agriculture news in marathi, cane sugar workers decreased by 30 percent | Agrowon

ऊसतोडणी मजूर संख्या ३० टक्‍क्‍यांनी घटली
अभिजित डाके
रविवार, 17 डिसेंबर 2017

सांगली : सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात कारखान्यांनी गाळप हंगाम जोरदार सुरू केला आहे. मात्र, दक्षिण महाराष्ट्रात ऊस तोडणी मजुरांची संख्या 30 टक्‍क्‍यांनी घटली आहे. याचा परिणाम गाळप हंगामावर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यंदाचा गाळप हंगाम सुमारे 15 ते 25 दिवसांनी लांबणार असल्याची चर्चा साखर कारखानदारांच्यात सुरू आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील साखर कारखानदारांना सुमारे 160 कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती कारखान्यांच्या सूत्रांनी दिली.

सांगली : सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात कारखान्यांनी गाळप हंगाम जोरदार सुरू केला आहे. मात्र, दक्षिण महाराष्ट्रात ऊस तोडणी मजुरांची संख्या 30 टक्‍क्‍यांनी घटली आहे. याचा परिणाम गाळप हंगामावर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यंदाचा गाळप हंगाम सुमारे 15 ते 25 दिवसांनी लांबणार असल्याची चर्चा साखर कारखानदारांच्यात सुरू आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील साखर कारखानदारांना सुमारे 160 कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती कारखान्यांच्या सूत्रांनी दिली.

सांगली जिल्ह्यात खासगी व सहकारी असे एकूण 16 साखर कारखाने तर कोल्हापूर जिल्ह्यात 22 कारखाने आहेत. साखर हंगाम सुरू होण्याअगोदर कारखाने आणि वाहनमालक यांच्यात मजुरांसाठी करार केला जातो. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांत टोळ्यामध्ये फसवणुकीचे प्रकार फार कमी होते. मात्र, यंदाच्या हंगामात फसवणुकीचे प्रकार अधिक होऊ लागले आहेत. कारखान्यांना मजूर देण्याचे काम मुकादम करत असतो. तोच ठरवतो की, कोणत्या कारखान्याला किती मजूर द्यायचे अशी पद्धत आजही वापरली आहे. त्यामुळे फसवणुकीचे प्रकार अधिक घडू लागल्याने याबाबत गेल्यावर्षी साखर आयुक्त कार्यालयात बैठकही झाली होती. मुकादम अशा प्रकारची फसवणूक करताहेत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, तसे होताना दिसत नाही. यामुळे दरवर्षी मजुरांची टंचाई भासते आहे. त्याचा फटका साखर कारखान्याला सोसावा लागणार आहे.

गेल्यावर्षी राज्यात दुष्काळ परिस्थिती होती. यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत मजूर मोठ्या प्रमाणात आले होते. मात्र, यंदा राज्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे ऊस तोडणीला जाण्यापेक्षा शेती करण्यासाठी ऊस तोडणी मजूर पुढे आले आहेत. मात्र, कारखान्यातर्फे ऊस तोडणीचा करार करताना सर्वच मजुरांचा करार केला आहे. त्यामुळे मजूर येणे अपेक्षित होते. अशी माहिती एका सांगलीतल्या कारखान्याने दिली. मात्र, असे झालेच नाही. त्यामुळे एका टोळीमध्ये 10 मजूर होते, 5 ते 7 एवढेच मजूर कारखान्यावर दाखल झाले. त्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात 30 टक्‍क्‍यांनी मजुरांची कमतरता जाणवू लागली आहे. पुढच्या हंगामातही मजुरांची कमतरतेची टक्केवारी वाढण्याची शक्‍यता आहे. असा अंदाज कारखानदारांनी व्यक्त केला आहे.

यांत्रिकीकरणाला शासनाने द्यावा भर
यांत्रिकीकरणाला शासन कारखान्यांना प्रोत्साहिक करत नाही. कर्नाटक राज्य 9.50 टक्के याप्रमाणे व्याजदरात कर्ज पुरवठा केला जातो, तर महाराष्ट्रात तर 11 टक्के याप्रमाणे यांत्रिकीकरणासाठी कर्ज दिले जाते. मात्र, कर्नाटक राज्यातील कारखान्याची धोरणी वेगळी आहेत. तर इथली धोरणे वेगळी आहेत. यामुळे कारखानदारांना याचा फटका बसतोय.

असा आहे आर्थिक फटका
एक कारखाना वाहतूक आणि मजुरांसाठी अंदाजे 2 कोटी रुपये खर्च करते. गाळप हंगामात पाच लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करणारा कारखाना प्रतिटनाला 40 रुपये यासाठी खर्च करतो असतो, अशी माहिती सुधाकर पाटील यांनी दिली. पण एकूण खर्च पाहिला दोन कोटीच्या घरात जातो. मजुरांच्या टंचाईमुळे हा खर्च आर्थिक ताळेबंदाच्या येणे रक्कमेत दिसणार आहे. यामुळे कारखान्याचे झालेले आर्थिक नुकसान कसे भरून काढणार हा ही प्रश्‍न उपस्थित होतो आहे.

गाळप हंगाम सुरू होऊ सुमारे महिना होईल. यंदाच्या गाळप हंगामात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत मोठी मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ऊस तोडणीचा प्रोग्रॅम कोलमडू लागले आहेत. याचा फटका साखर कारखान्यांना बसणार आहे. जे मुकादम फसवणूक करताहेत यांच्यावर कारवाई करावी.
- सुधाकर पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना शेती अधिकारी व शेती पदवीधर संघटना, कोल्हापूर

जेवढ्या ऊस तोडणीसाठी टोळ्या येणे अपेक्षित होते तेवढ्या टोळ्या आल्याच नाहीत. यामुळे कारखान्याला आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. मजुरांची टंचाईमुळे उसाचा हंगाम सुमारे 15 ते 25 दिवसांनी लांबण्याची शक्‍यता आहे.''
- अरुण लाड, अध्यक्ष, क्रांती सहकारी साखर कारखाना कुंडल, जि. सांगली.

इतर अॅग्रो विशेष
फेरवाटपातून वाढतोय जलसंघर्षमहाराष्ट्र देशी जलसंघर्षांच्या संख्येत व तीव्रतेत...
शेतकरी सक्षमतेचा ‘करार’भारतीय शेतकऱ्यांसमोर आजची सर्वांत मोठी अडचण कोणती...
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या...
‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांना ‘मॅट’चा...अकोला ः अमरावती विभागीय कृषी सहसंचालकाकडून सन...
भुईमुगालाही हमीभाव मिळेनाअकोला ः या हंगामात लागवड झालेल्या भुईमुगाची काढणी...
जैन इरिगेशनला विदर्भातील सूक्ष्म सिंचन...जळगाव : जगातील अग्रगण्य सिंचन कंपनी जैन इरिगेशन...
कडधान्याचा पेरा वाढण्याची शक्यतानवी दिल्ली ः भारतीय हवामान खत्याने यंदा मॉन्सून...
माॅन्सून उद्या अंदमानातपुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...
ढगाळ हवामानामुळे पारा घसरला पुणे : मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात व परिसरात...
‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’मध्ये पश्चिम...मुंबई :  केंद्र पुरस्कृत‘राष्ट्रीय...
राज्यात कांदा १०० ते ९०० रुपये...नाशिकला ३०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल नाशिक...
धुळे जिल्ह्यात तृणधान्यासह कापूस...धुळे : जिल्ह्यात सुमारे चार लाख ४० हजार हेक्‍टरवर...
पीक लागवडीची अचूक वेळ साधणे महत्त्वाचेअशोक बारहाते यांची ९ एकर शेती. मात्र खरीपात...
तूर, उडीद लागवडीवर सर्वाधिक भरआमच्या भागात खरिपात सहसा पिके घेत नाहीत, रब्बी हा...
बियाणे, लागवड तंत्रात केला बदलसातारा जिल्ह्यातील उडतरे (ता. वाई) येथील सुनील...
‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री...पुणे ः ॲग्रिकल्चर सेक्टरमधील खते, बी - बियाणे,...
उत्पादकांना मिळावा उत्पादनवाढीचा लाभदेशातील काही भागांत विशेषत: कर्नाटक, तमिळनाडू व...
सेसवसुली नव्हे; सर्रास लूटजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे आवाराबाहेर...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्यपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी...