यवतमाळ जिल्हा प्रशासनाने राबविली अर्ज द्या कर्ज घ्या मोहीम

पीककर्ज वितरण
पीककर्ज वितरण

यवतमाळ : खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पीककर्जासाठी उंबरठे झिजवावे लागू नये किंवा त्यांची कर्जप्रकरणे लालफितीत अडकू नये याकरिता जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत रविवारी (ता. २०) अर्ज द्या, कर्ज घ्या उपक्रम राबविला. जिल्हाभरातील २३९ बॅंक शाखांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.

थकीत कर्जदारांना जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या वतीने फक्‍त दहा ते पंधरा हजार रुपयांचे पीककर्ज देण्याचे धोरण राबविण्यात येणार आहे. ज्या थकीत शेतकऱ्यांना हे मान्य नसेल त्यांचे खाते राष्ट्रीयकृत बॅंकेला जोडले जाईल, अशी भूमिका बॅंकेने घेतली आहे.

दरम्यान बॅंकांकडून खरीप हंगामाच्या तोंडावरच  शेतकऱ्यांना अडचणीत आणणारी धोरण राबविली जातात. ही बाब लक्षात घेता प्रशासनाने खरीप पीककर्ज वितरणाकरीता रविवारीसुद्धा बॅंक शाखा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना पीककर्ज सुलभरीत्या मिळावे याकरीता अर्ज दया, कर्ज घ्या अशी खास मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा बॅंक त्यासोबतच राष्ट्रीयीकृत बॅंकांना देखील ही मोहीम राबविण्याची सक्‍ती करण्यात आली आहे.

अर्ज दया, कर्ज घ्या उपक्रमाच्या अंमलबजावणीकरिता प्रशासनाकडून २३९ बॅंक शाखांकरिता २३९ संपर्क अधिकारी नियुक्‍त करण्यात आले आहेत. उपजिल्हाधिकाऱ्यांपासून ते सहायक गटविकास अधिकाऱ्यांपर्यंतच्या वर्गवारीतील हे संपर्क अधिकारी आहेत. शेतकऱ्यांच्या दस्तऐवजांची पडताळणी करुन त्यांना बॅंकांच्या प्रशासानाने कर्ज देण्याबाबतची जबाबदारी या संपर्क अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

रविवारी (ता.२०) यवतमाळ शहरातील सेंट्रल बॅंकेत २१ शेतकऱ्यांनी अर्ज केले. त्यांची कर्ज प्रकरणे तत्काळ मंजूर करुन कर्ज वितरित केले जाणार आहे. दर रविवारी ही मोहीम राबविली जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com