ऊस उत्पादनात येणार अंदाजापेक्षा १० टक्के घट

राज्यात यंदा गाळपासाठी ९४० लाख टन ऊस राहण्याची शक्यता सरकारी आकडेवारीची आहे. मात्र त्यापेक्षाही जादा ऊस राहील, अशी स्थिती गेल्या महिन्यापर्यंत होती. आता मात्र परागंदा पाऊस, हुमणी आणि तांबेरा या तीन समस्या वाढल्याने उत्पादनात किमान दहा टक्के घट येईल. - जयप्रकाश दांडेगावकर, उपाध्यक्ष, महाराष्ट्र सहकारी साखर कारखाने संघ
ऊस उत्पादनात येणार अंदाजापेक्षा १० टक्के घट
ऊस उत्पादनात येणार अंदाजापेक्षा १० टक्के घट

पुणे : पावसाअभावी राज्याच्या ऊस उत्पादनात आधीच्या अंदाजापेक्षा किमान दहा टक्के घट येण्याची शक्यता साखरउद्योगातून व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात यंदा ११ लाख ६२ हजार हेक्टरवर ऊस उभा असून, त्यातून किमान ९४१ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल, असा अंदाज शासनाचा आहे.  साखर कारखान्यांची माहिती गोळा केल्यानंतर उसाचे क्षेत्र १४ लाख ५९ हजार हेक्टर निघते. तसेच, कृषी विभागाने साडेदहा लाख हेक्टरवरच ऊस असल्याची माहिती दिली आहे. गाळप हंगाम यंदा लवकर सुरू करण्याचा प्रयत्न यंदा सरकारचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र सदूर संवेदन उपयोजन केंद्राकडून सॅटेलाइट डाटावर आधारित अजून सुधारित माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.  महाराष्ट्र सहकारी साखर कारखाने संघाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले, की शासनाच्या अंदाजापेक्षाही जादा ऊस असल्याचे आम्हाला गेल्या महिन्यापर्यंत वाटत होते. मात्र, आता स्थिती बदलली आहे. हुमणीने राज्यातील उसाची मोठ्या प्रमाणात नासाडी केली आहे. तांबेऱ्याचे प्रमाण जास्त आहे. त्यात पुन्हा पावसाचा ताण बसल्याने उत्पादकता घटणार आहे. राहुरीच्या प्रसाद शुगर कारखान्याचे मुख्य महाव्यवस्थापक सुकदेव शेटे यांनी ऊस उत्पादनात काही भागात १५ टक्क्यांपर्यंत घट येणार असल्याचे स्पष्ट केले. ‘‘जुलै ते सप्टेंबर याच काळात मुख्यत्वे उसाचे पोषण होते. मात्र, पाण्याचा ताण वाढत असल्याने पुढील दोन आठवड्यांत चांगला पाऊस अपेक्षित आहे,’’ असे श्री. शेटे म्हणाले.  राज्यात पावसाची वाटचाल बऱ्यापैकी सुरू असल्यामुळे गेल्या महिन्याच्या स्थितीनुसार राज्य शासनाने उसाची उत्पादकता प्रतिहेक्टरी ९० टन गृहीत धरली होती. त्यानुसार ११.६२ लाख हेक्टरवरून गाळपाला ९४१ लाख टन उस मिळेल, असे शासनाला वाटत होते. आता मात्र हा अंदाज बदलला जाण्याची शक्यता आहे.  "प्रतिहेक्टरी ९० टन उत्पादकता गृहीत धरून आम्ही यंदाच्या साखर हंगामात उतारा ११.३० टक्के गृहीत धरला होता. त्यानुसार १०६.३६ लाख टनाच्या आसपास साखर उत्पादन अपेक्षित होते. पावसाअभावी जास्त ताण बसल्यास राज्याचे साखर उत्पादन देखील १०० लाख टनाच्या खाली राहू शकते, असे मत साखरउद्योगातील सूत्रांनी व्यक्त केले.  राज्य शासनाच्या अंदाजानुसार उपलब्ध ऊस (क्षेत्र लाख हेक्टरमध्ये) (ऊस उपलब्धता लाख टनांत)  

विभाग    ऊस क्षेत्र उपलब्धता  
कोल्हापूर     २.३९   २१७
पुणे  ४.१४   ३६७
नगर १.४९  १४६
औरंगाबाद    १.४२    ८७
नांदेड   १.९९ ११४
अमरावती    ०.०४   ५
नागपूर ०.१३   ५ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com