agriculture news in Marathi, Cancel the promotion of Assistant Livestock Development Officers | Agrowon

सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या पदोन्नती रद्द करा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 मार्च 2019

मुंबई ः पशुसंवर्धन विभागाने १२५ सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांना नियम डावलून पदोन्नती दिल्याच्या निषेधार्थ मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. पशुसंवर्धन विभागातील सहायक पशुधन विकास अधिकारी "गट क" या संवर्गात कार्यरत कर्मचाऱ्यांना पशुधन विकास अधिकारी "गट ब" या पदावर दिलेली तात्पुरती पदोन्नती रद्द करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. 

मुंबई ः पशुसंवर्धन विभागाने १२५ सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांना नियम डावलून पदोन्नती दिल्याच्या निषेधार्थ मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. पशुसंवर्धन विभागातील सहायक पशुधन विकास अधिकारी "गट क" या संवर्गात कार्यरत कर्मचाऱ्यांना पशुधन विकास अधिकारी "गट ब" या पदावर दिलेली तात्पुरती पदोन्नती रद्द करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. 

राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने ११ मार्च रोजी गट क अंतर्गत येणाऱ्या १२५ सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांना पशुधन विकास अधिकारी गट ब या पदावर पदोन्नती दिली आहे. पशुधन विकास अधिकारी नियुक्तीसाठी साडेपाच वर्षांचा बीव्हीएसस्सी अँड एएच हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो या पदवीच्या प्रवेशासाठी बारावीनंतर नीट (NEET) ही प्रवेश परीक्षा द्यावी लागते. याउलट पशुधन पर्यवेक्षक मात्र दहावी व नंतर दोन वर्षांची पदविका करूनच पशुधन विकास अधिकारी पदासाठी पात्र ठरतात याला विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे. 

पदविका प्राप्त करून सहायक पशुधन विकास अधिकारी गट क पदावर कार्यरत असलेल्या १९८४च्या भारतीय पशुवैद्यक कायद्यानुसार पशुधन विकास अधिकारी या पदावर पदोन्नती देता येत नाही, विशेष असे की सद्यःस्थितीत पशुधन विकास अधिकारी गट ब हे पद या विभागात अस्तित्वातही नाही. त्यामुळे ही पदोन्नती बेकायदेशीर आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

पशुधन विकास अधिकारी ब या पदनामामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन त्यांना ही मंडळी डॉक्टर आहे असे भासवले जाईल यामुळे शेतकऱ्यांना डॉक्टरऐवजी कंपाउंडरचे मार्गदर्शन डॉक्टर म्हणून मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे पशुधनाच्या आरोग्याशी खेळ होणार असल्याने हा प्रकार थांबवावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. त्यामुळे ही अवैधरीत्या दिलेली पदोन्नती मागे घेण्यात यावी, पशुधन विकास अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशा विविध मागण्या आंदोलक विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.

इतर बातम्या
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
पुणे विभागात हरभरा, गव्हाची काढणी...पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने रब्बी हंगामातील गहू...
पूर्व भागात कृष्णा, वारणा नद्या पडल्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पूर्व भागात कृष्णा व...
ताकारीच्या तिजोरीत १३ कोटी शिल्लकवांगी, जि. सांगली ः मागील १५ वर्षांपासून दरवर्षी...
गिरणा नदीतून पाण्याची ग्रामस्थांना...जळगाव ः पिण्याच्या पाण्यासंबंधी सोडलेले गिरणा...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
दुबळवेल ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कारवाशीम : नागरिकांना अावश्यक असलेल्या पायाभूत...
नांदेड, परभणी, हिंगोलीत अन्नत्याग आंदोलननांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
दुष्काळी भागाला मिळतोय चिंचेचा आधारशिरूर कासार, जि. बीड ः दुष्काळाच्या गंभीर झळा...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या कायम ः...राहुरी विद्यापीठ, जि. नगर : विविध पिकांच्या...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...