agriculture news in Marathi, candidates on fast for demanding giving appointment latter to project affected candidates in parbhani, Maharashtra | Agrowon

पात्र प्रकल्पग्रस्त उमेदवारांना नियुक्तिपत्र देण्यासाठी उपोषण
टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 नोव्हेंबर 2017

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत प्रकल्पग्रस्तांपैकी ८४ उमेदवारांना नुकतेच नियुक्तिपत्र देण्यात आले आहे. यावर आक्षेप घेण्यात आला असून, प्रकल्पग्रस्तांपैकी पात्र उमेदवारांनाच नियुक्तीचे आदेश देण्यात यावेत, या मागणीसाठी पाच गावांतील प्रकल्पग्रस्तांनी सोमवार (ता. २७)पासून कृषी विद्यापीठांच्या प्रवेशद्वारांवर बेमुदत उपोषण सुरू केले असून, ते मंगळवारी (ता. २८) दुसऱ्या दिवशीही सुरू होते.

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत प्रकल्पग्रस्तांपैकी ८४ उमेदवारांना नुकतेच नियुक्तिपत्र देण्यात आले आहे. यावर आक्षेप घेण्यात आला असून, प्रकल्पग्रस्तांपैकी पात्र उमेदवारांनाच नियुक्तीचे आदेश देण्यात यावेत, या मागणीसाठी पाच गावांतील प्रकल्पग्रस्तांनी सोमवार (ता. २७)पासून कृषी विद्यापीठांच्या प्रवेशद्वारांवर बेमुदत उपोषण सुरू केले असून, ते मंगळवारी (ता. २८) दुसऱ्या दिवशीही सुरू होते.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत बलसा, शेंद्रा, खानापूर, रायपूर, सायाळा येथील प्रकल्पग्रस्त पात्र उमेदवार असून, जाहिरातीनुसार विविध पदांसाठी लेखी परीक्षा व तोंडी परीक्षा दिली होती. त्या वेळी प्रकल्पग्रस्तांच्या रिक्त पदांपैकी १२८ प्रकल्पग्रस्त उमेदवारांची निवड सूची तयार करण्यात आली. यापैकी गेल्या आठवड्यात ८४ उमेदवारांना नियुक्तिपत्र देत नोकरीत सामावून घेतले आहे.

परंतु, हे नियुक्तीचे आदेश चुकीच्या पद्धतीने देण्यात आले आहेत. अनेक कुटुंबांतील एकही व्यक्ती यापूर्वी विद्यापीठामध्ये नोकरीस नसताना, उमेदवार पात्र असताना त्यांना डावलण्यात आले आहे. प्रकल्पग्रस्तांवर जाणीवपूर्वक अन्याय करण्यात आला आहे. उर्वरित रिक्त जागांवर प्रकल्पग्रस्त कुटुंबांतील पात्र सदस्यांना नियुक्तीचे आदेश देऊन नोकरीत सामावून घ्यावे.

तत्कालीन निवड समितीने नियुक्तीचे आदेश दिलेल्या प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे करण्यात आली आहे. या मागणीसाठी पाच गावांतील प्रकल्पग्रस्तांनी विद्यापीठ प्रवेशद्वारावर सोमवार (ता. २७)पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

दरम्यान, प्रकल्पग्रस्तांना घरटी एक या नियमाप्रमाणे वर्ग ३ आणि ४ मधील पदांवर भरती करण्यात यावी. नियमबाह्य भरती, गैरप्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी लाल बावटा शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार विजय गव्हाणे, कार्याध्यक्ष अजय गव्हाणे यांनी केली आहे. 

‘‘२०१३ मध्ये तत्कालीन निवड समितीने १२८ प्रकल्पग्रस्त उमेदवारांची निवड सूची तयार केली होती. त्यानुसार ८४ उमेदवारांना नियुक्तिपत्र देण्यात आले आहेत,’’ असे कुलगुरू डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
महाराष्ट्रात भावांतर योजना लागू...परभणी ः शेती एवढ्या समस्या कुठेच नाहीच. सर्व...
तयारी रब्बी हंगामाची...खरीप पिकांच्या काढणीनंतर रब्बी हंगामासाठी...
ऊसदर नियंत्रण समितीची पहिली बैठक...मुंबई : ऊसदर नियंत्रण समितीची बैठक सोमवारी (ता.१७...
डाळिंब उत्पादनात घट होण्याची शक्यतासांगली ः राज्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे...
शास्त्रज्ञ भरती मंडळावर कृषी...पुणे : देशाच्या कृषी शिक्षण संस्थांना नव्या...
शेतमाल तारण योजना न राबविणाऱ्या बाजार... मुंबई : शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळावा...
सिंचन प्रकल्पांसाठी ६५ हजार कोटी :...नवी दिल्ली ः देशातील सिंचन प्रकल्पांचा विकास...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : पोषक हवामान तयार झाल्याने रविवारी (ता. १६...
अविरत कष्टातून सिंचन, अर्थकारणाला दिले...जयपूर (जि. अौरंगाबाद) येथील राजू, भाऊसाहेब व...
शेतकऱ्यांकडून घेतलेल्याच दुधाची भुकटी...जळगाव ः राज्यात प्रतिदिन सहकारी व इतर प्रमुख दूध...
एकमेकांच्या साथीनेच जिद्दीने फुलवली...उस्मानाबाद जिल्ह्यात असलेल्या अनसुर्डा गावातील सौ...
स्वदेशी इथेनॉलमुळे एक लाख कोटींची होणार...सोलापूर : यंदा पेट्रोलियम मंत्रालयास...
पाणीवापर संस्थांना ठिबक सिंचनाची अट मुंबई : ठिबक सिंचन पद्धतीनेच शेतीला पाणी...
‘आयपीएम’चा विसर नकोआयपीएम अर्थात एकात्मिक कीड नियंत्रण तंत्राचा वापर...
खाडी से नही, अब तेल आयेगा बाडी सेभारतीय जनता पार्टीचे छत्तीसगड राज्याचे ...
मराठवाड्यातील प्रकल्पांत ३३.६० टक्के...औरंगाबाद  : पावसाळ्याचा कालावधी संपत आलेला...
निम्मा सप्टेंबर कोरडाच; खरिपावर संकटपुणे : सप्टेंबर महिन्यात सुरवातीपासून राज्यात...
शेतीमाल वाहतूक दरात वाढ होण्याच्या...पुणे  ः एकीकडे शेतीमालाला बाजारभाव नाहीत...
दीर्घ खंडामुळे नांदेड, परभणी, हिंगोलीत...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
राज्यात नव्याने सात हजार एकरांवर तुती...औरंगाबाद : आर्थिक उन्नतीचा मार्ग शाश्वतरीत्या...