agriculture news in marathi, Candidates busy for filing nominations for Akola, Buldhana | Agrowon

अकोला, बुलडाण्यात अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची लगबग
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 मार्च 2019

अकोला : लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. सोमवारी (ता.२५) वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा मतदार संघात अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची लगबग दिसून आली.

अकोला : लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. सोमवारी (ता.२५) वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा मतदार संघात अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची लगबग दिसून आली.

अकोला लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांनी शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. शहराचे आराध्यदैवत राजराजेश्वराचे दर्शन घेत ते हजारो समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार गोवर्धन शर्मा,गोपीकिशन बाजोरीया, प्रकाश भारसाकळे यांच्यासह भाजप-शिवसेना व अन्य समर्थक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. अकोल्यात प्रमुख उमेदवारापैकी केवळ धोत्रे यांचा आतापर्यंत अर्ज दाखल झाला आहे.

या घडामोडींमध्ये रविवारी (ता.२४) काँग्रेसने अकोल्यासाठी गेल्या वेळचे उमेदवार हिदायत पटेल यांना उमेदरवारी जाहीर केली. या जागेसाठी शेवटपर्यंत काँग्रेसकडून नाव निश्चित केले जात नव्हते. जातीय मतदारांचे गणित लक्षात घेत काँग्रेसने पटेल यांना पुन्हा रिंगणात उतरविले. बहुजन वंचित आघाडीने मात्र अंतिम क्षणापर्यंत आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले नव्हते. कदाचित 
रात्री घडामोडी होऊन मंगळवारी आघाडीच्या उमेदवाराचे नाव जाहीर करून अर्ज दाखल केला जाईल. तसेच पटेल यांनाही अर्ज दाखल करण्यासाठी काही तासांचा अवघी मिळालेला आहे.

बुलडाण्यात प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
बुलडाणा येथे शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजप-शिवसेना व समविचारी पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. बुलडाणा मतदार संघातून महाआघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. बुलडाण्यात यापुर्वी बहुजन वंचित आघाडीकडून बळीराम सिरस्कार यांनी अर्ज दाखल केला आहे. या जिल्हयात आता प्रमुख तीनही पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. जिल्ह्यातील प्रमुख उमेदवारांच्या नावांची घोषणा आधीच झालेली असल्याने त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली.

इतर ताज्या घडामोडी
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला चैत्री...सोलापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या चैत्री...
अकोला जगात ‘हॉट’ शहरांच्या यादीतअकोला : मागील दोन दिवसांपासून या भागात उष्णतेचे...
दुष्काळी भागात दाहकता वाढलीसावळज, जि. सांगली : कायमस्वरूपी दुष्काळी भाग...
विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या :...नाशिक : लोकसभेची ही निवडणूक विकासाची, सामान्य...
राहुल गांधी यांची आज संगमनेरात सभानगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काॅँग्रेसचे...
तयार करा सेंद्रिय निविष्ठाअलीकडे सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची...
रताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...
निवडणूक संपली, आता तरी दुष्काळी...सांगली ः लोकसभेची आचारसंहिता एक महिन्यापासून सुरू...
चौथ्या टप्प्यात १०९ कोट्यधीश उमेदवार...मुंबई ः राज्यातील चौथ्या टप्प्याची निवडणूक...
पुणे ः खरिपासाठी एक लाख ८५ हजार टन...पुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू...
राज्यात कलिंगड प्रतिक्विंटल ५०० ते २१००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते ११०० रुपये अकोला ः...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...