद या मंडळांत मेळावे घेण्यात अाले.

शुक्रवारी (ता.१५) धाड, उंद्री, एकलारा, देऊळगावमही, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, सुलतानपूर, हिवरा आश्रम, शेलगाव देशमुख, लाखनवाडा, हिवरखेड, माटरगाव, दाताळा, शेंबा, नायगाव, धामणगाव बढे, बावनबीर, पातुर्डा, पिंपळगाव या मंडळांत मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.

शनिवारी (ता.१६) पाडळी, म्हसला, कोलारा, मेरा बुद्रुक, हातणी, तुळजापूर, सोनोशी, टिटवी, डोणगाव, देऊळगाव माळी, काळेगाव, आवार, जलंब, नरवेल, चांदुर बिस्वा, पिंप्री गवळी, कवठळ, वडशिंगी येथे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.

रविवारी (ता.१७) साखळी, धोडप, पेठ, मेहुण राजा, शेंदुर्जन, हिरडव, वरवंड, लोणी, अटाळी, पळशी, जवळा, धरणगाव, महाळुंगी, रोहीणखेड, आसलगांव येथे, तर सोमवारी (ता.१८) पिंपळगाव देवी, शेलापूर, जांभूळधाबा, मनसगाव, अडगाव, वझर, पारखेड, अंजनी, नायगाव, अंजनी, साखरखेर्डा, अंढेरा, शेलगाव आटोळ, चांदई व देऊळघाट या मंडळांत मेळावे होणार अाहेत.

इतर ताज्या घडामोडी
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...