agriculture news in Marathi, In the camps of Sinnar taluka, 1094 were admitted | Agrowon

सिन्नर तालुक्यातील छावण्यांमध्ये १०९४ जनावरे दाखल
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 मे 2019

नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या महिण्याभरापासून चारा छावण्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर तग धरून होती. अखेर जिल्हा प्रशासनाने विविध संस्थांच्या माध्यमातून चारा छावण्या सुरू केल्या आहेत. सिन्नर तालुक्यात तीन ठिकाणी छावण्या सुरू झाल्या असून अनेक शेतकऱ्यांनी १०९४ जनावरे या ठिकाणी दाखल केली आहेत. 

नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या महिण्याभरापासून चारा छावण्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर तग धरून होती. अखेर जिल्हा प्रशासनाने विविध संस्थांच्या माध्यमातून चारा छावण्या सुरू केल्या आहेत. सिन्नर तालुक्यात तीन ठिकाणी छावण्या सुरू झाल्या असून अनेक शेतकऱ्यांनी १०९४ जनावरे या ठिकाणी दाखल केली आहेत. 

सिन्नर तालुक्याच्या विविध भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. शेतकऱ्यांना जनावरांच्या चारा पाण्याच्या शोधात वणवण भटकंती करावी लागत होती. शेतकऱ्यांनी चारा छावणी सुरू करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून केली होती. त्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील पहिली चारा छावणी ग्रामविकास फाउंडेशनने ६ हेक्टर जागेत गुळवंच येथे सुरू केली आहे. या छावणीत पहिल्या दिवशी ७० पेक्षा अधिक लहान व मोठी जनावरे दाखल झाली होती. यानंतर जिल्ह्याचे पालक सचिव सीताराम कुंटे यांनी गुळवंच येथील चारा छावणी सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली होती. या भेटीदरम्यान शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.

दरम्यान तालुक्याचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी चारा छावणीस भेट देऊन जनावरांची काळजी घेण्याच्या सूचना छावणी सुरू केलेल्या संस्थांना व शेतकऱ्यांना दिल्या आहेत. तालुक्यातील दुसरी चारा छावणी आडवाडी येथे सुरू असून, तालुक्यातील तिसरी छावणी खाप राळे येथे मंजूर झाली आहे. तिसरी छावणी सुद्धा लवकरच सुरू होणार आहे. 

या छावण्यांमध्ये स्थानिक व परिसरातील शेतकऱ्यांनी गायी, बैल यांसह लहान जनावरे दाखल केली आहेत. जनावरांच्या चाऱ्यासाठी मका, ऊस असा हिरवा चारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

पशुसंवर्धन विभागाचे विशेष लक्ष 
जनावरांच्या उपचारासाठी स्वतंत्र पशुवैद्यकीय पथक प्रत्येक छावणीसाठी स्थापन करण्यात आले आहे. काही गरज भासल्यास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जनावरांची तपासणी करण्याबाबतही सूचना करण्यात आलेल्या आहेत. पशुसंवर्धन विभागाचे पशुवैद्यक दैनंदिन पाहणी, लसीकरण यांसह संसर्गजन्य रोग उदभवू नये, यासाठी विशेष लक्ष देणार आहेत. जनावरांचा देण्यात येणारा चारा गुणवत्तेचा आहे की नाही याबाबत वेळोवेळी तपासण्या करण्यात येणार आहे. 

चारा छावण्यांची सद्यःस्थिती

सुरू झालेल्या एकूण चारा छावण्या

दाखल झालेली जनावरे

ठिकाण जनावरे 
गुळवंच ४२९
आडवाडी ६६५

 

इतर बातम्या
मॉन्सूनने अलिबाग, मालेगावपर्यंतचा भाग...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी...
‘म्हैसाळ’पासून जतचा पूर्व भाग वंचितसांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६४ गावाला...
विकासकामांचे सूक्ष्म नियोजन करा :...परभणी : जिल्ह्यतील विविध विकास कामांचे सूक्ष्म...
पूर्व विदर्भात दमदार पाऊसनागपूर : पश्चिम आणि दक्षिणेकडून मॉन्सून येणे...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पाऊसकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
फिरत्या पशुचिकित्सालयामार्फत पशूंवर...बुलडाणा  : महाराष्ट्र विधानसभेत काल सादर...